काय सांगितला होता सचिन तेंडुलकरने त्याच्या यशाचा मूलमंत्र..

सचिन तेंडुलकर

श्रीलंकेचा फिरकीपटु मुथय्या मुरलीधरन कसोटी क्रिकेटमधला सर्वधिक विकेट घेणारा विश्वविक्रमवीर आहे. मुरलीधरनला एका इंटरव्ह्यु मध्ये विचारले गेले की तुझ्या ह्या उत्तुंग यशाचे रहस्य काय आहे? त्याने सहज सांगितले, “रोज मैदानात उतरण्याआधी, मी कल्पना करतो की मला पाच विकेट मिळाल्या आहेत, आणि बर्‍याचदा ते खरे व्हायचे, दुसरे काही नाही.”

सचिन तेंडुलकर रिटायर झाल्यावर त्याच्या एका जुन्या सहकार्‍याने असेच एक सिक्रेट ओपन केले होते, मॅच सुरु होण्याच्या अर्धा तास आधी तेंडुलकर ड्रेसींगरुम मधुन गायब व्हायचा. जेव्हा त्याला विचारले की तु कुठे जातो, एक्झॅक्टली काय करतोस, कूठला मंत्र म्हणतोस का ध्यान करतोस? तेव्हा तेंडूलकरने उत्तर दिले, मी इमॅजिन करतो, की मी सेंच्युरी मारली आहे.

मित्रांनो, ही तर झाली प्रातिनिधिक उदाहरणे! पण खेळ असो वा उद्योग, परीक्षेत टॉप करणं असो वा कमी वेळात, प्रचंड श्रीमंत होणं, सत्ता मिळवणं असो वा लग्न जमवणं, ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणं असो किंवा जगभर भटकणं, प्रत्येक अवघड गोष्ट विज्वलायजेशन मुळे सोपी होते. स्वप्नं प्रत्यक्षात येते, सगळेच यशस्वी लोकं हे मान्य करतात.

लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरताना करायची सर्वात महत्वाची क्रिया आहे, ‘व्हिजुअलायझेशन’!

तर हे विज्वलायजेशन करायची एक विशीष्ट पद्धती आहे.

समजा, खुप विचार करुन तुमच्या आयुष्यातली सर्वात महत्वाची चार ध्येयं अशी ठरवली आहेत, ध्येय नेमकी आणि स्पष्ट असायला हवीत, चटकन चित्ररुपात डोळ्यासमोर मांडता यायला हवीत.

  • एक कोटी रुपये मिळवायचे आहेत.
  • ‘ड्रिमहाऊस’ स्वप्नातला बंगला मिळवायचा आहे.
  • जगातल्या सर्व प्रेक्षणीय स्थळांना भेटी द्यायच्या आहेत.
  • फॉर्चुनर कार घ्यायची आहे.

आता एकेक ध्येय निश्चित क्रमाने सावकाशपणे मनात घोळवायचे आहे.

डोळे बंद करुन ध्यानाला बसल्यासारखे बसा, बॅकग्राऊंडला सुगंधी धुप, आणि मंद मंद म्युझीक असेल तर फार छान, दिर्घ दिर्घ श्वास घ्या, मनात एक, दोन, तीन आकडे, वीस पर्यंत मोजा. मनातले विचार शांत झाल्यास, आता कल्पना करा.

१) मला एक करोड रुपये ऑलरेडी मिळाले आहेत, एक करोड रुपये म्हणजे दोन हजारांच्या पाच हजार नोटा, मी त्या संपत्तीला स्पर्श करु शकतो, मला त्या नोटा दिसत आहेत, एक करोड मिळाल्यावर जितके आनंदी झाला असतात, तेवढे आत्ता या क्षणी आनंदी व्हा, मनातल्या मनात ओरडा, सेलिब्रेट करा.

डोळे उघडल्यावर, एक करोड मिळवणे म्हणजे फार अवघड आहे, हा भ्रम आहे, ते आपण सहज प्राप्त करु शकतो, असा विश्वास निर्माण झाला, म्हणजे तुमचे व्हिज्वलायजेशन योग्य रस्त्यावर आहे.

२) मी माझ्या डार्क ब्राऊन कलरच्या फॉर्चुनर कारचा दरवाजा उघडतो, आणि ड्रायव्हर सीटवर बसतो, स्टिअरींगला फील करतो, गाडी स्टार्ट करतो, गिअर टाकतो, पाहणं, गंध घेणं, स्पर्श करणं आणि ऐकणं, ह्या पाचही ज्ञान-इंद्रियांचा वापर करुन गाडी चालवा.

३) मी एल्प्स च्या पर्वतरांगा, नाईल आणि थेम्स नदी, नायगरा फॉल, स्वित्झर्लॅंड्चा नयनरम्य निसर्ग, श्रीलंकेचा निसर्गरम्य किनारा, हिमालयाच्या बर्फाळ राशी, अशा सर्व ठिकाणी स्वतःला आनंदीत झालेला पाहतो, तिथे गेल्यावर जितका एक्साईट आणि थ्रील झालो असतो, तितका आताच प्रचंड उत्साही होतो.

४) ड्रिमहाऊस मिळवण्यासाठी अगोदर त्याचे चित्र तुमच्याकडे असायला हवे, डोळे बंद करुन तुम्ही तुमच्या स्वप्नातल्या घरासमोर उभे आहात, अशी कल्पना करा, गेट उघडुन आतमध्ये जा, प्रत्येक बारीकसारीक गोष्ट अनुभवा.

व्हिजुअलायझेशन करताना काही गोष्टी पाळल्यास लवकर फायदा होतो.

  • हे सर्व कल्पनारंजन, रोजरोज एका ठराविक क्रमाने व्हायला हवे, त्यात बदल करु नये. ही फिल्म अगदी मनावर ठसली पाहीजे.
  • खरे काय आणि खोटे काय, हे आपल्या मनाला कळु नये, इतकं त्या प्रोसेस मध्ये गुंग होवुन जायला पाहिजे.
  • हे करतना आपल्या भावना अतिशय आनंदी, समाधानी आणि तृप्त असायल्या हव्यात. मनावर कसल्याही प्रकारचा ताण असल्यास, आधी ध्यान करुन तो ताण घालवावा, विनोदबुद्धी जागृत ठेवावी, हसावे-हसवावे. दुःखाकडेही विनोदी वृत्तीने पहावे, आणि आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ रहावे.
  • ही क्रिया सुरुवातीला उत्साहाने होते, नंतर खंड पडायची शक्यता असते, नियमित एकवीस दिवस सकाळ संध्याकाळ व्हिजुअलायझेशन केल्यास जबरदस्त फायदा होतो, आणि एक वर्षात तर चमत्कार होतात.

ह्या टेक्निकचा वापर करुन, गेल्या चार वर्षात माझी बरीचशी ध्येयं पुर्ण झाली, प्रत्येक छोट्या विजयानंतर माझा लॉ ऑफ अट्रॅक्शनवरचा, व्हिजुअलायझेशनवरचा, विश्वास अधिकाधिक दृढ होत गेला.

लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि व्हिजुअलायझेशन टेक्निक अजुन डिटेलमध्ये समजुन घ्यायची इच्छा असल्यास तीनशे रु. भरुन माझा एक महिन्याचा व्हॉट्सएप कोर्स जॉईन करा.

तुमचेही व्हिज्वलायजेशन बद्द्ल असलेले अनुभव सांगा, तुमची सारी स्वप्ने पुर्ण होतील, असा मला पुर्ण विश्वास आहे, खुप खुप शुभेच्छा!…

मनाचेTalks च्या लेखांबद्दल वाचकांच्या प्रतिक्रिया….


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!