गुंतागुंतीचे प्रश्न पण उत्तरं मात्र साधी…. (प्रेरणादायी लेख)

प्रेरणादायी लेख

मित्रांनो, ‘आकर्षणाचा सिद्धांत जाणणारे’ हा माझ्यासाठी फक्त एक व्हॉट्सएप ग्रुप नाही, हा ग्रुपला मी माझा परिवार मानतो.

ह्या ग्रुपमधील सर्व सदस्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याची आणि त्यांना त्यांच्या इच्छित ध्येयाकडे घेऊन जाण्याची जबाबदारी मी स्वेच्छेने स्वीकारली आहे.

ह्या ग्रुपमध्ये सगळेजण आपापले प्रॉब्लेम्स मनमोकळेपणे माझ्यासोबत शेअर करतात. काही जणांना आपले इन्कम वाढवायचे आहे.

कूणी भरपुर पैसा कमवुनही समाधानी नाही, कोणाला सोशल साईटच्या व्यसनातुन बाहेर पडायचे आहे. कूणी लवकरात लवकर लग्न जमण्यासाठी आतुर आहे.

कोणाला नौकरी आणि छोकरी दोन्ही पाहीजे आहे. कोणी आपल्या करीअरची नव्याने सुरुवात करण्यासाठी उत्सुक आहे, कोणी आपल्या जीवनसाथीला आकर्षित करण्यात प्रयत्नशील आहे.

एक युवती आहे, ती गव्हर्नमेंट जॉब साठी परिश्रम घेतेय.

एका ताईंना आपला एजन्सी लाईनचा व्यवसाय इतक्या उंचीवर घेऊन जायचाय की मुबलक पैसा उपलब्ध होईल, एका ताईंना गोंडस बाळ हवयं.

एका ताईंनी घरगुती हिंसाचार आणि अनेक इतर अडचणींना हसत हसत सहन केलयं, आता त्यांना हसताखेळता, आनंदी परीवार आणि स्वतःच्या मालकीची कंपनी उभी करायची आहे.

एका ताईंच्या अजुबाजुचे लोक त्यांना त्रास देतात, पाणउतारा करतात, अशांना हॅंडल कसे करावे, हे त्यांना समजत नाही.

तर एक ताई खुप आनंदी जीवन जगतात, तरीपण त्यांना नवनवीन गोष्टी जाणून घ्यायचं कुतुहुल आहे.
अशासारखा काही समस्या तुमच्याही आयुष्यात असतील.

मित्रांनो, प्रत्येकाचे प्रश्न वेगवेगळे आहेत, कॉम्प्लेक्स आहेत, पण जर मी सांगितलं की तुमच्या सगळ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे खुप सोपी आहेत, तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल?

तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल.

कारण विद्यार्थी तेव्हाच विद्या प्राप्त करतो, जेव्हा त्याला विश्वास असतो की माझ्यापेक्षा माझ्या गुरुजींना काहीतरी जास्त माहीत आहे

आणि माझ्या अडचणी सोडवण्यासाठी ते मला नक्की मदत करतील.

तुमच्या सर्व जटील गुंतागुंतीच्या प्रश्नांवर मी सोपी उत्तरे सांगत आहे, लक्ष देऊन वाचा, पटलं तर अंमलात आणा.

टेंशन घेऊन, चेहरा पाडून, उदास जगण्यासाठी, आलेला दिवस ढकलण्यासाठी नाही, खळखळुन हसण्यासाठी आणि हसवण्यासाठी, हलकंफुलकं होवुन बागडण्यासाठी, थुईथुई कारंजं बनुन खळखळ होण्यासाठी तुमचा जन्म झाला आहे, स्वतःचं खरं स्वरुप ओळखा, कंदीलावरची काजळी साफ करा, आतला दिवा स्पष्ट दिसु लागेल.

२) योग्य दिशेने प्रवास करा.

मित्रांनो, तुमच्या प्रत्येकाच्या मनात काहीनाकाही तीव्र इच्छांनी जन्म घेतला आहे, त्या सगळ्या पुर्ण होण्याच्या रस्त्यावर आपण निघालो आहोत, पण त्याआधी तुम्हाला माझ्याशी काही प्रॉमिस करावे लागणार आहेत.

समजा, तुम्हाला लातुरहुन मुंबईला जायचे आहे, पण तुम्ही चुकुन नागपुरच्या गाडीत बसाल तर मूंबईपासुन दुर जाल की जवळ? दुर जाल.

अगदी तसेच तुमच्या इच्छा लवकरात लवकर पुर्ण व्हाव्यात अशी इच्छा मनात ठेवुन तुम्ही जर उदास रहाल, चीडचीड कराल, रागात बोलाल, आदळाआपट कराल, भीती बाळगाल, एखाद्याचा द्वेष कराल, एखाद्याची ईर्ष्या कराल, भुतकाळाचा पश्चाताप कराल किंवा भविष्याची काळजी कराल, तर तुम्ही स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने प्रवास करत आहात की त्यांच्या विरुद्ध दिशेने प्रवास कराल?

वर्तमानात तुम्ही फक्त आणि फक्त आनंदी रहा, कूठल्याही बऱ्या वाईट गोष्टींचा तुमच्या मनावर कसलाच परिणाम होवु द्यायचा नाही.

हर्ट करणाऱ्या, दुखावणाऱ्या आणि विनाकारण त्रास देणाऱ्या लोकांपासुन दुर रहा, अशा बातम्यांपासुन दुर रहा, अशा व्हॉटसएप ग्रुप पासुन आणि फेसबुक पेज पासुन दुर रहा, कोणाशी अजिबात वादविवाद घालु नका.
कमी बोला, आवश्यक तितकाच संवाद साधा,

फक्त स्वतःची कंपनी एंज्यॉय करा. मग बघा, मन किती शक्तिशाली अनुभव करतं ते!

कधीकधी मनात निगेटीव्ह विचारही येतील, त्याकडे दुर्लक्ष करायला शिका. जसं रस्त्यावर चालताना आपण आपल्याच धुंदीत चालतो, तसं फक्त आपल्याचं धुंदीत जगायला शिका.

छान गाणी ऐका, स्वतःचे जुने छंद आठवा, त्यात मन रमवा, मनाला मजबुत आणि चुंबकीय बनवण्यासाठी मजबुत शरीरही हवं, त्यासाठी रोज सकाळी उठुन वॉकिंगला जा, मस्त बॉडी थकेपर्यंत व्यायाम करा, योगासने करा, दररोज न चुकता ध्यान करा, शांत, निसर्गरम्य मंदिरात जाऊन पॉझीटीव्ह व्हायब्रेशन्स अनुभवा.

३) थोडेच वाचावे, पण आचरणात आणावे.

नुसते मॅसेज वाचुन आयुष्य बदलणार नाही, शक्ती शब्दांमध्ये नाही, तुमच्या मनात दडलेली आहे, एकेक वाक्य समजेपर्यंत हळुहळु लेख वाचा, पुन्हा पुन्हा वाचा, तुम्ही सहमत असाल किंवा नसाल, पण तुमचं हित कशात आहे, ते तुम्हाला निश्चित समजतं.

उद्याच्या दिवसाला सामोरं जाण्याची तयारी आजच पुर्ण करा, व्हिज्वलायजेशन टेक्निक वापरा. चमत्कार होवुन अवघड टास्कही सहज पुर्ण व्हायला लागतील.

४) स्वतःचं सहावं इंद्रिय जागृत करा.

खुप कमी वेळात खुप दैदिप्यमान यश मिळवणाऱ्या प्रत्येकाने आपलं सहावं इंद्रिय जागृत केल्याचं दिसेल. त्यात प्रचंड ताकत असते.

‘प्राणायाम’ म्हणजे श्वास-उच्छवासाचा लयबद्ध क्रम,

‘ध्यान’ म्हणजे काही वेळासाठी स्वतःच्या अस्तित्वाला विसरुन, त्या अनंत शक्तिशी तादात्म्य पावणे,

‘त्राटक’ म्हणजे एका वस्तु कडे काही मिनीटे पापणी न लवता पाहत विचारशुन्य स्थितीत जाणे,

‘यम-नियम-प्रत्याहार’ म्हणजे सात्विक जीवनशैलीचे आचरण करत परमपित्याला शरण जाणे अशा मार्गांनी सहावे इंद्रिय जागृत होते. सहावं इंद्रिय जागृत झाल्यावर पुढे काय होणार याचे स्पष्ट संकेत मिळु लागतात.

नवनवीन कल्पनांचा जणु काही पाऊसच पडु लागतो, इतक्या प्रचंड उर्जेचा संचार होऊ लागतो, की आजुबाजुचे लोक आपल्याकडे बघुन आश्चर्य व्यक्त करु लागतात. कुठल्याही कामात मन चटकन एकाग्र होवु लागतं, इतरांना मदत करण्याची, त्यांना अडचणीतुन बाहेर काढण्याची इच्छा होवु लागते.

५) मिळालेल्या प्रत्येक गोष्टीसाठी सतत आभारी रहा.

एकतर तर तुमचं मन चिंता, दुःख आणि अनावश्यक विचार यांनी भरलेलं ‘भारी’ असतं,

नाहीतर तुम्ही आनंदी, चिंतामुक्त, रसरसलेलं जीवन जगणारे आणि आयुष्यावर प्रेम करणारे तुम्ही आभारी असता!..

रोजच्या दिवसाला सुरु करताना, आणि रात्री झोपताना, तुम्ही ‘Thank you’ म्हणता की नाही?….

‘थॅंक यु’, आभार आणि शुक्रीया, ‘हे जगातले सर्वात महत्वाचे, सर्वात आनंदाचे आणि सर्वात जादुमय शब्द आहेत.’

मनापासुन ‘थॅंक यु’ म्हणणं म्हणजे मिळालेल्या चांगल्या गोष्टी आठवुन पुन्हा पुन्हा आनंदी होणं….

प्रत्येक महान परंपरा सांगते,

“जो सतत ‘थॅंक यु’ म्हणतो, त्यालाच ब्रह्मांड आणखी देतं..”

“आणि जो मिळालेल्या गोष्टींबद्दल आभारी नसतो, त्याच्याकडुन ते काढुन घेतलं जातं…”

जवळ असलेल्या, मिळालेल्या गोष्टींबद्दल आभार व्यक्त करणं म्हणजे ब्रम्हांडाला पॉझीटीव्ह व्हायब्रेशन्स पाठवणं,

“आणि तक्रारी करणं म्हणजे स्वत;चच अजुन नुकसान करुन घेणं..”
आभार मानायला, आनंदी रहायला पैसे लागत नाहीत, लागतं फक्त शुद्ध मन, आणि थोडा वेळ!..

तेव्हा आज, आत्ता लगेच, मन लावुन एक आभारपत्रिका बनवा, दिल्या गेलेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीबद्दल देवाचे मनापासुन आभार माना.

तुम्हा सर्वांच्या जीवनात सुखाचा आणि आनंदाचा वर्षाव व्हावा, आणि उद्याच्या दसऱ्याच्या शुभेच्छेसह, मनःपुर्वक आभार!

धन्यवाद!

वाचण्यासारखे आणखी काही…..

यशस्वीपणे अपयश पचवण्याची कला- Elon Musk

मनाचेTalks च्या लेखांबद्दल वाचकांच्या प्रतिक्रिया….

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

6 Responses

  1. shobha R kadu says:

    मला सकारात्मक उर्जा या ग्रुप ला जाॅइन व्हायचे आहे मला तुमचे लेख खुप आवडतात ,मार्गदर्शक वाटतात

    • https://chat.whatsapp.com/I88xtjj261l9JZIzPsdgee

      मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स विनामूल्य मिळवण्यासाठी👆वरती दिलेले ग्रुप लिंक क्लिक करून त्यामध्ये जॉईन व्हा. या ग्रुपमध्ये फक्त ऍडमिन पोस्ट करू शकणार असल्याने ग्रुपमध्ये अपडेट्स शिवाय काही इतर असणार नाही.

  2. pankaj says:

    मनःपुर्वक आभार, ताई!

    मनाचे टॉक्स यांच्याशी संपर्क करा.

  3. Arpit Naskari says:

    साहेब तुमचे आभार कसे मानू हेच कळत नाही, मी आयुष्याच्या खुप कठीण काळातुन जातो आहे माझे मन भरकटले होते पण तुमचे लेख वाचून माझा संकटांकडे पाहण्याचा दृष्टिकोन च बदलत चालला आहे
    तुम्हाला जे जे हव ते ते मिळो आणि आपल्यास दीर्घायुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏

  4. SUREKHA says:

    VERY NICE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!