जागृत मन आणि सुप्त मन यांची शक्ती वापरून यशस्वी होण्याचं तंत्र…

तुम्ही एखाद्या क्षेत्रात किती यशस्वी व्हाल, हे कोण ठरवतं?

तुमचं आरोग्य कसं असेल, हे कोण ठरवतं?
तुमचे दुसर्‍यासोबत संबंध कसे असतील, हे कोण ठरवतं?
तुम्ही किती आर्थिक संपन्न असाल, हे कुणी ठरवलं!
हो बरोबर, तुम्ही स्वतः! हे सगळं ‘तुमचं मन’ ठरवतं!

म्हणजेच आज तुम्ही जे कोणी आहात, ते तुमच्या सुप्त मनामुळे आहात…… आणि सुप्त मन कोणाचं ऐकतं बरं!

1) “पैसे कमवणं, म्हणजे तोंडचा खेळ आहे का?”

2) पैसा मिळवणं सोपं नसतं, पैसे काय झाडाला लागतात का?

3) कंटाळा आला आहे ह्या आयुष्याचा!

4) कामाचं खुप टेन्शन आहे मला!

5) माझं माझ्या घरच्यांसोबत जमत नाही.

6) मला लवकर झोप येत नाही, सकाळी लवकर जाग येत नाही.

7) माझे हेल्थचे खुप प्रॉब्लेम्स आहेत.

जागृत मन आणि सुप्त मन

आणि हे पुन्हा पुन्हा ऐकलं की सुप्त मन ह्या वाक्यांना खरं मानायला लागतं. आपल्या मनाचे दोन भाग आहेत, जागृत मन आणि सुप्त मन.

जागृत मन रेल्वेच्या इंजिनासारखं आहे, मागे जोडलेले धुड म्हणजे सुप्त मन.

जागृत मनाकडे उत्तम निर्णय क्षमता आहे, पण ते विसरभोळं आहे. सुप्त मनाला स्वतःची विचारशक्ती, विवेकबुद्धी नाही, पण ते अफाट शक्तीशाली आहे. त्याच्यावर कोरलेल्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्याची अफलातुन शक्ती त्याला प्राप्त आहे.

जी माहीती जागृत मनाद्वारे पोहचवली जाते, त्याला सुप्त मन खरं मानतं. सुप्त मन आपल्याकडे आलेल्या माहीतीच्या आधारे स्वतःला घडवतं. तर आपल्या मनात विचार आला की, जागृत मन त्याला तर्काच्या आधारावर तपासतं.

उदा. समजा, तुम्ही एक वर्षात एक करोड रुपये कमवण्याचं ध्येय ठेवलंत. तुम्ही तुमच्या सुप्त मनावर हा संदेश ठसवण्यात यशस्वी झालात, तर तुमचं सुप्त मन तुम्हाला एक करोड रुपये कशे मिळवावेत याच्या अगणित कल्पना पाठवतं, एक करोड रुपये मिळवण्यासाठी इतरांना आश्चर्यकारक आणि अशक्यप्राय वाटणारा उत्साह प्रदान करतं.

चला, आणखी एक उदाहरण पाहुया, समुद्रात तरंगणारं एक महाकाय जहाज आहे, त्याच्यावर मालकी कोणाची असते, त्या जहाजाच्या कप्तानाची. खोलवर खवळलेल्या समुद्रात, वार्‍यावादळात, जहाज कुणीकडे वळवायचे, याचा निर्णय जहाजाचा कॅप्टन आपल्या केबिनमध्ये बसुन करतो.

तो बराच वेळ खल करुन निर्णय घेतो, “जहाजाला सत्तर अंश डावीकडे वळवा!”

त्याच्या हाताखाली मदतीला पंचवीस जणांचा क्रु आहे. त्याचं काम आहे, कप्तानाची आज्ञा पाळणं, त्यांना दिशेचे, वार्‍याचे ज्ञान नाही. सत्तर अंश डावीकडे, हे चुक की बरोबर याची शहानिशा करण्याचं काम त्यांचं नाही. डोळे झाकुन ते कप्तानाचा आदेश पाळतात. ते कप्तानाप्रति समर्पित असतात.

इथं कप्तान बॉस वाटत असला तरी आपल्या क्रु कडून काम न करुन घेतल्यास तो दुबळा ठरतो.

आपल्या आयुष्यात हा कप्तान म्हणजे आपलं ‘जागृत मन’ आणि क्रु म्हणजे ‘सुप्त मन’. ज्ञात मनाजवळ काय योग्य अयोग्य हे तपासण्याची शक्ती आहे, विवेक आहे, कुशलता आहे. पण ते कुठलीही गोष्ट लवकर विसरुनही जातं.

जे लोक यशस्वी होतात, ते जागृत मनातर्फे सुप्त मनावर संदेश कोरण्यात यशस्वी होतात, मग सुप्त मन, जागृत मनाला रात्रंदिवस मार्गदर्शन करुन, ध्येय प्राप्त करण्यात यशस्वी होतं. मनाला जिंकणारे लोक, मोजके आणि असामान्य लोक, बस्स, नेमकं, हेच करण्यात यशस्वी ठरतात.

आपणही सुप्त मन वापरतो, पण साध्या साध्या कृतींमध्ये, जसं की सायकल चालवणे, एखाद्या सॉफ्टवेअरवर काम करणे, किंवा ड्रायव्हिंग करणं, क्रिकेट, टेनिस खेळणं, हे आपल्याला सुरुवातीला काळजीपुर्वक शिकावं लागलं, पण जेव्हा सुप्त मनाने ती गोष्ट आत्मसात केली की पुन्हा ती सहज व्हायला लागली.

जागृत मन आणि सुप्त मन

हेच सुप्त मन आपल्या शरीरातल्या बहुतांश भागावर नियंत्रणही करतं. जसं की एका मिनीटात हृदय सत्तर वेळा धडधड करतं. तुम्ही जागृतवस्थेत असा वा नसा, ह्या अवयवांचं काम चालुच आहे.

ह्याशिवाय एखाद्याला कुठलीही समस्या असेल, तर उत्तर शोधण्यात सुप्त मन मदत करतं. कधी अचानक जेवताना कल्पना सुचते, कधी आंघोळ करताना, कधी संध्याकाळी बागेत फेरफटका मारताना, जटिल प्रश्न सहज सुटतात.

रामानुजन महान गणितशास्त्री होते, त्यांनी सुप्त मनाचा वापर केला होता. रविंद्रनाथ टागोर असो वा अल्बर्ट आईनस्टाईन, महान संगीतकार बिथोव्हन असो किंवा उद्योजक हेन्री फोर्ड, प्रत्येकानं कळत नकळत सुप्त मनाची शक्ती वापरली होती.

थोडक्यात तुम्हाला जे कोणी यशस्वी लोक दिसत आहेत, त्या सर्वामागे सुप्त मनाचं योगदान आहे. ते तुम्हाला अशी समज प्रदान करतं, ज्याचा फायदा करुन तुम्ही वाटेल ती गोष्ट प्राप्त करु शकता.

ह्या सुप्त मनावर नकारात्मक वाक्ये आदळत असतील तर….

1) माझी दुखणं, मला सुखाने जगु देणार नाही.

2) मरुन जावसं वाटतयं!

3) ह्या जगात माझं कोणीच नाही!

4) माझ्या हातात पैसा टिकत नाही.

5) कायपण केलं तर माझं वजन कमी होत नाही.

6) माझ्या हाताला यश नाही!

7) आपल्या देशाचं काही खरं नाही!

8) दिवसेंदिवस महागाई वाढायलीय, जगणं अवघड झालयं!

असे वाक्य सुप्त मनात गेल्यास काय होईल, सांगण्याची आवश्यकता नाही.

सुप्त मनाला आपल्या विरुद्ध काम करण्याऐवजी आपल्या बाजुने वळवुयात. त्याच्यातली विषारी मुळे उपटुन काढुन नवी फ्रेश पेरणी करुया. मनाच्या संशोधकांनी आपल्या अज्ञात मनामध्ये नवीन प्रकारचे सकारात्मक विचार पाठवण्याचे तीन प्रभावी रस्ते शोधुन काढले आहेत.

१) वाचा, रट्टा मारा

सर्वप्रथम तुम्हाला काय हवे आहे, ते एका कागदावर स्पष्टपणे लिहुण काढा, त्याला पुन्हा पुन्हा वाचा, शब्दनशब्द पाठ होईपर्यंत ऐकत रहा.

जो विचार प्रबळ असेल, त्याला अवचेतन मन आपलंसं करेल.

हा ध्येय लिहलेला कागद खिशात ठेवा, वेळ मिळताच पुन्हापुन्हा वाचा.

सकाळी उठल्याबरोबर, रात्री झोपताना एकेक अक्षर मन लावुन वाचा.

आपोआपचं नकारात्मक विचार नाहीसे होतील, सकारत्मक विचार प्रसन्नता देतील.

२) सरळसरळ अज्ञात मनाशी संपर्क करा

जेव्हा आपण पुर्ण झोपलेले नसतो, आणि पुर्ण जागे नसतो, त्याला ‘तंद्रा-अवस्था’ म्हणतात. इथे जागृत मन झोपलेले असते, सुप्त मन कार्यरत असते.

जे साध्य करावयाचे आहे, त्याची रेकॉर्डिंग करा.

स्वतःला तंद्राअवस्थेत नेऊन मनाला रेकॉर्डिंगद्वारे सुचना द्या. तंद्राअवस्थेत मिळालेले संदेश अज्ञ मन सहज स्वीकारतं, आणि ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी आकाशपाताळ एक करतं.

कमीत कमी चार ते पाच आठवडे, ही कृती रोज एकदा केल्यास परिणाम मिळण्याची सुरुवात होते.

३) कल्पनाचित्रांचा वापर करा

आपल्याला जे काही हवं आहे, त्याची चित्रे गोळा करा, अज्ञ मनावर त्यांचं प्रतिबिंब ठसवा.

समजा, तुम्ही रिअल इस्टेट एजंट आहात, घरे, प्रॉपर्टी खरेदी विक्री करण्याचा तुमचा व्यवसाय आहे, एका नव्या क्लायंटला तुम्हाला भेटायला जायचे आहे. आता कल्पना करा, तुम्ही त्या व्यक्तीला प्रसन्नचित्ताने भेटला आहात, सौदा होण्यात त्याचा काय काय फायदा आहे, हे त्याला सौम्यपणे समजावुन सांगता, त्याच्या सर्व शंकाचे निरसन करता, कागदपत्रे बनवता, त्यावर सह्या होतात, असे एकेके दृश्य मनपटलावर बारकाईने उभे करा.

असे नाही, की रस्त्यात अडचणी येणार नाहीत, पण हा मार्ग वापरल्याने काल्पनिक चित्रांमुळे अज्ञ मन अडचणींवर मार्ग काढण्यास तयार होईल. त्याला एक नवी दृष्टी, शक्ति आणि गती मिळेल.

तुमचं वजन ऐंशी किलो आहे, तुम्हाला ते कमी करावयाचे आहे, स्वतःचे सुडोल शरीरातले चित्र सतत डोळ्यासमोर ठेवा, स्वतःच्या डौलदार, रुबाबदार व्यक्तीमत्वाची कल्पना सुप्त मनात रुजल्यास, आपोआपच, नकळत कमी कॅलरीचे जेवण घेण्यासाठी, आणि अधिकाधिक व्यायाम करण्यासाठी ते चित्र तुम्हाला प्रेरणा देईल.

सुप्त मनाचे तंत्र वापरुन, यशस्वी होण्यासाठी, आयुष्यात हवेहवेसे परिवर्तन येण्यासाठी, तुम्हा सर्वांना मनःपुर्वक शुभेच्छा!

धन्यवाद!वाचनकट्टा...

Manachetalks

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

5 thoughts on “जागृत मन आणि सुप्त मन यांची शक्ती वापरून यशस्वी होण्याचं तंत्र…”

  1. खूपच छान… खूप सोप्या शब्दांत आणि सोप्या भाषेत छान माहिती दिली. मला याचा खूपच उपयोग होणार आहे. खरंतर मी कित्येक महिने याच माहितीच्या शोधात होते. मी याचा अनुभव माझ्या जीवनात घेतलेला आहे आणि म्हणूनच सकारात्मकतेचा वापर कसा करायचा.. आपले मन, श्वास व विचार किती महत्वाचे आहेत.. त्यांचा आपल्या आयुष्यावर कसा परिणाम होतो हे माझ्या गावातील मुलांना व हायस्कूलमधील मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करते आहे. परंतू, त्यांना समजेल अशा शब्दांत मी त्यांच्याशी संवाद साधायला कुठेतरी कमी पडत होते किंवा मी नेमकं कुठून सुरुवात करून त्यांना टप्याटप्याने शिकवून त्याची अनुभूती त्यांना कशी देवू याचाच मी विचार करत असते. खूप खूप धन्यवाद… आपले लेख मला खूपच आवडले आणि याचा वापर मी नक्कीच विदयार्थ्यांसाठी करणार आहे. खरंतर मी आतापासूनच त्याचे Visualization सुरु केले आहे. मनाचे टॉक वर मला अत्यंत मौल्यवान माहिती म्हणण्यापेक्षा अमूल्य असा खजिना मिळाला आहे. खूप आभारी आहे.

    Reply
  2. पंकज सर,
    मला तुमचे लेख खूप आवडतात.मला law of attraction चा course करायचा आहे.22 December नंतरची कोणतीही batch चालेल,
    कृपया लवकरात लवकर या course साठी संपर्क करा

    Reply
  3. धन्यवाद सर तुम्ही हे सर्व खूप सुंदर पद्धतीने सांगितले आहे,,, त्याबद्दल मी तूमचा खूप खूप आभार व्यक्त करतो।।।धन्यवाद

    Reply
  4. Very Scientific, Useful Information, Manache Talks Var Almost Saglyach Post Farach Upyukt Astat, Me Tumcha Fanach Banloy, Dhanyavaad, va Shubhechchha.

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय