रागातल्या ऊर्जेचा सकारात्मक वापर कसा करावा?

प्रश्न – सर, मला राग खुप लवकर येतो, नंतर मला पश्चातापही होतो, मला माझी ही सवय बदलायची आहे, ही सवय बदलण्यात आपण माझी मदत करु शकता का?

XXXजी, सर्वप्रथम आपले मनःपुर्वक अभिनंदन, कारण तुम्ही हे मान्य केलेत, आणि तुम्ही आयुष्यात नवे सकारात्मक बदल घडवण्यासाठी उत्सुक आहात, सज्ज आहात, त्यामुळे अर्धा विजय तर इथेच झाला.

मी चुकतोय, हे कळणे, म्हणजे आपोआपच पुढची चुक टाळणे; नाही का?

आता तुमच्या प्रश्नाकडे वळुया, मी तर म्हणेन, दाग अच्छे है, च्या धर्तीवर राग चांगला असतो, असे म्हणणे योग्य ठरेल.

उदा. आपल्याला कचर्‍याचा राग येतो, म्हणुन तर आपण स्वच्छता ठेवतो, आपल्याला गरीबीचा तिटकारा असतो म्हणुन आपण रोज कामावर जातो, लोकांनी केलेल्या अपमानाचा आपल्याला राग येतो म्हणुन तर, इच्छा असो वा नसो, आपण आपलं काम चोखपणे पार पाडतो!

राग ही एक उर्जा आहे, आपल्यालाही राग येतो आणि असामान्य लोकांनाही राग येतो, पण ते लोक आपल्या रागातुन निर्माण झालेल्या उर्जा व्यर्थ घालवत नाहीत, तिचा सकारात्मक वापर करुन विश्व बदलुन टाकतात.

गांधीजींना जेव्हा रेल्वेतुन बाहेर फेकुन दिलं तेव्हा त्यांना प्रचंड राग आला, इतका की त्यांनी ना ना खटपटी करुन इंग्रजांनाच देशाबाहेर हाकलुन लावलं!

मार्टीन ल्युथर किंगला राग आला आणि त्याने अमेरीकाच बदलुन टाकली.

नेल्सन मंडेलाला कृष्णवर्णीयांवर होणार्‍या अन्यायाची चीड आली आणि त्याने अफ्रिका हादरुन टाकली.

आंबेडकरांनी तेच केलं, शिवाजी महाराजांनी केलं, त्यांनी आपला राग एकदाच व्यक्त होवुन शांत होऊ दिला नाही, तो निखारा त्यांनी आपल्या हृदयात सतत पेटता ठेवला, आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यातुन मिळलेलं इंधन आपल्या स्वप्नपुर्तीसाठी वापरलं!..

ते जे करु शकतात ते आपणही करु शकतो की!

फालतु गोष्टींवर रागराग करुन आपली बहुमुल्य उर्जा वाया घालवण्यापेक्षा तिचं रुपांतर तीव्र इच्छाशक्तीमध्ये करायला शिकणं, हीच खरी आनंदाची आणि यशाची गुरुकिल्ली आहे.

जिथं राग येतो अशा परिस्थितीला हाताळण्यासाठी काही टिप्स देत आहे.

१) स्वीकार करा.

समजा, तुम्ही कॉम्पुटरवर खुप महत्वाचं काम करत आहात, आणि लाईटस गेले, आता तुम्ही चिडचिड करुन काही फायदा आहे का? शिव्या देऊन, डोकं खराब केल्याने फायदा काहीच होणार नाही, झालं तर नुकसानच होईल, म्हणुन ‘लाईट गेली’, याचा स्वीकार करा, आणि दुसरे एखादे काम शोधा, त्यात रमामाण व्हा!, त्याचा आनंद घ्या!

असचं समजा, तुम्ही ट्रॅफीक जॅममध्ये अडकला आहात, मग आता किरकिर करुन कर्कश हॉर्न वाजवुन, आजुबाजुच्यांशी भांडुन काय साध्य होणारे? त्यापेक्षा कारमध्ये मस्त गाणे लावा, आणि आनंद घ्या!

२) स्वतःला दररोज सुधारा. सिद्ध करा.

कोणी तुमची चुक नसताना अपमान केला, फसवले किंवा भांडले तर त्यावर जास्त विचार करुन वेळ वाया घालवणं, म्हणजे मुर्खपणा आहे, नको त्या आठवणी कुरवाळत बसायचे नसते, त्या विसरायच्या असतात पण त्यातुन कमवलेला अनुभव, मिळालेला धडा मात्र आयुष्यभर आपोआप लक्षात ठेवायचा.

३) चुप्प बसा. विसरा.

कधी कधी आपल्याला दुखावणारे आपलेच लोक असतात, अशा लोकांना जबर प्रत्युत्तर देऊन आपणच घायाळ होतो, अशा जखमा होतात, ज्या भरण्यासाठी आयुष्य जावे लागते. म्हणुन अशा वेळी मौन पाळणे सोयीस्कर ठरते.

आईवडील, भाऊ बहीण, बायकोमुले, जिवलग मित्र, जवळचे नातेवाईक, कर्मचारी, सहकारी, भागीदार, ग्राहक यांच्याशी लढाई करुन आपण जिंकलो तरी त्या युद्धात आपलेचं लोक हरलेले असतात, आपल्या शब्दांनी रक्तबंबाळ झालेले असतात.

अशा विजयश्रीचा आनंद साजरा तरी कसा करावा?

म्हणुन काही ठिकाणी गप्प राहणं, तिथुन निघुन जाणं आणि मौन पाळणं, श्रेष्ठ असतं!

४) आभार मानुन आनंदी व्हा!

ज्या व्यक्तिचा राग येतोय, त्याच्यात काही चांगले गुणसुद्धा आहेत, त्याने कधी तुम्हाला मदत सुद्धा केलीय, ते आठवुन त्याचे आभार माना. राग पळुन जाईल.

५) हसा!

कितीही वाईट परिस्थीती असो, त्याकडे पाहुन हसा, विनोद बनवा, खळखळुन हसा, मजा घ्या, दुःखाची तीव्रता नाहीशी होईल!

येणार्‍या प्रत्येक दिवशी तुमची उर्जा तुमची शक्ति बनावी, अशा मनःपुर्वक शुभेच्छा!..

धन्यवाद!

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

4 thoughts on “रागातल्या ऊर्जेचा सकारात्मक वापर कसा करावा?”

  1. Unbreakable plastic product cha business aahe bhavishyat yala scope rahil ka aata ha business success karnyasathi upay sanga please

    Reply
  2. Sir tumchya tips khup ani khup usefull astat pan jast divas kas chitakun rahaych he jamat nhi .me prayant karto pan pan overload zal ki gapp basav lagat chid chid karat.

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय