रामसेतू- मानवनिर्मित असल्याचे पुरावे

ह्यातील राजकारणाचा आणि आपल्या भावनांचा भाग बाजूला ठेवून रामसेतू म्हणजे काय हे समजून घेणे खूप गरजेचे आहे.

सायन्स ह्या दूरचित्रवाणी वरील वाहिनीने रामसेतू वर कार्यक्रम करताना रामसेतू हा मानवनिर्मित असल्याचे म्हणताच एकच धुराळा उडाला आहे. डिस्कवरी चॅनलची असलेली ह्या वाहिनीने हे मांडताना काही शास्त्रीय आधार घेतले आहेत. ह्यातील राजकारणाचा आणि आपल्या भावनांचा भाग बाजूला ठेवून रामसेतू म्हणजे काय हे समजून घेणे खूप गरजेचे आहे.

रामसेतू म्हणजे ज्याला “एडम्स ब्रिज”(Adam’s Bridge) असही म्हंटल जातं. भारताच्या पामबन बेटापासून ज्याला रामेश्वर बेट असही म्हंटल जातं ते श्रीलंकेच्या मन्नार बेटापर्यंत चुनखडीच्या दगडांची एक रांग आहे. ही रांग ५० किमी लांबीची असून ती “मन्नार” ची सामुद्रधुनी आणि “पाल्क स्ट्रेट” ला वेगळ करते. इतकी समुद्रात खोल असून पण इथल्या पाण्याची खोली ही १ ते १० मिटर ( ३ ते ३० फुट ) इतकीच आहे. ह्या छोट्या खोलीमुळे इकडून नौकांच वहन करण्यात अडचणी येतात. इतिहासातील नोंदींप्रमाणे १५०० व्या शतकापर्यंत रामसेतू हा पाण्याबाहेर होता. त्यावरून चालत जाता येत असे. १४८० साली आलेल्या वादळामध्ये समुद्र आत शिरल्याने पाण्याखाली गेला असावा अस म्हंटल जातं.

हिदू धर्माच्या रामायणात ह्या रामसेतू चा उल्लेख असून रामाने लंकेत जाण्यासाठी हा बांधला अस सांगितलं आहे. रामसेतू हा स्थापत्यशास्त्राचा आणि रामायणाच्या इतिहासातील नोंदीचा एकमेव साक्षीदार आहे अस म्हंटल जातं. ह्यावर संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांच असं म्हणणं आहे कि ह्याच्या दगडांवर कोरलेल्या तारखांवरून ह्याचं वय ७००० वर्ष आहे जे कि रामसेतू मध्ये आढळून येतात. हे वय रामायण ज्या काळात घडल त्याच काळाशी मिळतंजुळतं आहे. आता हे मानवनिर्मित कसं आहे ह्याचा संदर्भ असा दिला जातो. इथली वाळू किंवा एक नैसर्गिक उंचवटा जो ह्या रामसेतू च्या खाली आहे. त्या उंचवट्या किंवा तिथल्या दगडांचं, मातीच वय हे अवघ ४००० वर्ष आहे. म्हणजेच ज्या दगडांनी हा सेतू बनला आहे ते दगड दुसरीकडून कुठून तरी आणून त्यांची ब्रिज प्रमाणे रचना केली गेली आहे. म्हणजेच हा सेतू मानवनिर्मित आहे ह्यावर शिक्कामोर्तब होते. आता हे दगड कसे आणले आणि हे काम कस केल गेल असेल हे अजून गुलदस्त्यात आहे. पण संशोधकांच्या मते त्या काळी असा सेतू बांधण हे अभियांत्रिकी, विज्ञान, स्थापत्यशास्त्र ह्याचा एक चमत्कार असेल ह्यात वाद नाही.

Pyumais Stone
एक २० डॉलर ची नोट प्युमाईस दगडाचं वजन पेलताना

नासाच्या उपग्रहांनी जे टीपल आहे तो ब्रिज किंवा सेतू हा नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे. ह्याला दुजोरा देणारा अजून एक चमत्कार म्हणा वा नैसर्गिक रचना म्हणा इकडे आढळून येते. रामायणात सांगितल्या प्रमाणे समुद्रात टाकलेले दगड हे पाण्यावर तरंगत होते. वानारसेनेनी श्रीराम लिहून टाकलेला प्रत्येक दगड हा तरंगायला लागला आणि त्यावरून मग वानरसेनेने लंकेत पाउल ठेवल अस रामायण सांगते. तर असे तरंगणारे दगड असू शकतात. ह्यामागच विज्ञान बघण हे महत्वाच आहे. तरंगणारे दगड किंवा ज्याला “प्युमाईस” अस म्हणतात ते ज्वालामुखीच्या उद्रेकात तयार होतात. ज्वालामुखीतील आतला भाग प्रचंड दाबाखाली असून त्याचं तापमान १६०० डिग्री सेल्सियस पर्यंत असते. जेव्हा हा ज्वालामुखी बाहेर येऊन हवेशी किंवा समुद्राच्या पाण्याशी संपर्क करतो तेव्हा पाण्याची वाफ तात्काळ होते. पण त्याच वेळी तापमानातील हा प्रचंड फरक लाव्ह्याला कोल्ड शॉक देतो. अचानक झालेल्या तापमानातील फरकामुळे लाव्हा तिथल्या तिथे गोठून जातो. ह्या प्रक्रियेत तयार झालेले गॅस चे बुडबुडे आतमध्ये अडकून राहतात. ह्यामुळे ह्या दगडाला स्पंज सारख बनवतात. काही प्युमाईस मध्ये ह्या बुडबुडे ९०% जागा व्यापतात. ह्या अडकलेल्या हवेमुळे किंवा रिकाम्या जागेमुळे ह्या दगडांची घनता प्रचंड कमी असते. इतकी कमी कि आत व्यापलेल्या हवेमुळे हे दगड पाण्यात टाकल्यावर काही काळ तरंगतात. जेव्हा पाणी हळूहळू हवेची जागा घेत तेव्हा हे दगड पाण्यात बुडतात.

रामसेतू ला फक्त धार्मिक आणि राजकीय चष्म्यातून न बघता त्यामागचं विज्ञान आणि त्याचं महत्व समजून घेतल तर ते रामसेतूच रक्षण आणि महत्व आबाधित ठेवेल ह्यात शंका नाही.

हे प्युमाईस किंवा तरंगणारे दगड ह्या परिसरात असून रामसेतू च्या वेळेस असे दगड वापरेले गेले असण्याची खूप शक्यता आहे. ज्याला आपण एक भावनिक आणि धर्माचा रंग दिला तरी त्यात एक विज्ञान आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. ह्या ठिकाणी समुद्रम प्रोजेक्ट आणण्याचा आधी विचार होता. ह्या ठिकाणी हिंदू धर्माच्या धार्मिक भावना असल्याने हा प्रोजेक्ट लांबणीवर पडला आहे. इकडे मानवाने हस्तक्षेप करून जर ह्या रामसेतू ला धक्का लावला तर एक विश्व आपण उद्वस्थ करणार आहोत. त्यामुळे हा सेतू रामाने बांधला हे आत्ता सांगणं अगदी कठीण असल तरी तो मानवनिर्मित आहे हे खरं आहे. तसेच तेथील खडक, सागररचना, येथील जैवविविधतेच जतन करण्याची गरज नक्कीच आहे. रामसेतू ला फक्त धार्मिक आणि राजकीय चष्म्यातून न बघता त्यामागचं विज्ञान आणि त्याचं महत्व समजून घेतल तर ते रामसेतूच रक्षण आणि महत्व आबाधित ठेवेल ह्यात शंका नाही.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय