बचत म्हणजे सन्मानाने जगण्याचा सोपा मार्ग…. बघा पटतंय का?

अमेरिकेतल्या ‘फर्स्ट फेडरल सेव्हिंग्स अँड लोन असोसिएशन’ ह्या सर्वात जुन्या आर्थिक संस्थेने पुर्वी एक जाहिरात केली. त्यात लोकांनी बचत कशी आणि का केली पाहिजे ह्याबद्दल दैनंदिन आयुष्यातल्या सवयी आणि जीवनशैलींमधले बदल सांगितले.

काळ आणि देश कोणताही असला तरी हे सुविचार प्रत्येकाला बचत करायला आणि आर्थिकदृष्ट्या एक सुखी आणि समाधानी आयुष्य जगायला प्रवृत्त करतात.

विश्वास ठेवा अथवा नका ठेऊ, तुमची बचत तुमच्या उठण्या-बसण्याच्या, चालण्या-बोलण्याच्या पध्द्तींमध्ये झळकत असते. थोडक्यात, तुमच्या शारीरिक हालचाली आणि आत्मविश्वासामधून तुमची बचत काय असेल याचा अंदाज येतो.

बचतशुन्य माणूस सतत कशाच्यातरी मागे पळताना दिसतो. समोर आलेली नोकरीची पाहिली संधी त्याला मुकाटपणे स्विकारण्याशिवाय पर्याय नसतो. आयुष्याने दिलेल्या सन्मानाच्या शिखरावर देखील तो सावधपणे बसतो. कारण येणारं छोटंसं संकटही त्याला लाचार बनवू शकतं.

बचतीशिवाय माणूस अत्यंत कृतज्ञ किंवा नम्र भासतो. अर्थात, कृतज्ञता तिच्या जागेवर योग्यच असते. पण जगत असताना अतिविनयशील माणसाच्या नशिबात पायदळी तुडवलं जाणंच असतं.

याउलट, हाताशी बचत असणारा माणूस समाजात ताठ मानेनं, आत्मविश्वासपूर्ण वावरतो. चालून आलेल्या संधीमागे न धावता त्यांची योग्यायोग्यता तो निवांतपणे तपासू शकतो. म्हणजेच, आर्थिक संकटांमागे न धावता, विवेकी विचार करण्याची संधी त्याला मिळते.

तत्त्वांशी तडजोड करावी लागणारी नोकरी झिडकारण्याची हिम्मत तोच करू शकतो, ज्याच्या गाठीशी बचतीची जमा पुंजी आहे. म्हणून त्याला प्रामाणिकपणा आणि तत्वांशी तडजोड करावी लागत नाही. नोकरी जाण्याची भीती नसल्याने ही माणसं स्पष्ट मतं द्यायला घाबरत नाहीत. आणि असे निर्भीड कर्मचारी कंपनीला लाभदायक ठरतात व बढतीसाठी पात्र असतात.

माणसं अन्न, वस्त्र, निवारा अशा मुलभूत गरजांच्या चौकटीत इतकी अडकतात की त्यांची आयुष्यात हवी असणारी दूरदृष्टी मरून जाते. तत्काळ आर्थिक फायदा देणाऱ्या गोष्टींमागे धावण्यातच त्यांना धन्यता मानावी लागते. बचतीची सवय नसल्याने आयुष्याचा राहाटगाडा असाच चालू राहतो.

बचतशीर मनुष्य घर, नातेवाईक यांच्यासाठी दानशूर कर्णाची भूमिका बजावतो.मित्र असोत, अपरिचित, किंवा शत्रू, कोणत्याही व्यक्तीसमोर ताठ मानेनं नजर रोखून वावरण्याची धमक या माणसांमध्ये असते. आणि यामुळेच त्याचं व्यक्तिमत्व आकाराला येतं.

“बचत करावी इतका आमचा पगाराच नाही!” ही पळवाट तशी सोपी.

पण खरं सांगायचं तर, तुमच्या पगाराच्या आकाराचा बचतीशी काही एक संबंध नाही. संपूर्ण पगार खर्च करण्याची सवय हातावरचं पोट असणाऱ्याप्रमाणे अवाढव्य पगार असणाऱ्यांना ही नडते, आणि ते गरजांच्या चक्रव्युहात अडकले जातात.

अमेरिकन बँकेचे उच्च पदाधिकारी (डीन) जे. पी. मोर्गन एका दलालास सल्ला देताना म्हणाले, “तुमचा रोजचा वायफळ खर्च बचतीच्या रुपात साठवला तर आयुष्यची धावपळ टाळली जाऊ शकते.

विल रॉजर म्हणतात, “ कर्ज काढून उद्याच्या पगारावर जगणाऱ्या अभिनेत्याच्या संगतीपेक्षा, कालच्या बचतीवर भागवणाऱ्या द्वारपालची संगत मी पसंत करेन.”

शिक्षण, घर, वृद्धापकाळ अशा कोणत्याही कारणासाठी तुम्हाला पैसा लागणार नसेल तरी निदान तुमच्या आत्मविश्वासासाठी तरी तुम्ही बचत केलीच पाहिजे.तुमच्या बचतीच्या स्थितीवरून तुमची समाजातली पत ठरणार आहे हे नक्की!

सौजन्य : अर्थसाक्षर.कॉम

वाचण्यासारखे आणखी काही…..

गणपती बाप्पाकडून आर्थिक नियोजन (Financial planning) शिकूया.
आर्थिक ज्ञानमोती (Pearls of financial wisdom) भाग १

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय