आम्ही होमस्कूलिंग का करतोय…

होमस्कूलिंग

मी कायम या शोधात असायचे कि लहान मुलांपर्यंत कॄष्णकथा कशी पोहोचवावी. जर लहान वयातच त्यांनी याचे श्रवण केले आणि त्याप्रमाणे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी काही सोन्या सारख्या सवयी लावून घेतल्या तर त्यांचे भावी आयुष्य किती सुखकर होर्इल… या हेतूने कोणत्या विविध संधी उपलब्ध आहेत अशा शोधात असताना मी एक दिवस अरूध्दा देवी दासी ज्या इस्कॉन च्या भक्त आहेत त्यांचे होमस्कूलिंग वरचे काही लेख वाचले. तेव्हा मी गरोदरही नव्हते. पण मला ही संकलपना खूपच आवडली. मी पतींशी याबद्दल चर्चा केली.

होमस्कूलिंग

त्यांची पहिली प्रतिक्रिया होती “नाही… हे काही बरोबर वाटत नाही. आपल्या मुलासाठी आपण होमस्कूलिंग करावं असं मला नाही वाटत. यात बरेच धोके असु शकतात” तो विषय तेव्हा तिथेच संपला मग मुलगी झाल्यावर ती वर्ष भराची होर्इपर्यंत आमची या विषयावर चर्चा झाली नाही. पण तोपर्यंत त्यांनी एका वेगळ्या दॄष्टीने शाळा या विषयाकडे बघायला सुरूवात केलेली होती. शाळेत जाणाऱ्या मुलांकडे ते अधिक बारकार्इने बघु लागले होते. ते स्वत:जरी इस्कॉन मध्ये नाहीत म्हणजे त्याप्रकारे गोष्टींचे पालन वैगेरे करत नसले तरी त्यांचा मला एक अन् एक गोष्टीला पाठिंबा असतो. या जीवनशैली आणि तत्वांबद्दल त्यांना मनोमन आदरही आहे.

त्यामुळे आपल्या मुलीने गीता व भागवताची शिकवण अगदी लहानपणापासून मोकळ्या आणि शुध्द वातावरणात घ्यावी ही संकलपना त्यांना पटू लागली व याचे इतर अनेक भौतिक फायदे जे आपण तुलनेच्या प्रकरणात बघणार आहोत ते लक्षात घेता त्यांनी मला संमती दिली आणि होमस्कूलिंगच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला. सासूबार्इंचाही याला पाठिंबा होता.

तर तसं बघायला गेलं तर आमच्या होमस्कूलिंगचं मुख्य कारण म्हणजे वैदिक ज्ञान आणि जीवनशैलीवर आधारित शिक्षण देणं आणि भौतिक स्तरावरही जे काही होमस्कूलिंगचे अनेक फायदे आहेत त्याचे मुलीला घडवण्यासाठी सर्वतोपरी चीज करायचे हेच. कारण साहजिकच हे सगळं शाळेत जाऊन करणं अशक्य होऊ शकेल इतकं अवघड आहे… हे नक्की|

आमचं हे होमस्कूलिंगचं कार्य मी इस्कॉनचे संस्थापकाचार्य भक्तिवेदांत स्वामी श्री.ल. प्रभुपाद यांना समर्पित करते.

मनाचेTalks च्या लेखांबद्दल वाचकांच्या प्रतिक्रिया….


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!