आपण चवीने खातो ते व्हॅनिला आईस्क्रीम नक्की आहे तरी काय?

जगातला फक्त १ टक्के व्हॅनिला हा खऱ्या बियांपासून येतो. बाकी बाजारात सहसा मिळणार व्हॅनिला आईस्क्रीम हा व्हॅनिलाच्या नुसत्या फ्लेवर पासूनच बनलेला असतो. आपल्या आईस्क्रीम किंवा केकमधलं व्हॅनिला हे कृत्रिम असतं. १९ व्या शतकापासून संशोधनातून कृत्रिम व्हॅनिला बनवलं गेलं. आणि ते खऱ्या व्हॅनिलापेक्षा २० पटीने स्वस्त आहे.

व्हॅनिला
व्हॅनिलाच्या शेंगा

आपण व्हॅनिला आईस्क्रीम नेहमीच खातो. जगातल्या २९ % आईस्क्रीम खणाऱ्यांमध्ये व्हॅनिला हा सर्वात आवडता फ्लेवर आहे. पण आपल्याला माहित आहे का कि हे व्हॅनिला काय आहे?….. व्हॅनिला हे जगातल्या सगळ्यात महाग मसाल्यांपैकी एक आहे. किलोला ४२ हजार असा भाव असलेलं हे व्हॅनिला प्रेशिअस मेटल्सला सुद्धा मागे टाकतं. केशरानन्तर सर्वात महाग असलेला मसाला जर कुठला असे तर तो आहे व्हॅनिला.

व्हॅनिला

पंधराव्या शतकात मेक्सिकोच्या टोटोनॅक्स जमातीने व्हॅनिलाची शेती करायला सुरुवात केली. मॅक्सिकोमधल्या विशिष्ठ मधमाश्यामुळे ते उगवलं होतं. आजच्या काळात वेगवेगळ्या देशांमध्ये आपलं वर्चस्व सिद्ध करण्याचा आयाम हे जस तंत्रज्ञान आहे तसेच त्या काळात कुठल्या देशाकडे किंवा जमातीकडे मसाल्यांची असलेली पैदास यावरून त्या ठिकाणाचा बराचसा इतिहास ठरायचा आणि बदलायचा सुद्धा. ब्रिटिशांचं भारतात साम्राज्य पसरवण्याचं मूळ सुद्धा भारतात असलेली मसाल्यांची पैदास हेच तर होतं. पण व्हॅनिला हा मसाल्याचा प्रकार आपल्यापासून कोसो दूरच राहिला. राणी एलिझाबेथच्या दरबारात या व्हॅनिलाला मोठा मान होता. या मसाल्याची एंट्री आईस्क्रीम म्हणून रेसिपीबुकमध्ये एंट्री १८०५ मध्ये झाली.

व्हॅनिला
व्हॅनिलाच्या बिया

७५% व्हॅनिला हा आफ्रिकेतल्या मादागास्कर मध्ये उगवतो. २०१७ च्या चक्रीवादळात तिकडची बरीचशी शेती नष्ट झाल्यामुळे व्हॅनिलाच्या अर्थकारणाला कलाटणी मिळाली. आता हा व्हॅनिला इतका महाग असतो याचं कारण म्हणजे त्याची शेती हि काही साधी सोपी नाही. त्याचा एक वाफा उत्पन्नासाठी तयार व्हायला तब्ब्ल ४ वर्ष लागतात. व्हॅनिलाला वर्षातून एकदाच बहर येतो. फुलांचं परागीकरण हा यातला महत्वाचा टप्पा असतो. प्रत्येक फुल हे २४ तसेच फुललेलं असतं. आणि त्या काळात त्याचं परागीकरण होणं गरजेचं असतं. तिथले शेतकरी. दिवस रात्र या फुलांवर कडा पहारा ठेवतात. जर परागीकरण यशस्वी झालं तर त्याचं रूपांतर फळात म्हणजेच शेंगेत होतं. आणि या शेंगा हे खरे व्हॅनिला असते. या शेंगांमध्ये हजारो बारीक बारीक बिया असतात. या प्रत्येक शेंगेवर नाव टाकणे हाही त्यांच्या कामाचा एक भाग असतो. या १ किलो बिया तयार होण्यासाठी ६०० बहर यावे लागतात. आता सहाजिकच आहे इतक्या कष्टातून पिकलेलं फळ महाग असणारच. भारतात कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या राज्यांमध्ये आता व्हॅनिलाची शेती काही प्रमाणात केली जाऊ लागली.

व्हॅनिला

तर मग आपण खातो तो व्हॅनिला काय असतो?…… जगातला फक्त १ टक्के व्हॅनिला हा खऱ्या बियांपासून येतो. बाकी बाजारात सहसा मिळणार व्हॅनिला आईस्क्रीम हा व्हॅनिलाच्या नुसत्या फ्लेवर पासूनच बनलेला असतो. आपल्या आईस्क्रीम किंवा केकमधलं व्हॅनिला हे कृत्रिम असतं. १९ व्या शतकापासून संशोधनातून कृत्रिम व्हॅनिला बनवलं गेलं. आणि ते खऱ्या व्हॅनिलापेक्षा २० पटीने स्वस्त आहे.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

वाचण्यासारखे आणखी काही….

खगोल / अंतराळ
पुस्तक परिचय

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय