डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलामांनंतर केरळच्या मिसाईल डॉ. वूमन स्टेसी थॉमस

आजपासून नवरात्रीची सुरवात होते आहे. देवी दुर्गाची पूजा आता ९ रात्र १० दिवस मनोभावे केली जाईल. स्त्री म्हणजे साक्षात देवी दुर्गेचे रूप. ती स्त्री वेगवेगळ्या रुपात आपलं आयुष्य व्यापून टाकते. पण आपल्या रोजच्या जिवनातून काहीतरी वेगळा मार्ग निवडत आयुष्यात आपलं अढळ स्थान निर्माण करणारी ही स्त्री म्हणजे देवी दुर्गेची साक्षात रूपं. अश्याच ९ दुर्गा ज्यांनी अनेक क्षेत्रात आपलं अढळ स्थान निर्माण केलं आहे त्यांची थोडक्यात ओळख करून देणारी ही सिरीज आहे.

भारताची अग्निपुत्री स्टेसी थॉमस…

केरळ राज्याच्या अलापुझ्झा ह्या गावात १९६३ ला डॉक्टर स्टेसी थॉमस ह्यांचा जन्म झाला. लहानपणापासून गणित आणि भौतिकशास्त्राची ची आवड असणाऱ्या डॉक्टर स्टेसी थॉमस ह्यांच्या मनात रॉकेट विषयी जिज्ञासा जागृत केली ती जवळच असणाऱ्या थुंबा रॉकेट स्टेशनमुळे. रॉकेट कसे बनते? ते उडते कसे? ह्या सगळ्या प्रश्नांनी त्या बालमनात अनेक कुतूहल निर्माण केली होती. आई ने आपल्या बाळाचे पाय पाळण्यात ओळखले तसेच स्टेसीच्या ह्या आवडीला आईने प्रोत्साहन दिलं. त्रिसूर कॉलेज इकडून अभियांत्रिकी ची पदवी घेतल्यावर डॉक्टर स्टेसी थॉमस ह्यांनी आपल्या लहानपणी पडलेल्या प्रश्नांचा वेध घ्यायला सुरवात केली. त्याची उत्तरं शोधताना निर्माण झालेली ओढ त्यांना पुण्याला घेऊन आली. पुण्याच्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ एडवांस टेक्नोलॉजी मधून गाईडेड मिसाईल टेक्नोलॉजी मध्ये मास्टर पूर्ण केलं, तसेच एम.बी.ए. ऑपरेशन मॅनेजन्मेन्ट आणि मिसाईल गाईड्न्स मधून डॉक्टरेट मिळवली. अश्या वेगळ्या क्षेत्रात चमकताना एक संधी त्यांच्यापुढे आली.

१९८८ ला डी.आर.डी.ओ. ला मुलखत दिल्यानंतर त्यांना ताबडतोब रुजू होण्याचा आदेश मिळाला. आपले आदर्श डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम ज्यांना भारताचे “मिसाईल कार्यक्रमाचे जनक” अस म्हंटल जाते. त्यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली. प्रचंड अभ्यासू आणि अथक परिश्रमातून त्यांनी लवकरच सगळ्यांचं लक्ष वेधलं. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम ह्यांनी अग्नी क्षेपणास्त्राची धुरा त्यांच्या खांद्यावर टाकली. एका स्त्रीकडे भारताच्या क्षेपणास्त्राची धुरा देताना डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम ह्यांनी डॉक्टर स्टेसी थॉमस ह्यांच्यामधील सुप्त गुण ओळखले होते. ३००० किमी पल्ला असणाऱ्या अग्नी ३ ह्या प्रोजेक्टच्या त्या असोसियेट डायरेक्टर होत्या. तर अग्नी ५ ह्या भारताच्या ५००० की.मी. पेक्षा जास्त पल्ला असणाऱ्या क्षेपणास्त्राच्या त्या प्रोजेक्ट डायरेक्टर बनल्या.

सॉलीड प्रोपेलंट मध्ये प्राविण्य असणाऱ्या डॉक्टर स्टेसी थॉमस ह्यांनी अग्नी ५ च्या निर्मितीमध्ये निर्णायक भूमिका निभावली होती. अग्नी ५ हे क्षेपणास्त्र अतिशय वेगाने आपल्या लक्ष्याकडे झेपावताना वातावरणाच्या वरच्या टप्यात जाऊन पुन्हा एकदा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करते. ते करत असताना अतिशय वेग आणि पृथ्वीच्या वातावरणाशी होणारे घर्षण ह्यामुळे तपमान हे ३००० डिग्री सेल्सिअस इतकं जात असताना क्षेपणास्त्रामधील सगळ्या प्रणाली व्यवस्थित सक्षम ठेवणारी यंत्रणा निर्माण करण्यात डॉक्टर स्टेसी थॉमस ह्याचं योगदान खूप मोठं आहे. अग्नी ५ च्या यशस्वी चाचणी नंतर आनंदाचा वर्षाव सगळीकडून होत असताना डॉक्टर स्टेसी थॉमस ह्यांनी पराभवाची आणि अपयशी चव ही अनेकदा चाखलेली आहे. २००६ मध्ये अग्नी क्षेपणास्त्र आपल्या ठरलेल्या क्षमतेत पराभूत झालेलं असताना अनेक टीका अनेक क्षेत्रातून झाल्या. भारत अश्या क्षेपणास्त्राची निर्मिती स्वबळावर करू शकत नाही तसेच एकूण सर्वच वैज्ञानिक आणि संशोधक यांच्यावर शंका उपस्थित केल्या गेल्या. अश्या वेळी डॉक्टर स्टेसी थॉमस ह्यांनी हार न मानता झालेल्या चुकांतून शिकून अग्नी क्षेपणास्त्र यशस्वी करण्याचा विडा उचलला. तब्बल १२ ते १६ तास आणि आठवड्याच्या शेवटी सुद्धा सुट्टी न घेता अग्नी ला यशस्वी करण्यासाठी त्यांनी मेहनत केली. अग्नी ५ च्या यशस्वी चाचणी नंतर भारत आंतरखंडीय क्षेपणास्त्र बनवू शकतो ह्यावर जगाने शिक्कामोर्तब केलं. त्यामागे डॉक्टर स्टेसी थॉमस आणि त्यांच्या टीम चे कित्येक वर्षाचे अथक परिश्रम कारणीभूत आहेत.

डिफेन्स वैज्ञानिक ते एक गृहिणी, बायको आणि आई अश्या सर्व भूमिकांतून जाताना अनेकदा नक्की कोणाला महत्व द्यावं अशी कसरत डॉक्टर स्टेसी थॉमस ह्यांना अनेकदा करावी लागली. आपला मुलगा तेजस प्रचंड आजारी असून सुद्धा अग्नी क्षेपणास्त्राच्या चाचणी ला त्यांनी जास्त महत्व देताना आपली उपस्थिती तिकडे नोंदवली. २००८ ला इंडिअन वुमन सायंटिस्ट असोसिएशन नी त्यांच्या बद्दल काढलेले गौरवोद्गार बरंच काही सांगून जातात.

“We feel Tessy Thomas serves as a role model and an inspiration for women scientists to achieve their dreams and have their feet planted in both worlds successfully”

ह्या वर्षी डॉक्टर स्टेसी थॉमस ह्यांची नियुक्ती डायरेक्टर जनरल एरोनॉटीकल सिस्टीम डी.आर.डी.ओ. ह्या ठिकाणी झाली आहे. तसेच त्या अनेक प्रतिष्ठित विद्यापीठाच्या फेलो आहेत ज्यात आय.एन.ए.ई., आय.ई.आय, टी.ए.एस. सारख्या संस्थांचा समावेश आहे. त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. ज्यात लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार २०१२, सर एम. विश्वेस्वरय्या पुरस्कार २०१६, तसेच डी.आर.डी.ओ. पर्फोर्मंस एक्सलंस पुरस्कार २०११, २०१२ ह्यांचा समावेश आहे. भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना भारताची मिसाईल वुमन (अग्निपुत्री) असं बोलवण्यात येतं. ज्या क्षेत्रात पुरूषांच वर्चस्व राहिलेलं आहे. त्या क्षेत्रात शिरून पुरुषांच्या बरोबरीने भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाला आकार देणाऱ्या डॉक्टर स्टेसी थॉमस ह्या खरे तर भारतीय स्त्रीयांचा आदर्श असायला हव्यात पण दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही. निती आयोगाच्या बैठीकीमध्ये महिंद्रा ग्रुप चे चेअरमन आनंद महिंद्र ह्यांनी एक मार्मिक टिपण्णी डॉक्टर स्टेसी थॉमस ह्यांच्यावर केली होती.

“Tessy deserves to be more famous than the biggest Bollywood star. A poster of Tessy in every Indian school will wreck stereotypes and create enormous career aspirations for girls”.

डॉक्टर स्टेसी थॉमस ह्या नेहमीच आपल्या यशाचं श्रेय त्यांच्या आईला देतात. लहानपणी पडलेल्या प्रश्नांना शोधण्यासाठी आईने मला संपूर्ण मोकळीक दिली. जेव्हा सर्व जग कॉम्प्यूटर च्या मागे धावत होत तेव्हा मी कुठेतरी एका वेगळ्या क्षेत्रात धडपडत होती. आपली आवड जोपासताना डॉक्टर स्टेसी थॉमस ह्यांनी स्त्री शक्तीचं एक वेगळं उदाहरण आज भारतातील समस्त स्त्रियांपुढे ठेवलं आहे.

आज भारतातील स्त्री ला त्या दुर्गे सारखंच कोणतंही क्षेत्र वर्ज्य नाही. अडचणी, प्रतिकूल परिस्थिती सगळीकडे असते पण जो ह्यातून आपला प्रवास सुरु ठेवतो त्याला यश मिळतेच. भारताला क्षेपणास्त्र निर्मितीत स्वयंपूर्ण करणाऱ्या ह्या दुर्गेस माझा आजच्या दिवशी नमस्कार आणि पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा.

मनाचेTalks च्या लेखांबद्दल वाचकांच्या प्रतिक्रिया….


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय