Key of Subconscious Mind! जाणून घेऊ स्व-संमोहन कसे करता येईल…

स्व-संमोहन

तुम्ही स्व-संमोहन किंवा सेल्फ हिप्नॉटीझम बद्द्ल ऐकलयं का?

आकर्षणाचा नियम आणि स्व-संमोहन ह्यांचा खुप घनिष्ट संबंध आहे.

स्वसंमोहन बद्द्ल तसे बरेच समज गैरसमज असतात, स्व-संमोहन नेमकं काय आहे, ह्याबद्दल, मला समजलेली, मी अनुभवलेली माहिती मी तुम्हाला सांगतो.

स्वसंमोहन म्हणजे काय?

  • ही स्वतःच्या अंतर्मनाशी संपर्क साधण्याची एक कला आहे.
  • ब्रम्हांडाला आपले संदेश पाठवण्याची क्रिया आहे.
  • सोप्या शब्दांमध्ये ‘स्व-संमोहन’ म्हणजे, ध्यानामध्ये जाणं!

इच्छा पुर्ण करण्याचं शास्त्र म्हणजे स्व-संमोहन!

स्व-संमोहनाचे फायदे

नियमित स्वसंमोहन करत राहिल्यास, भीती, मानसिक तणाव, अस्वस्थता, संशय मनातुन एकदम नाहीसे होतात, जवळपास फिरकतही नाहीत.

आपल्यामध्ये असलेले दोष जसे की आळस, चिंतामग्न राहणे, ईर्ष्या करणे, याबद्द्ल आपण अधिकाधिक जागृत आणि सजग बनतो.

व्यक्तिमत्व निखरते, आनंदी, फ्रेश वाटते.

आपल्याला जे जे हवे, पैसा, गाडी, बंगला, प्रेमळ नातेसंबंध सगळं काही प्राप्त करवुन देण्याची ताकत स्व-संमोहनात आहे.

सात्विक वृत्तीच्या लोकांची, ध्यान केल्याने, आध्यात्मिक प्रगती होते, आत्म्याशी, देवाशी जोडल्या गेल्याची अनुभुती येते.

हव्या त्या सर्व गोष्टी मिळवण्याचा मार्ग आहे, स्व-संमोहन!

स्व-संमोहनात नेमके काय होते? 

हे केल्याने आपण अर्धेनिद्रीस्त होतो.

बेशुद्ध पडणे म्हणजे स्व-संमोहन नाही, उलट ह्या अवस्थेत प्रत्येक ज्ञानेंद्रिय नऊ पट अधिक शक्तीने काम करते, म्हणजे स्वसंमोहनात असताना, कोणी वाजवलेल्या चुटकीचा आवाज अधिक स्पष्ट आणि तीव्र ऐकु येतो.

ही अवस्था मनाला अधिकाधिक जागरुक, सजग, अलर्ट बनवते.

सकाळच्या वेळी उठण्याआधीची साखरझोपेची काही मिनीटं, किंवा रात्री झोप लागण्याआधीची पेंगुळलेली काही मिनीटं, ही स्व-संमोहनाच्या स्थितीशी मिळतीजुळती अवस्था आपण रोज अनुभवतो.

अध्यात्मामध्ये केले जाणारे ध्यान आणि प्रार्थना हे सुद्धा अंतर्मनाच्या शक्तिचा वापर करण्यासाठी वापरले जाणारे टुल्स आहेत.

जो स्वतःला स्व-संमोहनाची सवय लावु घेईल, त्याला काहीही कमी पडणार नाही.

स्व-संमोहनात कसे करावे? 

स्वसंमोहनात जाण्याच्या अनेक पद्धती आहेत, त्यापैकी एक पद्धत खालीलप्रमाणे….

१) टप्पा पहिला

एका शांत ठिकाणी, खोलीमध्ये किंवा मोकळ्या जागी मांडी घालुन बसा, त्रास असेल तर आरामखुर्ची घेतली तरी चालते, झोपायची स्थिती टाळा!

हे केव्हाही फ्री टाईममध्ये करु शकता, व्यत्यय कमी असावेत, भुक लागलेली नसावी आणि खुप पोट भरलेले नसावे, म्हणुन सर्व दृष्टीने, सुर्योदय आणि सुर्यास्ताची वेळ उत्तम.

डोळे बंद करा.

एक एक खोल श्वास घ्या, आणि खोल श्वास सोडा.

आता दोन्ही डोळ्यांची बुबुळे वर नेऊन बघण्याचा प्रयत्न करा. दोन भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करा.

काही श्वासानंतर, डोळे बंद ठेवुनच, बुबुळे गोल फिरवा. (नाही जमल्यास काही हरकत नाही, प्रयत्न करत रहा.)

ही क्रिया पाच ते सात मिनीटे करा.

जेव्हा संपुर्ण लक्ष आपल्या आज्ञाचक्राकडे म्हणजे दोन भुवयांच्या मध्ये असते, तेव्हा काही क्षणांमध्ये सर्व विचार निघुन जातात.

हिच अंतर्मनाच्या खोल आवस्थेत जाण्याची सुरुवात आहे.

२) दुसरा टप्पा

ज्यांचा देवावर विश्वास आहे, त्यांनी मनातल्या मनात आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करावे आणि एक प्रार्थना म्हणावी.

हे ईश्वरा, तुम्ही मला माझ्या अंतर्मनाशी संपर्क करुन देत आहात.

(इथे आपापल्या इष्टदेवतेचे स्मरण करु शकतो, उदा. स्वामी समर्थ, साईबाबा, कृष्ण, शिवजी, गणपती)

देवाचेच नाव घ्यावे असेही नाही, देवाच्या ऐवजी, “हे ब्रम्हांडा, असा सुद्धा उच्चार करु शकता.”ट्प्पा तिसरा –

३) तिसरा टप्पा

आता रिलॅक्स व्हा, सर्व बॉडी शिथील सोडा.

Relaxation is key of happiness.

क्रमाक्रमाने संपुर्ण शरीर रिलॅक्स करताच अंतर्मनाचे बंद दार तुमच्यासाठी उघडले जाईल.

काही मिनीटे बसुन राहील्यास, एकदम शांत शांत वाटते, उत्साह वाटतो, तुमच्यामध्ये दैवी शक्तीचा संचार होत असल्याची अनुभुती येते.

नियमित रीलॅक्शेशन प्रक्रिया केल्याने बीपी, हर्ट अटॅक अजिबात होत नाही.

झोप खुप छान लागते.

४) चौथा टप्पा (सर्वात महत्वाचे) व्हिज्वलायजेशन

तुम्ही सर्वांनी तुमच्या आयुष्यात सर्वात महत्वाचे असलेले चार गोल्स लिहुन ठेवले आहेत. (एक कोटी रुपये, बंगला-गाडी, निरोगी आणि आकर्षक व्यक्तिमत्व, प्रेमळ कुटुंब)

एका विशीष्ट क्रमाने हे चार गोल्स तुम्हाला इमॅजिन करायचे आहेत.

तुमच्या ड्रिम्स बद्द्लच्या तुम्ही तयार केलेल्या स्वयंसुचना स्वतःला देण्याची सुरुवात करा.

इमॅजिन करताना, फक्त डोळ्यांचा नाही, पाचही इंद्रियांचा वापर करा.

दृश्यांमध्ये, वाक्यांमध्ये भावना ओता, जणु काही प्रत्यक्षातच तुम्ही ते जगत आहात. स्वप्नांना जिवंत करा, फिल करा.

मनातल्या मनात वाक्ये म्हणताना ती सकारात्मक आणि वर्तमानकाळात असावीत.

उदा. येत्या एक वर्षात, मला एक कोटी रुपये मिळालेले आहेत.

स्वयंसुचना देताना पुर्णपणे त्यात समरस व्हा!

लक्षात ठेवा, ‘भावना’ तुमच्या स्वप्नांना वास्तवात कन्व्हर्ट करतील.

ही प्रक्रिया एक महीना रोज नियमित केल्यास स्वयंसुचना अंतर्मनात रुजण्याची सुरुवात होते, कितीही अशक्य कोटीतली स्वप्ने असो, ती पुर्ण करण्यासाठी अंतर्मन आकाशपाताळ एक करते.

मागच्या तीनचार वर्षांपासुन ह्या सर्व क्रिया करतो, आणि ह्या सर्वांचा मला खुप फायदा झाला, माझी अनेक स्वप्ने आश्चर्यकारक रित्या पुर्ण झाली आणि माझा विश्वास दृढ झाला.

जाता जाता, एक मज्जा सांगतो.

दोन अडीच वर्षांपुर्वी मी अत्यंत लाजाळु होतो. फेसबुकवर मी अनेक मोठ्या मोठ्या फेमस, दिग्गज लोकांच्या पोस्ट नियमित वाचायचो.

त्यांच्या अर्टिकल्सवर लाईक कमेंटचा पाऊस पडलेला बघुन मला उगीचं वाटायचं, मी ही असेच लेख लिहेन, ते लोकांना आवडतील आणि लोक माझ्याही पोस्ट वर लाईक कमेंटचा पाऊस पाडतील.

दोन वर्षांपुर्वी मी उत्साहाने फेसबुकवर पहीला लेख लिहला, त्याला दोन लाईक मिळाले.

मी अजिबात निराश झालो नाही.

कित्येक दिवस मी फक्त इमॅजिन करत राहीलो, की माझे लेख हजारो लोकांपर्यंत पोहचत आहेत, न कंटाळता, उत्साहाने लिहत राहीलो.

आणि ती गोष्ट आज प्रत्यक्षात अवतरलेली आहे, म्हणुन तर आज आपण एकमेकांशी जोडलो गेलो आहोत, आणि आज तुम्ही माझा हा लेख वाचत आहात.

माझ्या ह्या स्वप्नवत प्रवासाचे तुम्ही प्रत्यक्ष साक्षीदार आहात, यापेक्षा मोठं प्रमाण काय देऊ?

तेव्हा तुम्ही सर्वजणही स्वसंमोहन आणि स्वयंसुचनेची टेक्निक यांच्यावर पुर्ण विश्वास ठेवा, आणि येणारा एक महिना रोज ही आयुष्य बदलावुन टाकणारी क्रिया करा.

तुम्हाला मिळालेले यश आणि अनुभव मला ऐकायला मी आतुर आहे. तुमचा प्रत्येक लाईक माझा उत्साह वाढवतो. स्वसंमोहनाविषयी तुमचे अनुभव किंवा प्रश्न कमेंटबॉक्स मध्ये शेअर करा.

हा लेख वाचुन, तुमच्या मित्रांना फायदा होईल असे वाटत असल्यास शेअर करा.

खुप शुभेच्छा!

वाचण्यासारखे आणखी काही…

मैत्री….और जिने को क्या चाहिये
ए बॅग ऑफ स्माईल्स!! (A bag of smiles)
हा प्रवास सुखावह करेल तुमचा आशावाद…

मनाचेTalks च्या लेखांबद्दल वाचकांच्या प्रतिक्रिया….

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

3 Responses

  1. Deepak says:

    How to do it exactly….I am doing now a days Sudershan kriya regularly…of happiness program by Gurudev Shri Shri Ravishankar ji…plz I tell me all about it in somewhat more detail…

  2. IAS says:

    Thank you….i am IAS Officer …..ur as like me

  3. Deepak Pandharpatte says:

    सर नमस्ते
    अवचेतन मन या विषयी मी खूप वाचले आहे व ऐकले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!