१९८० च्या दशकातला आपला टी.व्ही, आपण आणि आजचा एच.डी. जमाना

जसा राजा आपल्या राजपुत्राला राज्ज्याची जबाबदारी देतो असा हा नयनरम्य सोहळा याची देही याची डोळा बघण्यासाठी आम्ही मित्र प्रजा म्हणून उपस्थित होतो….. तर मग राज्ज्याच्या चाव्या हातात येताच राजपुत्राने अर्थात माझ्या मित्राने ते लाल रंगाच बटण दाबून भारतात एका नव्या पर्वाची सुरवात केली होती. (आमच्यासाठी भारत तेव्हा तरी आमच्या गल्ली पर्यंत मर्यादित होता😜)

१९८० चं दशक चालू होतं. भारत जागतिकीकरणाच्या रेट्यात अजून सापडला नव्हता. ह्याच वेळेस आमची एक पिढी ह्या भारताच्या सशक्त मध्यमवर्गात वाढत होती.

हाय डेफिनेशन किंवा एल.ई.डी. पासून ती त्या वेळेस कोसो दूर होती. आत्ता कुठे आमच्याकडे एन्टिना हलवल्यावर दूरदर्शन मोठ्या प्रयासाने दिसत होतं. त्याचे ते सात रंग जाऊन कधी एकदा दूरदर्शनचा तो लोगो आणि धून ऐकायला मिळते असं व्हायचं.

दोन चॅनल… त्यातलं दुसरं तर कधीतरी चालायचं. रंगीत टी.व्ही. हा प्रकार तेव्हा यायचा होता. टी.व्ही. बंद केल्यावर त्याच्या मध्यभागी दिसणाऱ्या पांढऱ्या टिपक्याकडे कितीतरी वेळ मी बघत बसायचो.😅

टी.व्ही. चालू केला तर कधी कधी उजव्या हाताचा एक फटका खाल्ल्याशिवाय ते भिरभिरणार चित्र थांबायचं नाही. पण तरीही कुठेतरी ते सगळं आवडायचं.

का कोणास ठाऊक, त्या वेळेला एकत्र टी.व्ही. बघायला वेगळीच मज्जा असायची. त्यात सगळ्यात राग येण्याचा क्षण असायचा तो म्हणजे कोणीतरी सांगायचं, ‘अरे थोडा आवाज वाढव.’

मग घरातलं शेंडेफळ म्हणून मान खाली घालून त्या टी.व्ही. चं बटण थोडं उजवीकडे फिरवायचं. लगेच मागून दुसरा आवाज यायचा, ‘अरे इतका नको थोडा कमी कर.’

मग काय? त्या सगळ्यांच्या सूचनांचा मान ठेवून आवाज व्यवस्थित होण्याची वाट बघावी लागायची. त्यात चित्र भिरभिरत असेल तर मग अजून एकात एक काम.

पण तरीही काही असो, त्या काळ्या पांढऱ्या चित्रामध्ये काहीतरी आकर्षण नक्कीच होतं. नजर हटायची नाही…..

काळ थोडा पुढे सरकला. आता रंगीत टी.व्ही आले त्यासोबत आलं रिमोट कंट्रोल. नाव ऐकताच आज आयफोन चं नवं मॉडेल जसं खिश्यात बाळगण्याची इच्छा होते अगदी तशीच ते रिमोट कंट्रोल हातात घ्यायची इच्छा त्या काळात व्हायची.

मला अजून आठवते माझ्या एका मित्राकडे पहिल्यांदा सोनी चा रंगीत टी.व्ही. आणला होता. पठ्ठ्याने सर्व मित्रांना मोठेपणा म्हणून घरी खास संध्याकाळच्या बातम्या बघण्यासाठी आमंत्रित केलं होतं.

(आजवर मिळालेलं सगळ्यात स्पेशल आमंत्रण आहे हे माझ्या आयुष्यातलं😂). तर संध्याकाळी आमची गॅंग त्याच्या घरी.

बेट्याने टी.व्ही. ला मस्त हार घातला होता. त्याच्या आईने आपलं हळद कुंकू लावलं आणि मग आमच्या मित्राने रिमोट कंट्रोल त्याच्या बाबांकडून हातात घेतलं.

जसा राजा आपल्या राजपुत्राला राज्ज्याची जबाबदारी देतो असा हा नयनरम्य सोहळा याची देही याची डोळा बघण्यासाठी आम्ही मित्र प्रजा म्हणून उपस्थित होतो…..

तर मग राज्ज्याच्या चाव्या हातात येताच राजपुत्राने अर्थात माझ्या मित्राने ते लाल रंगाच बटण दाबून भारतात एका नव्या पर्वाची सुरवात केली होती. (आमच्यासाठी भारत तेव्हा तरी आमच्या गल्ली पर्यंत मर्यादित होता😜)

तो दिवस मी आजही विसरू शकत नाही. माझ्या मित्राने अक्षरशः त्या रिमोट कंट्रोलची थ्री डी काय, फोर डी पर्यंत मर्यादा आमच्या समोर मोजली होती.

बेडरूम मध्ये जाऊन तिकडून विचारायचा आवाज होतो का रे कमी? समोरच्या घरातून चॅनल बदलतो का रे? अश्या सगळ्या बाजूने मोजमाप करून आम्ही त्या बातम्या ऐकल्या होत्या.

त्या नंतर अनेक महिने ह्या रंगीत टी.व्ही. चं रिमोट कंट्रोल माझ्या मित्राला क्रिकेट मध्ये पहिल्यांदा बॅटिंग आणि आवडत्या टीम मध्ये एन्ट्री देत होतं. आपल्याकडे असा टी.व्ही.

कधी येईल अशी स्वप्न बघण्यात अनेक रात्री गेल्या होत्या. तो ही एक दिवस उजाडला. त्या दिवशी घरात दिवाळी साजरी झाली होती. टी.व्ही. ला कवर काय?

त्या रिमोट ला ठेवण्याच्या जागी खाली कपडा काय? ते रिमोट खाली पाडणं म्हणजे फाशीची शिक्षाच असा काळ तो होता. आज मागे वळून बघितलं की आपलंच हसू येतं.😀

आज तो रिमोट घरात कुठे पडलेला असतो त्याचं त्याला माहित नसतं. एकतर हातात मिळाला तरी त्याने टी.व्ही. बघण्याची इच्छा पण होत नाही. पांढऱ्या रंगातून रंगीत टी.व्ही आला.

मग एल.ई.डी. झाला. आता तर हाय डेफिनेशन आणि आता फोर के चा जमाना आहे. पण ती टी.व्ही. बघण्याची हौसच आज फिटली आहे.

एकेकाळी जो रिमोट पडल्यावर फाशीची शिक्षा होईल असं वाटायचं आज त्याला दोन तीन वेळा कुठेतरी आपटल्याशिवाय टी.व्ही. अनेक घरात चालू होत नाही. टी.व्ही. हायडेफिनेशन झाला पण आमची नजर शून्य झाली हे खरं.

पूर्वी अनेक घरात मिळून एक टी.व्ही. असायचा आज एकाच घरात अनेक टी.व्ही. असतात. एखादा चांगला कार्यक्रम मग ते कार्टून असो वा छायागीत, एखादा चित्रपट असो वा बातम्या सगळेच त्या टी.व्ही. समोर नजर रोखून बघत असतं.

क्रिकेट ची मॅच चालू असेल तर खेळाडूने काय? कसं? खेळावं हे सांगणाऱ्या कितीतरी टिप्स प्रत्येक घरातून दिल्या जात असतील ह्याची मोजदाद नाही.

१९८० ते २०१८ खूप काळ बदलला. काळानुरूप टी.व्ही. च तंत्रज्ञान बदललं. एके काळी दोन रंग दाखवणारा आज रंगाच्या अगणित छटा दाखवू लागला.

पण टी.व्ही. बघण्यासाठी एकत्र होणारा माणूस मात्र त्या रंगाच्या अगणित छटात तुटला. आता तर त्याने घरतल्या टी.व्ही. ला पण पर्सनल टच द्यायला सुरवात केली आहे.

ह्या पूर्ण स्थित्यंतरातून जाताना आजपण तो जुना कृष्णधवल टी.व्ही आठवतो. केलट्रोन कंपनी चा तो टी.व्ही. आजही माझ्या स्मरणात आहे. त्याचा स्पीकर ते त्याच्या पिक्चर ट्यूब च कित्येक वेळा ऑपरेशन झालं असेल पण आजही त्याच्या त्या च्यानेल बदलण्याच्या बटनाची मज्जा आजच्या रिमोट च्या बटनात नाही.

माझा टी.व्ही. आज बदलला असला तरी आजही त्याने मनात केलेलं घर तसंच… अजून जसंच्या तसं आहे.

वाचण्यासारखे आणखी काही….

खगोल / अंतराळ
ललित

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय