पक्ष म्हणतोय “बेटी बचाओ” वाचाळवीरा राम कदम म्हणताय “बेटी भेगाओ”…..

राजकारणात लोकप्रियतेच्या रथावर आरूढ व्हायची मनीषा जवळजवळ सर्वांनाच असते. पात्रता नसणाऱ्यांना तर ती जरा जास्तच….. त्यामुळेच आजच्या राजकारणात ‘वाचाळवीर’ बनून सवंग प्रसिद्धी मिळविणाऱ्यांचाच बाजार जास्त भरलेला दिसतो. काहीही करून चर्चेत राहण्याच्या हव्यासापोटी ह्या वाचाळांच्या जिभा बेतालपणे वळवळत असतात. आपल्या वक्तव्याचा पक्षावर आणि समाजावर काय परिणाम होईल, याची यांना कुठलीच तमा नसते…… एकदा यांच्या गळ्यात एखाद्या सत्तेच्या पदाची माळ पडली कि ही मंडळी बोंबा ठोकायला मोकळी होतात. काहीवेळा पक्षही अश्या वाचाळवीरांना आवर घालण्याऐवजी त्याच्याकडे कानाडोळा करतो. त्यामुळे यांची हिम्मत अजूनच वाढते. आणि त्यांच्या सुटलेल्या जिव्हा सामाजिक नीतिनियम, सामाजिक आदर, परंपरा, नीतिमूल्यं आणि सभ्यतेच्या सर्व मर्यादा पार करून जातात. आपण काय बोलतोयं, त्याचा समाजमनावर काय परिणाम होईल, याची या बोलभांडाना किंचितही तमा राहत नाही. ‘उचलली जीभ कि लावली टाळ्याला’ या उक्तीनुसार हातात माईक पडला कि ही मंडळी बेफाम सुटतात. मग, त्यांचे बोलणे ‘बरळणे’ कधी होते….. ते त्यांच्या स्वतःच्याही लक्षात येत नाही. नावात ‘राम’ असूनही मुली पळविण्याची ‘रावण’ प्रवृत्ती बोलणारे घाटकोपर चे भाजपा आमदार राम कदम ही त्यातलेच एक म्हटले पाहिजे.

जन्माष्टमीच्या निमित्ताने घाटकोपर येथे दहीहंडीचा एक समारंभ आयोजित करण्यात आला होता. तरुणाई दहीहंडीच्या उत्सहात चिंब भिजून गेली असताना घाटकोपरचे आमदार राम कदम यांच्या हाती माईक येताच त्यांनी मुक्ताफळॆ उधळायला सुरवात केली. एखाद्या मुलीला तुंम्ही प्रपोज केल्यानंतर ती नाही म्हणत असेल तर तिला मिळविण्यासाठी मदत करण्याची भाषा करणाऱ्या आ. राम कदम यांची गाडी रुळावरून इतकी घसरली कि, त्यांनी मुलगी आई वडिलांना पसंत असल्यास तिला पळवून आणण्यासाठी मदत करण्याचे बेफाम वक्तव्य करत त्यासाठी फोन नंबर घेऊन त्यावर संपर्क साधण्याचे आहवानही करून टाकले. कलयुगातील नामधारी ‘रामा’च्या तोंडातून रावणाची भाषा जाहीरपणे बाहेर पडू लागल्याने त्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रातून जनक्षोभ बाहेर येऊ लागला. सुरुवातीला राम कदम यांनी आपल्या वक्‍तव्यावर ठाम राहण्याचा पवित्रा घेतला; परंतु महिला वर्गातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने राम कदम यांनी दिलगिरी व्यक्‍त केली. “कोणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता,’ असं म्हणून राम कदम आता साळसूदपणाचा आव आणत आहेत. परंतु, राम कदम यांच्या वक्तव्याने महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या मनावर इतकी खोलवर जखम झाली आहे कि, दिलगिरीच्या शब्दांनी ती भरून निघणे अश्यक्य आहे. कदम यांच्या बेफाम वक्तव्याप्रकरणी भारतीय जनता पक्ष त्यांच्यावर कारवाई करणार असल्याच्या बातम्या आता येऊ लागल्या आहेत. मात्र, केवळ दिखाऊ कारवायांतून हा प्रश्न सुटणार आहे का? याअगोदरही बऱ्याच वाचाळवीरांनी आपल्या वक्तव्यातून महिलांचा, देशाचा अवमान केला आहे. त्यांच्यावरही पक्षाने कारवाई केली. परंतु, त्यामुळे तोंडपाटीलकी करणाऱ्यांना ना जरब बसला, ना त्यांची संख्या कमी झाली. उलट हे वाचाळवीर आता सभ्यतेच्या सर्व सीमा ओलांडू लागले आहेत. त्यामुळे या विकृतीला लगाम घालण्यासाठी कठोर पाऊले उचलावी लागतील.

वाचनकट्टा...
वाचनकट्टा… नानाविध पुस्तकांचा…

महाराष्ट्राच्या विवेकवादाच्या आणि पुरोगामित्वाचा डंका अवघ्या जगभरात वाजविल्या जातो. छत्रपती शिवाजी माहाराजांचं नाव घेऊन राज्यकर्ते राज्य करतात. मात्र त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा थोडा तरी इतिहास माहित आहे कि नाही, याची शंका आता येऊ लागली आहे. महिलांच्या सन्मानासाठी ज्या छत्रपती शिवरायांनी जीवाचे रान केले. त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रात आज सत्ताधारी पक्षाचा एका आमदार मुली पळविण्याची जाहीर भाषा करतो. दुसरा छिंदम नावाचा पदाधिकारी शिवरायांबद्दल अवमानकारक वक्तव्य करतो. ही कोणती नीती आहे? एकीकडे ‘शिवछ्त्रपतींचा आशीर्वाद ..’ ची आरोळी ठोकायची आणि दुसरीकडे छत्रपतींच्या तत्वांविरोधात वर्तन करायचे. हिंदू संस्कृतीचा एकीकडे अभिमान बाळगायचा, महिलांना देवीचे स्थान द्यायचे; परंतु देव्हाऱ्यात बसवून नंतर मात्र तिची कायम अवहेलना करायची, यातून सुसंस्कृतपणाच्या मुखवट्यामागे एक असंस्कृतपणाचा विद्रुप चेहरा असल्याचे समोर येते.

“अनंत वाचाळ बरळती बरळ….. त्या कैसा दयाळ पावे हरी” संत ज्ञानेश्वर माउलींनी हरिपाठातून बेताल बडबड करणाऱ्यांना आवर घालण्याचा सल्ला दिला आहे. ”शब्द संभालके बोलिये, शब्द के हात ना पाव….. एक शब्द करे औषधी. एक शब्द करे घाव..” या कवितेच्या ओळीतून कवींनी शब्दांचं माहात्म्य वर्णन केलं आहे. आपण शब्द मृदू वापरतो की कठोर, यावरून तो शब्द औषधीचे काम करतो की घावाचे, हे ठरत असते. शस्त्राने केलेली जखम लवकर भरून येते, पण शब्दाने केलेली जखम भरून येण्यास दीर्घ कालावधी लागतो किंबहुना ती अनेकदा भरूनही येत नाही, त्यामुळे शब्दांचा वापर जपून केला पाहिजे. हे उपदेश आता वाचून-एकूण, घासून-घासून गुळगुळीत झालेत. पण आजकाल लोकांना ही केवळ पुस्तकातील वाक्य वाटू लागली आहे. राजकारण्यांमध्ये तर बेताल बोलण्याचा जसा काही साथीचा रोग आला आहे. हा रोग कोण्या एका पक्षापुरता मर्यादित राहिला नाही तर सर्वच पक्षांमध्ये याची लागण झालेली दिसून येते. ही बाब चिंताजनक आहे. ‘राम’ नामाची कीर्ती आणि शक्ती अगाध. या दोन शब्दात अवघे विश्व सामावले आहे. जीवन जगण्याचा आदर्श उभा करणाऱ्या प्रभू श्रीरामाची कलयुगातील मानवी देहाशी तुलना करण्याचे पाप आम्ही करू इच्छित नाही. मात्र किमान या शब्दाची जरा तरी चाड हे नाम धारण करणाऱ्यांनी ठेवावी, इतकीच अपेक्षा आहे.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय