व्यवसाय मार्गदर्शन – ब्रॅंड कसा बनवयचा?

ब्रॅंड कसा बनवयचा?

नमस्कार मित्रांनो, ब्रॅंड बनवण्यासाठी आवश्यक नऊ गोष्टी मी मागच्या लेखात तुम्हाला सांगीतल्या होत्या. त्याला तुम्ही शेअर करुन भरभरुन प्रतिसाद दिलात, त्याबद्दल मनापासुन धन्यवाद!

आज बघुयात, आपल्या छोट्याश्या व्यवसायाला मोठ्ठा ब्रॅंड बनवण्यासाठी काय करावं लागतं.

१. तुमचा ग्राहक कोण आहे?

कुठलाही ब्रॅन्ड बनवण्याच्या आधी ‘नो युवर कस्टमर’ च्या धर्तीवर आपला संभाव्य ग्राहक कोण आहे ते शोधलं पाहीजे. उदा. एखाद्या स्टायलिश कपड्यांच्या दुकानातला ग्राहक मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय असेल, ते कपडे घेण्याची लो इन्कम ग्रुप मधल्या लोकांची ऐपत नसेल, तेव्हा टारगेट कस्टमर शोधा, त्यांच्याशी संपर्क वाढवा.

कॉलेजची मुले, स्टायलिश राहतात, त्यासाठी खर्च करण्याची त्यांची तयारी असते, मग जमल्यास त्यांची एखादी मोठी गॅदरींग, एखादा इव्हेन्ट स्पॉन्सर करा. आपली जाहीरात आपल्या संभाव्य ग्राहकाला, आपल्यापर्यंत घेऊन आली पाहीजे.

२. ध्येय ठरवा…..

तुम्ही करत असलेला व्यवसाय बाजारात हजारो लोक करत आहेत, तेव्हा तुम्ही तुमच्या ग्राहकाला काहीतरी वेगळं दिलं पाहीजे, तर तो तुमच्याकडे आकर्षित होईल आणि तुमच्या वेगळेपणामुळे कायमचा ग्राहक बनेल. तुमचा प्रॉडक्ट इतरांपेक्षा कसल्या ना कसल्या प्रकारे सरस असला पाहीजे.

ग्राहकाला तुम्ही काय देणार आहात हे स्पष्ट करणं, म्हणजे व्हिजन आणि मिशन स्टेटमेंट. तुमचं व्हिजन आणि मिशन तुमच्या व्यवसायाला पुढे घेऊन जाण्यात खुप मदत करतं. पदोपदी तुम्हाला मार्गदर्शन करतं.

नाईके जगातली शुज बनवणारी एक उत्कृष्ट कंपनी, त्यांचे मिशन स्टेटमेंट आहे, तुम्ही एथलिट असाल आमचे शुज वापरा, ते बेस्ट आहेत. त्यांनी सोबत अजुन एक वाक्य जोडून स्वतःला व्यापक केले.

“ज्याच्याकडे बॉडी आहे, तो एथलिट आहे.” नकळत त्यांनी प्रत्येकाला स्वतःचा ग्राहक बनण्याचं निमंत्रण दिलं.

आपण आपल्या संभाव्य ग्राहकाला आपल्याकडे येण्याचं, निमंत्रण देतो का? …… जो ग्राहक आला, त्याला वेगळी आणि खास ट्रीटमेंट देतो का?….दर्जेदार आणि आगळवेगळं उत्पादन, सेवा देतो का?

काहीतरी वेगळं म्हणजे तुमचा नम्रपणा असु शकतं, तुमचा प्रामाणिकपणा, तुमची कस्टमरबद्दल आपुलकी, तुमचं त्यांना आदरानं बोलणं हेही असु शकतं, आजकालच्या प्रोफेशनल जगात बहुतांश लोक आपापल्या तोऱ्यात वावरत असतात, तेव्हा मन जिंकुन, माणसं आपलीशी करण्याराला तसा बराच स्कोप आहे.

३. स्वतःमधल्या कमतरता शोधा –

मार्केटवर बारकाईने लक्ष ठेवुन, तुमचे स्पर्धक कोणत्या बाबतीत वरचढ आहेत, त्याचा अंदाज घ्या. मग स्वतःमध्ये सुधारणा कशी करता येईल, ते शोधा. उदा. नवीन सॉफ्टवेअर शिकणं, ऑफीसला, दुकानाला, चांगलं इंटीरीअर बनवणं, मनुष्यबळ वाढवणं, व्यवसायाला उपयोगी पडणार्या नवनव्या स्किल्स शिकणं.

आपला स्पर्धक आपल्यापेक्षा लोकप्रिय असेल तर आपण आणखी कायकाय केल्याने त्यापेक्षा जास्त चांगले बनु याचा सतत विचार करा.

मग, तुमच्या उत्कृष्ट सेवेसाठी, नकळत तो सगळा खिसाही रिकामा करेल.

५. एक आकर्षक लोगो आणि टॅगलाईन बनवा…..

लोगो असणं, खुप आवश्यक आहे, कालांतराने ती आपली ओळख बनतं. सर्वप्रथम कुठेही, आपलं लक्ष पहील्यांदा लोगोवर जातं. नकळत ग्राहकाच्या मनात आपली ‘ब्रॅंड बिल्डींग’ चालु होते. लोगो ग्राहकांच्या मनावर लवकर ठसतो. ब्रॅंड आहे म्हणजे चांगलाच असणार असे आपल्या बाजुने त्याचे विचार आपोआप वळु लागतात.

लोगो असा असावा, की अधिक माहीती न सांगता तुमचं उत्पादन, किंवा तुमची सेवा, चटकन ग्राहकाला कळाली पाहीजे, जर तुमच्या लोगोतुन तुमच्या व्यवसायाचा बोध होत नसेल, तर लोगो बदला, अधिक सुलभ, अधिक आकर्षक करा.

लोगोमुळे तुमचा व्यवसाय इतरांपेक्षा वेगळा असा, उठुन दिसतो. तुम्हाला डिझाईन येत नसेल तर प्रोफेशनल लोकांची मदत घ्या, देखणा लोगो बनवुन व्हिजीटींग कार्ड, ऑफीस, दुकानाचा डिस्प्ले, जाहीराती यात मनसोक्त त्याचा वापर करा. ती तुमची युनिक ओळख बनते.

घराला घरपणं देणारी माणसं, म्हणलं की डिएसके आठवतो, तसंच ‘I m lovin it’ म्हण्टलं की मॅकडोनाल्ड आठवतं, रहा एक पाऊल पुढे म्हणलं की एबीपी माझा आठवतं, ह्यालाच ब्रॅन्ड म्हणतात. आपल्या व्यवसायाचं सार एका वाक्यात लुभावण्या पद्धतीने मांडलं की टॅगलाईन तयार होते.

६. मार्केट युवर ब्रॅंड…..

वरील पाच गोष्टी लक्षात ठेवुन सहावी गोष्ट करायची, ती म्हणजे आपलं दर्जेदार उत्पादन मार्केटला पोहचवायचं,

तुमचं प्रॉडक्ट खुप छान आहे हे फक्त तुम्हाला माहीत असुन चालणार नाही, त्याला जगासमोर आकर्षक स्वरुपात मांडावं लागेल.

घरात वाट बघत बसल्याने कस्टमर येत नाही. पहीले काही हजार कस्टमर तुम्ही शोधा, तुमच्या उत्पादनात खरच दम असेल तर नंतर कस्टमर तुम्हाला शोधत येतील.

तुमच्या उत्पादनाचं आगळवेगळं स्वरुप, देखणा लोगो, चटकदार कॅचलाईन यांच्या पाठबळावर शेतात दाणे पेरतात, तसे वेगवेगळ्या माध्यमांच्या सहाय्याने मार्केटमध्ये, जिकडेतिकडे पसरावुन जायचे, कधी वर्तमानपत्रे, कधी सोशल मिडीया, कधी बॅनरबाजी, कधी पॉम्प्लेट, कधी पर्सनल कॉन्टॅक्ट अशी वेगवेगळी शस्त्रे वापरायची.

कुठली बी उगवेल, ते शेतकरी बघत नाही, तो फक्त प्रामाणिकपणाने, कष्टाने पेरत राहतो.

मित्रांनो, गीता संदेश आहे, फुकट मिळत नाही, केलेले वाया जात नाही, काम करीत रहा, हाक मारत जा, मदत तयार आहे. त्यावर विश्वास ठेवायचा.

एक दिवस तुमचा व्यवसाय भव्यदिव्य ब्रॅंड बनेल, अशा खुप खुप शुभेच्छांसह

मनःपुर्वक धन्यवाद!…..

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!