भारतातील पहिली महिला रिक्षा चालक असलेल्या परभणीच्या शिला डावरे यांची कहाणी

१८ व्या वर्षी १९८० च्या दशकात महाराष्ट्रातील परभणी येथे राहणारी एक तरुणी घरदार सोडून काहीतरी करणाच्या इच्छेने पुणे इकडे येते. हातात असलेले १२ रुपये आणि खूप सारी स्वप्नं….

थोडं शिक्षण झालं की कधी एकदा लग्न करून मुलीला सासरी पाठवतो असा विचार करणारे अनेक पालक असतात. असं गुलामगिरीचं जीवन नको म्हणून सगळ्यांना सोडून त्या काळात एका गरीब घरातील मुलीने स्वप्न बघितलं.

हे असं स्वप्न बघणे हा त्या काळात गुन्हा असताना ते बघून लग्नाला आपल्या स्वप्नांच्या मध्ये न येऊ देता आपल्या पायावर उभं राहण्यासाठी पुरुषांनी व्यापलेल्या क्षेत्रात पाउल ठेवण्याचं धाडस शिला डावरे ने केलं.

हे पाउल तिला लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये घेऊन जाईल ह्याची सुतराम कल्पना शिलाला नव्हती.

१९८८ चा तो काळ होता. पुण्याच्या रस्त्यावर खाकी वर्दीतले रिक्षा ड्राईव्हर सगळीकडे दिसत असताना सलवार कमीज घातलेली एक तरुणी त्या गर्दीतून रिक्षा चालवते हे दृश्य पुणेकरांना अचंबित करणारं होतं.

एक स्त्री रिक्षा चालवते ही कल्पना मुळी कोणाच्या गळी उतरत नव्हती. शिलाला तिच्या घरातून पण विरोध झाला पण शिला आपल्या ठरवलेल्या मार्गावर चालत राहिली.

पण हे सगळं सोप्प नव्हतं. घरातल्या व्यक्तींना समजवू शकतो पण बाहेरच्यांना कसं समजावणार? पाय घासून बाईक थांबवणाऱ्या अनेक स्त्रियांची दृश्य पुणेकरांना सवयीची असल्याने एका स्त्री च्या रिक्षात बसायला अनेकजण तयार नव्हते.

कारण एकच होतं की आम्ही सुखरूप ठरलेल्या ठिकाणी पोहचू की नाही? अनेक नाकारांचा सामना करण्याची सवय शिलाला झाली होती.

शिलाने धीर सोडला नाही. जेव्हा नेहमीचे रिक्षावाले सुट्टी घ्यायचे तेव्हा शिलाने रिक्षा चालवायला सुरवात केली. हळूहळू लोकांच्या मनातील भीती कमी झाली.

अनेक लोकांनी तिच्या ह्या धाडसाच कौतुक केलं. ती रिक्षा चालवत असताना अनेकजण थांबून कुतुहलाने तिच्याकडे बघत बसतं. तिच्या ह्या धडसामागे तिला आधार देणारे पुण्यातील काही रिक्षाचालक होते.

एकदा एका हवालदाराशी शाब्दिक वादाचं रुपांतर शिलावर हात उचलण्यात झालं. त्याच्या ह्या भ्याड हल्याचं प्रतिउत्तर शिलाने त्याच्या कानशिलात लगावून दिलं.

त्याहीपुढे जाऊन त्याच्या मुजोरीला आळा घालण्यासाठी तिने आपल्या रिक्षाचालक संघटनेची मदत घेऊन त्याला चांगला इंगा दाखवला. एक स्त्री म्हणून मागे न हटता आपल्या हक्कासाठी तिने योग्य तो लढा दिला.

१९८८ ते २००१ अशी सतत १३ वर्ष शिला रिक्षा, शाळेची बस, छोटा टेम्पो हे सगळं चालवून आपल्या पायावर उभी होती. वैद्यकीय कारणांमुळे शिलाला ड्राईव्हिंग सोडावं लागलं.

पण शिला तिकडेच थांबली नाही. तिने अनेक स्त्रियांना ड्राईव्हिंग साठी उद्युक्त केलं. एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचा आधार जास्त वाटतो. रात्री, अपरात्री एकटीने प्रवास करताना एक स्त्री चालक असणं त्या प्रवास करणाऱ्या स्त्रीला आश्वस्त करते हे तिने अनेकांच्या मनात रुजवलं.

शिलाने आपल्या नवऱ्यासोबत एक प्रवासी कंपनी ची स्थापना केली. ह्या सगळ्या काळात तिच्या पतीने तिला योग्य ती तोलामोलाची साथ दिली.

वाचण्यासारखे आणखी काही…

काय सांगितला होता सचिन तेंडुलकरने त्याच्या यशाचा मूलमंत्र..
स्वतः अडथळे पार करत जगण्याचा उत्सव करायला शिकवणारा संदीप माहेश्वरी
पवन दिवानी न माने …

मनाचेTalks च्या लेखांबद्दल वाचकांच्या प्रतिक्रिया….

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!