ज्येष्ठ नागरिक व्यक्तींना करात सूट देणारे नवीन कलम ८० टीटीबी (80 TTB )

८० टीटीबी (80 TTB)

अर्थसंकल्प २०१८-१९ मध्ये नवीन कलम ८० टीटीबी (80 TTB) समाविष्ट करण्यात आले  आहे. या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना बँकेतील ठेवींवरील व्याजाच्या उत्पन्नावर  ५०,००० रुपये मर्यादेपर्यंत कर सूट दिली जाणार आहे. ही सुधारणा वित्तीय वर्ष २०१८-१९/निर्धारण वर्ष २०१९-२० पासून लागू करण्यात येईल.

महत्वाचे मुद्दे

 • ६० वर्षं आणि त्यापेक्षा जास्त वयाची व्यक्ती ही ज्येष्ठ नागरिक व्यक्ती संबोधली जाते.
 • हा लाभ ६० आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या रहिवासी ज्येष्ठ नागरिक व्यक्तीला घेता येईल.
 • बँकेत  गुंतवणूक केलेल्या ठेवींतून मिळणारे व्याज हे करपात्र असते. ज्येष्ठ नागरिक व्यक्तींना ८० टीटीए (80 TTA) अंतर्गत १०,००० रुपये मर्यादेपर्यंतच्या व्याजावरील अथवा ८० टीटीबी (80 TTB) अंतर्गत ५०,००० रुपये मर्यादेपर्यंतच्या व्याजावरील कर सुटीचा लाभ घेता येईल.
 • या कलमान्वये ८० टीटीए (80 TTA)) मिळणारी कर सूट ही फक्त बचत खात्यातून मिळणाऱ्या व्याज उत्पन्नावरच मिळेल.
 • कलम ८० टीटीबी (80 TTB) मधील प्रस्तावित कर सूट मात्र बँक, पोस्ट ऑफिस, सहकारी बँकांमध्ये गुंतवणूक केलेल्या बचत खाते ठेवी, मुदत ठेवी, आवर्ती ठेवी (RD)या सर्व ठेवीतून मिळणाऱ्या व्याज उत्पन्नावर मिळेल.
 • ज्येष्ठ नागरिक असलेल्या व्यक्तीला कलम  ८० टीटीए (80 TTA) अथवा कलम ८० टीटीबी (80 TTB) या दोन्हीपैकी कोणत्याही एकाच कर सुविधेचा लाभ घेता येईल.
 • ठेवीतून प्राप्त होणारे प्रत्यक्ष व्याज किंवा ५०,००० रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल त्यावर कपात केली जाईल.
 • याचाच अर्थ जास्तीत जास्त ५०,००० रुपयांपर्यंतच कर सूट मिळू शकेल. व्याजातून मिळालेले उत्पन्न हे रू. ५०,००० पेक्षा जास्त असल्यास करपात्र असेल.
 • मात्र जर एखाद्या जेष्ठ नागरिक व्यक्तीचे व्याजातून मिळणारे उत्पन्न हे ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर ती व्यक्ती फॉर्म १५ ह (15H) दाखल करून टीडीएस कपात टाळू शकते.

या कर सुटीसाठी अपात्र असणारे घटक

 • हिंदू अविभक्त कुटुंबातील व्यक्तीला कलम  ८० टीटीबी (80 TTB) चा लाभ घेता येणार नाही.
 • अ-रहिवासी ज्येष्ठ नागरिक व्यक्तीला कलम ८० टीटीबी (80 TTB) चा लाभ घेता येणार नाही.
 • ज्येष्ठ रहिवासी नसलेल्या व्यक्तीलादेखील कलम  ८० टीटीबी (80 TTB) चा लाभ घेता येणार नाही.
 • फर्म, व्यक्तींच्या संघटना (Association of Person/ AOP), व्यक्ति मंडळ (The Body of Individual/ BOI)यापैकी कोणत्याही घटकाच्या वतीने एखाद्या ज्येष्ठ नागरिक व्यक्तीने ठेव गुंतवणूक केली असेल तर त्या ठेवीतून मिळणाऱ्या व्याजावर कलम  ८० टीटीबी (80 TTB) अंतर्गत प्रस्तावित कर सुटीचा लाभ घेता येणार नाही.
 • ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसारख्या लहान स्वरुपाच्या बचत योजनांवर ही ५०,००० रुपये मर्यादेपर्यंतची कर सूट मिळेल का याबाबत कोणतीही स्पष्टता नाही.
 • प्रधान मंत्री वय वंदन योजना यासारख्या योजनेसाठी देखील ८० टीटीबी (80 TTB) लागू नसेल.

कलम  ८० टीटीए (80 TTA) व कलम  ८० टीटीबी (80 TTB)मधील तुलनात्मक फरक

कलम  ८० टीटीए (80 TTA)

कलम  ८० टीटीबी (80 TTB)

पात्रता

सर्व करदात्यांसाठी उपलब्ध

फक्त ज्येष्ठ नागरिक व्यक्ती या कर सुटीचा लाभ घेऊ शकते.

कर सूट

गुंतवणूक ठेवीवरील १०,००० रुपये मर्यादेपर्यंतचे व्याजाचे उत्पन्न

गुंतवणूक ठेवीवरील ५०,००० रुपये मर्यादेपर्यंतचे व्याजाचे उत्पन्न

पात्र उत्पन्न

पोस्ट ऑफिस आणि बँकेत गुंतवणूक केलेल्या बचत खात्यांच्या ठेवींवरील व्याजातून  मिळणारे उत्पन्न.

पोस्ट ऑफिस आणि बँकेत गुंतवणूक केलेल्या मुदत ठेव, आवर्ती ठेव आणि बचत खाते ठेवीवरील व्याजातून मिळणारे उत्पन्न.

करपात्र उत्पन्न आणि कलम ८० टीटीए (80 TTA)  व कलम  ८० टीटीबी (80 TTB)अंतर्गत मिळणारे कर लाभ

घटक

ज्येष्ठ नागरिक नसलेल्यांचे उत्पन्न

ज्येष्ठ नागरिकांचे उत्पन्न

रू. ८०००

मुदत ठेवीवरील व्याज

रू. १०००००

रू. १०००००

आवर्ती खात्यावरील व्याज

रू. १०००००

रू. १०००००

इतर उत्पन्न

रू. १५००००

रू. १५००००

एकूण उत्पन्न

रू. ३, ५८,०००

रू. ३, ५८,०००

वजा- कलम  ८० टीटीए (80 TTA) नुसार कपात

रू. ८०००

अपात्र

वजा- कलम ८० टीटीबी (80 TTB) नुसार कपात

लागू होत नाही.

रू. ५००००

करपात्र उत्पन्न

रू. ३, ५०,०००

रू. ३, ०८,०००

वरील तक्त्यातून हे लक्षात येते की कलम  ८० टीटीबी (80 TTB) मुळे ज्येष्ठ नागरिकांना इतर करदात्यांपेक्षा अधिक लाभ मिळेल. साहजिकच अर्थसंकल्प २०१८-१९ मध्ये प्रस्तावित ही सुधारणा ज्येष्ठ नागरिक व्यक्तींसाठी एक आनंदाची बातमी आहे.

सौजन्य : www.arthasakshar.com

वाचनकट्टा...

वाचनकट्टा- गुंतवणुकीसंबंधित मराठी पुस्तकांचा…

वाचण्यासारखे आणखी काही…..

गणपती बाप्पाकडून आर्थिक नियोजन (Financial planning) शिकूया.
आर्थिक ज्ञानमोती (Pearls of financial wisdom) भाग १


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!