यशस्वी होण्यासाठी आवश्यक पाच ‘न’ कार!

विचार करा, एका चित्रपटातला नुसता डायलॉग हिरोच्या वागण्यात तडफ आणि खुमारी निर्माण करतो, तर ह्या तत्वाचं खर्‍याखुर्‍या आयुष्यात पालन केल्यास, आयुष्याचा पिक्चर किती सुपर डुपर हिट होईल?

जीवनात यश, आनंद आणि सुख मिळवण्यासाठी आपल्याला काही गुण आत्मसात करावे लागतात. सर्वसाधारण लोकांच्या गर्दीतुन बाजुला होवुन जगात आपली ठळकपणे ओळख बनवायची असेल तर त्यासाठी हे पाच ‘न’ कार तुम्हाला नक्की मदत करतील.

१) नाविन्य

१९८० च्या दशकात रशियाने ‘स्फुटनिक’ नावाचा उपग्रह अंतराळात सोडला, तेव्हा त्या क्षेत्रात थोडीफार माहिती असणारे दोन युवक आपल्या कॉम्प्युटरवर वेगवेगळे प्रयोग करत होते. खरंतर, एका अर्थी गंमत म्हणुन केलेला टाईमपासच होता तो!

त्यांनी रात्रंदिवस बसुन एकाग्रतेने ज्या दिशेने सॅटेलाईट अवकाशात गेला, चक्क तो मार्गच रेखांकित केला. म्हणजे मार्क करुन ठेवला, इथपर्यंत काही खास घडलं नव्हतं!

त्यांचा हा उद्द्व्याप पाहुन त्यांच्या मित्राला गंमत वाटली, त्याने सहज म्हणुन एक कल्पना मांडली, की, “जसा पृथ्वीवरुन सॅटेलाईटचा मार्ग आखता येतो, तसं सॅटेलाईटवरुन पृथ्वीचा एखादा भुभाग आखता येत असेलच की!”

आणि लक्षात आलं की सॅटेलाईटचा रस्ता मार्किंग करण्यापेक्षा पृथ्वीवरच्या भुभागाचे नकाशे बनवणं खुप सोपं आहे.

त्या क्षणी एक क्रांती झाली होती, गंमतीत गंमतीत एक शोध लागला होता.

त्याला आपण आज जीपीएस सिस्टीम म्हणुन ओळखतो, ह्याच तंत्रज्ञानाचा वापर करुन पुढे गुगल मॅप्स बनवले गेले.

आज एकतीस सॅटेलाईट जगाला घिरट्या घालत आहेत आणि आपल्याला मार्गदर्शन करुन हव्या त्या पत्यावर अचुक पोहचवत आहेत.

आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असा, तुमच्या क्षेत्रातल्या इतर लोकांपेक्षा काहीतरी वेगळा विचार करा, रोज काहीतरी नवीन करण्याचा स्वतःशी आग्रह धरा. नवनवीन छंद जोपासा, नवनवीन कला शिकायला थोडा वेळ द्या, नव्या बदलांचे आनंदाने स्वागत करा, लपलेल्या नव्या संधी शोधा, नव्या माणसांना आनंदाने, उत्साहाने भेटा.

आणि सर्वात महत्वाचं,

रोज स्वतःला स्वतःसमोर नव्या रुपात प्रेझेंट करा. रोज स्वतःच नव्याने स्वतःच्या प्रेमात पडा.

२) निश्चय

पिक्चरमध्ये असा काहीतरी डायलॉग असतयं बघा, “एक बार मैने कमीटमेंट कर दी, फिर मै अपनेआप की भी नही सुनता!”

विचार करा, एका चित्रपटातला नुसता डायलॉग हिरोच्या वागण्यात तडफ आणि खुमारी निर्माण करतो, तर ह्या तत्वाचं खर्‍याखुर्‍या आयुष्यात पालन केल्यास, आयुष्याचा पिक्चर किती सुपर डुपर हिट होईल?

निश्चय स्वतःवरच्या नियंत्रणातुन येतं, आणि नियंत्रण तीव्र इच्छेतुन!

आपल्या ध्येयाला तीव्र इच्छा बनवा, बाकीचं आपोआप होईल. इच्छा अंतर्मनापर्यंत पोहचवा आणि जगण्याचा आनंद घ्या. तुमचं प्रबळ अंतर्मन तुमच्याकडुन सगळं करुन घेईल.

३) नेतृत्व

जेत्याच्या थाटात जगा. अनुयायी बनुन जगु नका, नेते बनुन रुबाबाने जगा, तुमच्यामध्ये अफाट अगाध शक्ती आहे, तिला दुसर्‍याच्या प्रभावात येवुन गहाण टाकु नका.

सभेमध्ये, कार्यक्रमात पुढच्या खुर्च्यांवर बसा, बोलण्यात संकोच करु नका, पुढाकार घ्या, इतरांवर प्रेम करण्यात पुढाकार घ्या, लोकांच्या समस्या सोडवण्यात त्यांना मदत करा, आपल्यापेक्षा गरीबांबद्दल आणि अज्ञानी लोकांबद्द्ल कणव असु द्या, तर आपल्यापेक्षा श्रीमंत लोकांबद्द्ल प्रेम आणि सदिच्छा असु द्या.

बरोबरच्यांशी मैत्री भाव असु द्या. लक्षात ठेवा, लोकांना स्वार्थी, अहंकारी आणि दुबळे नेते आवडत नाहीत. नेता समस्यांनी चिंतित होत नाही, तो पुढे सरसावुन समस्येशी प्रत्यक्ष दोन हात करतो.

४) नाटक

तुमच्या बघण्यात असे लोक आहेत का जे कधी उदास असले की स्टेटस ठेवतात, ‘फिलींग सॅड!’, निराशा जाहीर करणे, ह्यापेक्षा मोठा मुर्खपणा कोणता नाही.

उत्साह-निराशा, प्रसन्नता-उदासिनता, आत्मविश्वास-भिती, आनंद-दुःख ह्या भावना आहेत आणि त्या माणसाच्या मनात ये जा करत असतात, आपण थोडं शहाण व्हायचं, नको त्या पाहुण्यांना एन्टरटेन करायचं नाही, हव्याहव्याशा पाहुण्यांचं अगत्याने मात्र आवर्जुन हसतमुखाने स्वागत करायचं, मन लावुन आदरातिथ्य करायचं.

तज्ञ लोकं मुड पलटवण्यासाठी, एक सिक्रेट सांगतात….

उदासिनतेतुन बाहेर येण्यासाठी, फक्त काही क्षणांचं नाटक पुरेसं आहे. आरशासमोर किंवा कुठेही एकट्यात उभे रहा, मस्त स्माईल करा, दोन्ही हात शक्य तितके पसरुन म्हणा….. मी आनंदी आहे, मी शक्तिशाली आहे, मी श्रीमंत आहे, मी निरोगी आहे, मी नशीबवान आहे, मी आभारी आहे, मी प्रेमळ आहे, सगळे माझ्यावर प्रेम करतात, मी सर्वांवर प्रेम करतो.

मी दिवसातुन शेकडो वेळा ही वाक्ये मनातल्या मनात म्हणतो, आणि प्रत्येक वेळी मला नवीन आनंद होतो. माझ्यावर अवघड वेळ असतानाही ह्याच वाक्यांनी मला साथ दिली. ही माझी आयूष्यभराची सुखाची शिदोरी आहे.

५) नम्रता

हनुमान प्रचंड शक्तिशाली आणि बुद्धीशाली होते, कित्येक कठिण आव्हानांना पार करुन आणि कठोर परिश्रमानंतर समुद्रावर उड्डाण करुन त्यांनी सीतामातेला शोधले.

जटायुने सांगितलेल्या ठिकाणी पोहचल्यावर त्यांना सीतामाता दिसतात, ओळख पटावी म्हणुन त्यांना ते रामाची अंगठी देतात. सीतामातेने त्यांना विचारले तुम्ही कोण?

तेव्हा त्यांच्या जागी तुम्ही आम्ही किंवा इतर कोणी असलं असतं तर काय उत्तर दिलं असतं? “माते, मी प्रचंड शक्तिशाली, सामर्थ्यवान आहे, तुम्हाला शोधण्यासाठी मी कुठे कुठे फिरलो माहीतीये? मी समुद्रावर उड्डाण करुन इथपर्यंत पोहचलो आणि अखेर तुम्हाला शोधुन काढलचं!”

पण हनुमानाने असं काहीही सांगितलं नाही, त्याने सीतामातेला फक्त एवढेचं सांगितले की मी रामाचा दुत आहे. स्वतःबद्द्ल, स्वतःच्या कर्तूत्वाबद्द्ल, एक शब्दही त्याने सांगितला नाही.

किती ही नम्रता, रामाप्रति किती समर्पण! ह्यासारखी जगाच्या इतिहासात दुसरी भक्ती नाही.

खरी गंमत तर पुढेच आहे, हनुमानाला पकडले जाते आणि त्याच्य शेपटाला पेटवुन दिले जाते. ही गोष्ट दासीकडुन सीतामातेला समजते.

तात्काळ सीतामाता अग्नीदेवाला प्रार्थना करते की “अग्निदेवते, हा रामाचा दुत आहे, ह्याच्या केसालाही धक्का लागु देवु नकोस!”

अग्निदेव आणि सीतामाता यांचे पिता पुत्रीचे नाते असते, अग्नी हनुमानाच्या केसालाही धक्का लागु देत नाही, हनुमान संपुर्ण लंका जाळुन भस्मसात करतात.

मित्रांनो, आपण जेव्हा काही प्राप्त करतो, किंवा एखाद्या अवघड संकटातुन, केसाला धक्का न लागता, सहीसलामत बाहेर पडतो तेव्हा फक्त आणि फक्त आपल्या स्किल्समुळे किंवा आपल्या कर्तूत्वामुळे किंवा आपल्या नशीबाच्या जोरावर असं समजणं, म्हणजे मुर्खपणा आहे.

त्यामागे आपल्या जवळच्या लोकांच्या शुभेच्छा, प्रार्थना आणि आशिर्वादही सामील असतात. कुणाची नकळत मदत होते तर कोणी देवदुत बनुन आपल्या संकटांना नाहीसं करतं.

याची जाण सतत ठेवली पाहिजे. कितीही शक्ती प्राप्त झाली तरी नम्रपणे वागणं, अंगात मुरवुन घ्यावं!

मनःपुर्वक आभार!

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “यशस्वी होण्यासाठी आवश्यक पाच ‘न’ कार!”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय