स्कायडायव्हिंग करणारी मराठमोळी मुलगी पद्मश्री शितल महाजन

शितल महाजन

६ जागतिक विक्रम, १९ राष्ट्रीय विक्रम आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित हे कर्तुत्व आहे पुण्याची असणारी मराठमोळी मुलगी शितल महाजनचं. शितल महाजनचा जन्म १९ सप्टेंबर १९८२ ला पुण्यात झाला. मूळचे गाव जळगाव असलेली शीतल ही बहिणाबाई चौधरी यांची पणती आहे. बहिणाबाई चौधरींचे नातू कमलाकर महाजन यांची सुकन्या. बालपणापासूनच शितलला काहीतरी नवे करण्याचा ध्यास होता. २००३ ला शितल ची ओळख स्कायडायव्हिंग शी झाली. सामान्य नागरिकांसाठी स्कायडायव्हिंगचं प्रशिक्षण हे भारतात उपलब्ध नव्हतं. शिक्षण घ्यायचं असेल तर भारताबाहेर जावं लागणार होतं. ज्या कुटुंबाने कधी विमानात पाय ठेवला नव्हता त्या कुटुंबातून एक स्त्री विमानातून उडी मारण्याचं प्रशिक्षण घ्यायचा विचार करते हेच मुळी कोणाच्या पचनी पडणार नव्हतं. “आपल्या घरातील मुली असलं काही करत नाहीत” हे वाक्य शितलला कुटुंबाकडून ऐकायला मिळालं. शितल ने आपल्या आई वडिलांना आणि कुटुंबाला समजावलं की हा खेळ म्हणजे माझी आवड आहे. प्रत्येक मुलाने मोठं व्हावं आपल्या आई वडिलांच नाव मोठं करावं असं प्रत्येक पालकांना वाटत असते. मग त्यात मुलीने का मागे राहवं? हा प्रश्न विचारल्यावर तिच्या आई वडिलांनी तिच्या स्वप्नांच्या पंखाना बळ दिलं.

शितल महाजन

१८ एप्रिल २००४ ला शितलने इतिहास घडवला. उत्तर ध्रुवावर २४०० फुटावरून जिथे कुठे जमीन नसताना सुद्रावर तरंगणाऱ्या बर्फाच्या एका तुकड्यावर उणे ३७ डिग्री सेल्सिअस तापमानात तिने आयुष्यातली पहिली उडी कोणत्याही सरावाशिवाय घेतली असं करणारी जगातली ती पहिली महिला ठरली. १६ डिसेंबर २००६ साली दक्षिण ध्रुवावर एक्सलेरेटेड फ्री फॉल अश्या पद्धतीची आयुष्यातली दुसरी उडी ११,६०० फुटावरून मारली. कोणत्याही सरावाशिवाय जगाच्या दोन्ही ध्रुवावरून पॅराशूट च्या साह्याने उडी घेणारी शितल महाजन ही जगातील पहिली महिला आहे. २५ ऑगस्ट २०१४ ला स्पेन – इम्प्रूआब्रावा ह्या परदेशी भूमीवर ८९ नागरिकांनी एका दिवसात टेन्ड्म स्कायडायव्हिंग करून जागतिक विक्रम केला त्याचं आयोजन शितल महाजन हिने केलं होतं. २२ फेब्रुवारी २०१७ ला पृथ्वीच्या आशिया, युरोप, अंटार्कटिका, नॉर्थ अमेरिका, साउथ अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका अश्या ७ खंडावर पॅराशूट च्या साह्याने उडी घेणारी ती पहिली महिला ठरली. ह्यासाठी तिला १० वर्ष २ महिने आणि ६ दिवस लागले. तिने अमेरिकेतून स्कायडायव्हिंगची ए, बी, सी, डी अशी सगळी प्रमाणपत्र मिळवली आहेत. ज्यामुळे ती जगातील कोणत्याही स्कायडायव्हिंग मध्ये भाग घेऊ शकते. आजवर ७५० पेक्षा जास्त वेळा विमानातून स्कायडायव्हिंग (पॅराशूट च्या साह्याने उडी) करण्याचा अनुभव तिला आहे.

१२ फेब्रुवारी २०१८ ला शितलने ९ वारी साडी नेसून आकाशातून उडी घेतली आहे ह्याची नोंद जागतिक विक्रम होण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरु आहे. नुकत्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांना ६८ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा शितलने शिकागो इकडे १३,००० फुटावरून आकाशातून स्कायडायव्हिंग करताना दिल्या आहेत. शितल इतक्यावर थांबलेली नाही तर आता येत्या डिसेंबर महिन्यात गोल्ड कॉस्ट ऑस्ट्रेलिया इकडे १०० महिलांना स्कायडायव्हिंग आणि स्क्युबा ड्रायविंग करण्याची संधी शितलने दिली आहे.

एकीकडे आपल्या कर्तुत्वाने जग गाजवत असताना आपल्या कौटुंबिक भूमिका पण शितलने तितक्याच जबाबदारीने पूर्ण केल्या आहेत. १८ एप्रिल २००८ मध्ये शितल ने वैभव राणे ला आपला जोडीदार निवडताना आपलं लग्न पण एका अनोख्या पद्धतीने हवेत साजर केलं आहे. पुण्याच्या जवळ हॉट एअर बलून मधून जमिनीपासून ७०० फुटावर हा लग्नसोहळा पार पडला होता. वृषभ आणि वैष्णव अश्या दोन जुळ्या मुलांची आई असूनपण तिने आपलं आकाशातून उडी मारण्याचं आणि भारतात अश्या साहसी क्रीडाप्रकाराला प्रसिद्ध करण्याचं शिवधनुष्य लिलया पेललं आहे.

एका सामान्य मराठी कुटुंबातून पुढे येत स्कायडायव्हिंग सारख्या साहसी क्रीडाप्रकाराला आपलसं करत त्यात नुसतं नैपुण्य नाही तर एक दोन सोडून तब्बल ६ जागतिक विक्रम आणि १९ राष्ट्रीय विक्रम करत त्या पलीकडे जाऊन एक सामान्य मराठी, भारतीय स्त्री आपलं कुटुंब, घर ह्यासोबत येणाऱ्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून पूर्ण जगात भारत देशाचं नाव एका वेगळ्या उंचीवर नेऊ शकते हा विश्वास शीतल महाजन ने सगळ्याच भारतीय स्त्रियांना दिला आहे. तेवढ्यावर न थांबता आपल्याला ज्या अडचणीतून जावं लागलं त्यातून दुसऱ्या कोणालाही ज्यांना ह्या क्षेत्रात यायचं आहे त्यांना जावं लागू नये म्हणून स्कायडायव्हिंग सारख्या अतिशय साहसी खेळाचं प्रशिक्षण देणाऱ्या फिनिक्स संस्थेची स्थापना करून शितलने एक आदर्श सगळ्याचं स्त्रियांपुढे ठेवला आहे. अश्या ह्या दुर्गाशक्तीस माझा नमस्कार आणि पुढल्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

Look how skydivers have fun in air…

वाचण्यासारखे आणखी काही…

काय सांगितला होता सचिन तेंडुलकरने त्याच्या यशाचा मूलमंत्र..
स्वतः अडथळे पार करत जगण्याचा उत्सव करायला शिकवणारा संदीप माहेश्वरी
पवन दिवानी न माने …


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!