Sometimes the problem is you!!

नव्वद वर्षांपुर्वी मेडीकल सायन्स आजच्या इतके प्रगत नव्हते, संशोधने सुरु होती, तेव्हाची गोष्ट!
१९३० मध्ये युरोपमध्ये ‘पर्पल फिव्हर’ नावाच्या विषाणूने धुमाकूळ घातला होता, त्याला ब्लॅक डेथ ऑफ चाईल्ड असेही म्हणायचे.
एका अज्ञात संसर्गामुळे सिझर ऑपरेशन करुन बाळाचा जन्म झाला की तात्काळ काही वेळातच आईचा मृत्यु व्हायचा.
ठणठणीत असलेली गर्भवती स्त्री अशी अचानक का मरते? कुठल्याही तज्ञ डॉक्टरांना समजेना.
कित्येक वर्ष गेली, अठरा हजाराहुन अधिक मृत्यु झाले.
कित्येक प्रयत्न झाले, पण असे का होतेय, कूणालाच कळाले नाही.
शेवटी ऑलीव्हर लिडर होल्स नावाच्या चाणाक्ष डॉक्टराने ह्या रहस्यमयी मृत्युंवर एक कारण मांडले. तो म्हणाला, “ह्या रोगाचे कारण तुम्ही डॉक्टर मंडळी आहात, तुम्ही ज्या शस्त्रांनी पोस्टमार्टम करता, त्याच हत्यारांनी डिलेव्हरी करता, त्यांचे निर्जंतुकरण करत नाही, आणि म्हणुन डिलीव्हरी होणार्या बायका हकनाक मरतात.”
त्याचे म्हणणे ऐकुन सगळे अवाक झाले.
कारण ऑलीव्हर म्हणाला, “There is no othere problem, the problem is you”……. “हात धुवा, स्वच्छता बाळगा, आणि इन्स्ट्रुमेंट्सचे निर्जंतुकीकरण करा, “
किती सोपा उपाय?..
आणि हे केल्याने रहस्यमय मृत्यु बंद झाले.
Sometimes the problem is you!!
कधीकधी मला लोकं विचारतात, “सर, लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरुन, सगळ्या जगाला यश मिळते, मग मला का मिळत नाही?”
उत्तर कडू आहे, पण माझं उत्तर आहे, “समटाईम्स द प्रॉब्लेम इज यु!”
आनंदी रहायला माणसाला शिकवावं लागतं का? जसं पक्ष्याला उडायला आणि माशाला पोहायला शिकवावं लागत नाही तसं भव्य स्वप्नं बघायला, दुसर्यांवर प्रेम करायला आणि जगाला भरभरुन आनंद वाटायला माणसाला शिकवावं लागत नाही.
लॉ ऑफ अट्रेक्शन फेल होतो, कारण तुम्ही तुमचं मुळ नेचर विसरत आहात, थोडा संयम ठेवा, थोडं विनाकारण आनंदी रहा, थोडं विनाकरण हसा-हसवा, थोड्या वेळासाठी टेंन्शनचं गाठोडं बाजूला ठेवून मुक्तपणे बागडा की राव!, थोडं आयुष्यावर प्रेम करुन बघा!…
मनाचेTalks च्या लेखांबद्दल वाचकांच्या प्रतिक्रिया….
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा