ओल्या नारळापासून खोबरेल तेल बनवण्याची घरगुती पद्धत

आपल्या संस्कृतीत सण, उत्सवांची रेलचेल असतेच. ओलं नारळ प्रत्येक उत्सवात मानाचं स्थान घेऊन असतंच असतं. या ओल्या नारळापासून Coconut Oil खोबरेल तेल कसे बनवता येते त्याची कृती आज आपण बघू.

ओल्या नारळापासून Coconut Oil खोबरेल तेल बनवण्याची कृती…

Coconut half cut
👨‍🍳 ओले नारळ अर्ध्या अर्ध्या भागात फोडून घ्यावेत.
Coconut Oil खोबरेल तेल
👨‍🍳 फोडलेल्या नारळाचा बारीक खव करून घ्यावा.
Coconut Oil खोबरेल तेल
👨‍🍳 खवलेले नारळ मिक्सर ग्राइंडर मधून बारीक करून घ्यावे. गरजेपुरते पाणी घालावे.
Coconut Oil खोबरेल तेल
👨‍🍳 मिक्सर ग्राइंडर मधून काढलेले नारळाचे दूध गाळणीतून तसेच कापडातून गाळून घ्यावे.
Coconut Oil खोबरेल तेल
👨‍🍳 गाळून घेतलेले नारळाचे दूध एक रात्रभर भांड्यामध्ये ठेवावे. आणि सकाळी चित्रात दाखवल्याप्रमाणे त्यावर जमलेले लोणी चमच्याने काढावे.
Coconut Oil खोबरेल तेल
👨‍🍳 आपण गाईचे किंवा म्हशीचे तूप बनवताना लोणी जसे कढवतो तसे हे कोकोनट बटर बारीक आचेवर कढवावे.
Coconut Oil खोबरेल तेल
👨‍🍳 तळाशी बेरी जमा होऊन खोबरेल तेल तयार होईल.
Coconut Oil खोबरेल तेल
👨‍🍳 हे आहे तयार होणारे Coconut Oil खोबरेल तेल

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.