यशाचा फॉर्मुला! (प्रेरणादायी लेख)

स्टीव्ह जॉब्जने कॉलेज ड्रॉपआऊट झाल्यावर गंमत म्हणुन कॅलिग्राफीचे क्लास केले, आणि एप्पल मेकिंटॉश ह्या जगातल्या पहील्या व्यावसायीक कॉम्पुटर मध्ये त्याचा वापर केला, मेकिंटॉश तुफान लोकप्रिय झालं, एप्पल ब्रॅंड बनला…….. कधीतरी शिकलेली कोणती गोष्ट कुठे कामाला येईल सांगता येत नाही, त्यामुळे आपण सतत शिकत रहायचं.

यशाच्या प्रवासात शॉर्टकट नसतो…. यशस्वी व्यक्ती मेहनती असतात, यशाचा एक सिक्रेट फॉर्मुला आहे. फक्त नशीबामुळे कोणी यशस्वी होत नाही, त्यासाठी यशाचं सुत्र समजुन घ्यावं लागतं आणि अंमलात आणावं लागतं!

खालील आठ सवयी आत्मसात केल्यास यश स्वतःहुन आपल्या दारात चालत येतं.

१) वाचन :

यशस्वी माणसं प्रचंड वाचन करतात. वाचलं त्यावर विचार करतात. सतत काही ना काही शिकत राहतात.

एका मुलाखतीत, जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी एक असलेले ‘वॉरेन बफे’ यांना कुतुहलाने एक प्रश्न विचारला होता, “झटपट तुमच्याएवढं श्रीमंत होण्यासाठी कोणती सवय अत्यावश्यक आहे?”……..

समोरचा पेपरचा गठ्ठा उचलुन अमेरीकेन शेअर मार्केटचा अनाभिषिक्त सम्राट म्हणाला, आठवड्याला अशी पाचशे पानं वाचा, सहज माझ्याएवढे ‘श्रीमंत’ व्हाल! सतत वाचल्याने ज्ञानही चक्रवाढ पद्धतीने वाढते.

इथे त्यांनी एक बहुमुल्य गोष्ट सांगीतलीय, ज्याप्रमाणे चक्रवाढ व्याज हे आईनस्टाईनला आठवं आश्चर्य वाटलं होतं, अगदी तसं सतत वाचल्याने आधीचे ज्ञान आणि वाचन करताना सुचलेले विचार यांचे मिश्रण होऊन, आधी कुठेही न वाचलेल्या, कुणीही न सांगीतलेल्या अफलातुन कल्पना, एकामागोमाग एक, आश्चर्यकारकरित्या जन्म घेऊ लागतात.

२) कृती :

चला, खुप प्रयत्नांती तुम्हाला एक कल्पना सुचली. पण नुसत्या कल्पनाविलासाने कोणी यशस्वी होत नाही. ती आयडीया खरोखर किती कामाची आहे, हे प्रत्यक्ष कृती केल्यावरच कळते.

त्यासाठी तात्काळ त्या कल्पनेला वास्तवात आणण्यासाठी मेहनत करायला हवी.

सुरुवातीला हवा तश्या गोष्टी घडतीलच असे नाही, चिकाटीने आणि जिद्दीने यश मिळेपर्यंत काम करतच रहायला हवे. चुका होतील, त्यातुन धडे घेऊन, पुन्हा नव्या उत्साहाने कामाला लागयचे.

३) व्हिज्युअलायझेशन :

जेव्हा अरनॉल्ड श्वेट्झनायझरला त्याच्या यशाचं रहस्य विचारलं गेलं, तेव्हा त्याने एका शब्दात उत्तर दिलं, “व्हिज्युअलायझेशन” एखादी कृती करण्याआधीच, डोळे बंद करुन, ती घटना मनातल्या मनात घडताना, जशीच्या तशी बघायची.

त्यात अगदी बारीकसारीक गोष्टीसुद्धा स्प्ष्टपणे रेखाटायच्या.

एका रिसर्चमध्ये असं आढळुन आलं की, एखादा खेळाडु जेव्हा प्रत्यक्ष खेळण्याऐवजी मनातल्या मनात खेळण्याचा सराव करत होता, तेव्हा देखील त्याच्या ह्र्द्याचे ठोके, प्रत्यक्ष खेळताना पडले असते, त्याच तीव्र गतीने पडत होते.

खुप प्रभावी आहे व्हिज्युअलायझेशन!

४) सकाळंच रुटीन :

यशस्वी लोकं स्वतःच्या मेंदुला एखाद्या कॉम्पुटरसारखं ट्रेन करतात, त्याला जो प्रोग्राम आखुन दिला जातो, कसलीही कुरकुर न करता, मेंदु त्यांच्या आज्ञांचं पालन करतो.

सकाळी उठल्यावर, आळस झटकुन, एखाद्या यंत्रासारखं ते कामाला लागतात. टोनी रॉबिन्स सकाळी उठल्यावर प्रसन्नतेने उठण्याचं महत्व सांगतात, उठल्याबरोबर रात्रभर मनात घोंगावत असलेले विचार पुन्हा रुंजी घालु लागतील, त्याआधी व्यायाम, वॉकिंग, जिम अशा शारीरीक हालचालींनी स्वतःला ताजतवानं ठेवल्याने दिवसभर उत्साह टिकतो.

५) आयुष्यावर नियंत्रण मिळवा:

आपण कूणाचे गुलाम बनुन जगु नये. ज्याच्याकडे पैशाची शक्ती नसते, सगळेजण त्याचा वापर करुन घेतात. समजा, तुम्ही एक नौकरी करता, आणि तुमच्याकडे दुसरे कसलेही उत्पन्न नाही, तुम्ही पुर्णपणे त्या नौकरीवर डिपेंड आहात. तु

मचा बॉस तुमची मजबुरी ओळखेल आणि जास्तीत जास्त कामाचा लोड देईल, प्रसंगी अपमानही करेल, हे सहन करण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्याय नसेल.

जर तुमच्या बॅंक अकांउंटला तगडी रक्कम असेल तर तुम्ही नौकरी सोडूनही काही महीने तग धरु शकाल, ज्याने तुमच्यात आपोआपच एक हिंमत येईल आणि कामात चोख असाल तर बॉसही वाकड्यात शिरण्याची हिंमत करणार नाही.

पैशाने प्रत्येक गोष्ट नाही मिळणार, पण स्वतःच्या आयुष्यावर काही प्रमाणात तरी नियंत्रण नक्की मिळवता येते.

ह्याला म्हणतात लिव्हरेज!

६) स्वतःशी स्पर्धा करा :

यशस्वी लोकं यशासाठी भुकेली असतात, अल्पसंतुष्ट होवुन एका जागी बसत नाहीत, एक पुर्ण झाले की झपाटुन पुढच्या ध्येयाच्या मागे लागतात. कालच्यापेक्षा माझ्या कामात अजुन काय सुधारणा करु, असा प्रश्न स्वतःशीच विचारतात.

आपल्या स्पर्धकांकडे बघुन जळत नाहीत, त्यांच्याकडुन प्रेरणा घेतात, आणि अजुन उंची गाठतात.

७) हिशोब करुन, जोखीम घ्या :

यशस्वी होण्यासाठी आपल्याभोवतीचा ‘सुरक्षित कोष’ म्हणजे ‘कंफर्ट झोन’ तोडावा लागतो, त्याबाहेर पडुन जोखमी घ्याव्या लागतात, एखादे नवे काम सुरु करताना, यशस्वी लोक अजिबात घाबरत नाहीत, चिंता करत बसत नाहीत, तर नेटाने, आत्मविश्वासाने, जिद्दीने ते परिस्थितीला भिडतात.

प्लान “ए” फेल झाला तर प्लान “बी” तयार ठेवणे ही सुद्धा यशस्वी लोकांची एक महत्वाची सवय आहे.

८) सतत नवनवीन कौशल्ये शिकत रहा :

अरनॉल्ड श्वेट्झनायझर प्रचंड कष्ट करुन, बॉडी बिल्डर झाला, महत्प्रयासाने अभिनेता झाला, त्याने संगीतही शिकले, नंतर तो राजकारणात गेला आणि एका मोठ्या राज्याचा गव्हर्नर सुद्धा झाला. सतत शिकणाऱ्या माणसाची प्रगती पाहुन जग थक्क होतं!

स्टीव्ह जॉब्जने कॉलेज ड्रॉपआऊट झाल्यावर गंमत म्हणुन कॅलिग्राफीचे क्लास केले, आणि एप्पल मेकिंटॉश ह्या जगातल्या पहील्या व्यावसायीक कॉम्पुटर मध्ये त्याचा वापर केला, मेकिंटॉश तुफान लोकप्रिय झालं, एप्पल ब्रॅंड बनला.

कधीतरी शिकलेली कोणती गोष्ट कुठे कामाला येईल सांगता येत नाही, त्यामुळे आपण सतत शिकत रहायचं.

यशस्वी होण्याच्या हा फॉर्मुला आणि ह्या आठ सवयी, तुमच्या आणि माझ्या मनावर कोरल्या जाव्या, आणि आपण प्रत्येकाने अदभुत यश मिळवावे, अशा शुभेच्छा!…

माझे प्रेरणादायी लेख आवडतात, अशी पोचपावती देणाऱ्या प्रत्येकाचे मनःपुर्वक आभार!

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “यशाचा फॉर्मुला! (प्रेरणादायी लेख)”

  1. सर आपले सर्व लेख खूप छान व प्रेरणादायी आहेत. लेख वाचल्या नंतर काही करण्याची एक विशिष्ट ऊर्जा निर्माण होते.
    धन्यवाद सर

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय