आरोग्यविमा आणि ‘आयुष्मान भारत’ योजना आणि त्याचे महत्व…

आयुष्मान भारत

आपल्याला रोजच्या जगण्यात येत जात काय कसे आहेत तुम्ही? बरे आहेत ना!! हा प्रश्न सहजच विचारला जातो….. तुम्ही आम्ही सुद्धा विचारपूस करतांना यापासूनच सुरुवात करतो…… तर खरंच ‘मजेत चाललं’ असं बोलणारे आपण बरेच असतो का? भविष्यात तब्बेतीमध्ये काही चढ उत्तर आला तर त्यासाठी आपण काही तरतूद केली आहे का?

जागतिक बँकेनं नुकताच एक अहवाल सादर केलेला आहे. आणि त्यानुसार भारतात दरवर्षी औषधं आणि ऑपरेशनच्या खर्चामुळे ५ कोटी लोक गरिबीत ढकलले जातात. आज आपण आरोग्यसेवा आणि आरोग्य विम्याबद्दल बोलू.

आरोग्य निर्देशांकाचा विचार केला तर जगातल्या १९५ देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो १४५ वा. भूतान देशही १३४व्या स्थानावर आहे. भारताच्या एकूण GDP पैकी फक्त १.२५ % रक्कम आरोग्य सेवेवर खर्च होते. भारतातील ८०% लोकांकडे आरोग्य विमाही नाही. CII च्या अहवालानुसार ६७% लोक आपल्या खिशातून औषधं उपचार याचा खर्च करत असतात. आणो फक्त ४% विमा आहे. तोही खाजगी संस्थांकडून घेतलेला आहे.

सध्या केंद्र सरकारनं एक योजना आणलेली आहे ‘आयुष्मान भारत’. या योजनेचे रजिस्ट्रेशन २५ सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. या यिजनेची सुरुवात छत्तीसगढ राज्यापासून होणार असून देशातील २९ राज्यात हि योजना लागू केली जाणार आहे. आता या योजनेतील विमा काढण्यासाठी आर्थिक दृष्ट्या पात्रतेचे निकष लावले गेलेले आहेत हेही तितकेच महत्वाचे.

आरोग्य विमा असणं अनेक कारणांसाठी महत्वाचं आहे. विमा नसेल तर तुम्हाला महागडे उपचार कदाचित परवडणारही नाहीत. तातडीने उपचारांची गरज असल्यास आधी पैसे उभे करावे लागतील आणि मगच उपचार घेता येतील. आरोग्य विम्याची गरज ही व्यक्तिसापेक्ष बदलते.  ग्राहकाचे वय, जीवनक्रमातील उद्दिष्टे, मासिक उत्पन्न, व्यवसाय, वैयक्तिक सवयी, कुटुंबाची सदस्य संख्या, कर्जाचे हप्ते, प्रकृतिमान अशा तांत्रिक बाबींचा सांगोपांग विचार करून निर्णय घ्यावा लागतो.  ‘पद्धतशीर नियोजनाने’ आरोग्य विम्याचे आणि आयुर्वम्यिाचे गणित सोडवावे लागते.  बऱ्याचदा विमा संरक्षणाची गरज फार उशिरा लक्षात येते. घाईघाईने निर्णय घेतला जातो. अशी निर्णयप्रक्रियेतील ‘घाई’ संपूर्ण कुटुंबाच्या भवितव्याशी केलेली जीवघेणी तडजोड आहे याचे भान गुंतवणूकदारास नसते. भारतातील आरोग्यविम्याची मुख्यतः कुठल्याही विम्याची अनास्था हि गैरविक्रीसारख्या अपप्रवृत्ती, विमा सल्लागारांकडून फसवणूक या मानसिकतेमुळे निर्माण झाली आहे. शिवाय या विम्याच्या हफ्त्यांवर करबचतीचा फायदाही घेता येतो. तर लक्षात असू द्या कि आपली नोकरी जशी महत्वाची तसाच आपला आरोग्य विमाही महत्वाचा.

आयुष्मान भारत योजना काय आहे?


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!