तीसरी कसम… विस्मृतीत गेलेला सिनेमा पुन्हा नव्याने बघू..

तब्बल एक्कावन्न वर्षापुर्वी, म्हणजे १९६६ मध्ये प्रदर्शित झालेला राज कपुर आणि वहीदा रहेमान यांचा ‘तीसरी कसम’ सिनेमा पाहीलाय?

उत्तर “नाही”, असल्यास, “दुनिया बनानेवाले काहे को दुनिया बनाई?” हे गाणं तर कुठे ना कुठे नक्कीच ऐकलं असेल.

‘शोमॅन’ राज कपुरच्या सर्वोत्कृष्ट कलाकृतीमधली एक म्हणजे ‘तीसरी कसम’.

बिहारमध्ये एक प्रसिद्ध लेखक होते, फनिश्वरनाथ रेणु. त्यांनी एक लघुकथा लिहली, “मारे गये गुलफाम”.

प्रसिद्ध गीतकार ‘शैलेंद्र’ त्या कथेच्या प्रेमातच पडला, आणि ह्या पहील्या आणि शेवटच्या चित्रपटसाठी हा शब्दांचा बादशहा, चक्क निर्माता बनला, आणि आयुष्याची सगळी कमाई पणाला लावुन त्याने हा चित्रपट बनवला, आणि त्याने आपल्याला ही सुंदर भेट दिलीय.

ही गोष्ट घडते बिहारमधल्या पुर्णिया जिल्ह्यातल्या छोट्याशा गावात.

चित्रपटाचा नायक राज कपुर ह्या छोट्या गावात बैलगाडी चालवणारा मजुर आहे. त्याचं नाव हिरामन.

हीरामन स्वभावाने अगदी निरागस आणि भाबडा आहे. एकदा चोरीचा माल घेऊन जाताना पोलीस त्याच्या गाडीची जप्ती करुन दम देतात. साध्याभोळ्या, सरळमार्गी हीरामनला हा अपमान सहन होत नाही, तेव्हा आयुष्यातली पहीली शपथ घेतो की ह्यापुढे चोरीचा माल गाडीत घेऊन जाणार नाही.

नंतर गाडीत क्षमतेपेक्षा जास्त बांबु भरलेले असताना, गाडी उलटते, अपघात होतो आणि लोक त्याला बेदम चोप देतात, तेव्हा त्याने आयुष्यात दुसरी शपथ खाल्लीय की यापुढे बांबुची वाहतुक करणार नाही.

तीसरी कसम

तर अशा ह्या हिरामनला एके दिवशी त्याला एक सवारी भेटते, हिराबाई.

ही सुंदर नृत्यंगणा आहे, शेजारच्या गावात जत्रेत सोडण्यासाठी ती हीरामनच्या बैलगाडीत बसते.

प्रवासात गप्पा मारताना, हळुहळु दोघांची गट्टी जमते. हिराबाईला हिरामनच्या सालस, निरागस स्वभावचं अप्रुप वाटतं. त्याचा स्वभावचं मनमोकळा आहे, त्याच्या गप्पांमध्ये इतकी निरागसता आहे, की तो तिलाच नाही, आपल्यालाही मोहवुन टाकतो.

प्रवासात एक ओढा लागतो आणि हिरामन तिला महुआ नावाच्या सुंदर मुलीची दुःखद, करुण लोककथा सांगतो, आणि गाणं ऐकवतो.

हिराबाई महुआमध्ये स्वतःला बघते आणि अजुनच त्याच्या प्रेमात पडते.

प्रवास संपतो, आणि जत्रेचं गाव येतं, हिराबाई हिरामनला तिचा ‘डान्सशो’ बघण्यासाठी आमंत्रण देते, स्पेशल पासेसही देते.

हिरामन आणि त्याचे साथी आनंदाने तिचं नृत्य पाहायला जातात आणि पाहुन हरखुनही जातात, पण काही वाईट प्रवृत्तीचे लोक तिला वेश्या सम्बोधतात. तेव्हा हिरामनला हा अपमान सहन होत नाही, तो खवळुन त्यांच्या अंगावर धावुन जातो.

हिराबाई त्याला बोलवुन समजावते, तिच्या मालकाने तिचा सौदा केलाय आणि हेच तिच्या जगण्याचं वास्तव आहे, हिरामन तिला हे सर्व सोडुन आपल्याबरोबर येण्याची कळकळीची विनंती करतो,

पण ती नकार देते…..

हिरामनला हे दुःख सहन होत नाही.

हळव्या मनाचा हिरामन खुप हर्ट होतो, ओक्साबोक्शी रडतो.

आणि तेव्हा त्याने तिसरी शपथ घेतली.

आता यापुढे तो कुठल्याही सुंदर स्त्रीला आपल्या बैलगाडीत सवारी म्हणुन बसवणार नाहीये. हीच ती तीसरी कसम.

हीराबाई आणि हीरामनच्या ह्या गोष्टीत आपण एकरुप होवुन जातो.

ही फक्त त्यांची गोष्ट न राहता, प्रत्येकाच्या काळजाला हात घालते, झालचं तर, आपापल्या, अपुर्ण-अधुऱ्या प्रेमाची आठवणही करुन देते.

अवघड परीस्थीतीशी झुंजण्यात शक्ती वाया न घालवणारा, शपथ घेऊन संकटापासुन पळ काढणारा, साध्या भोळ्या स्वभावाचा आणि निर्मळ मनाचा हिरामन आपल्याही प्रत्येकात दडलेला असतोच की…..

आपल्या निरागस अभिनयाने राज कपुर आपल्याला जिंकुन घेतो.

तर पुर्वार्धात प्रेमासाठी भुकेली असणारी, हिरामनच्या साधेपणावर भाळलेली, त्याला आपल्या हाताने स्वयंपाक करुन वाढणारी. आणि उत्तरार्धात व्यावहारीक जग पाहीलेली, कठोर ‘हिराबाई’ वहीदाने अगदी सुरेख साकारलीय.

“सजन रे झुठ मत बोलो”, “चलत मुसाफिर”, “पान खाये सैंय्या हमारे” ही सगळी गाणी आजही ओळखीची आहेतच.

पण मुकेश आणि सुमन कल्याणपुरचे “दुनिया बनानेवाले काहे को…” हे अवीट गाणं मनाला हलवुन टाकणारं आहे.

ह्या गाण्यात देवाकडे तक्रार आहे, व्याकुळ होवुन विचारलेले, अनेक निरुत्तरीत प्रश्न आहेत आणि त्याहुन पुढे जावुन एक विलक्षण आर्त हाक आहे.

चित्रपटात कित्येक हलकेफुलके प्रसंगही आहेत आणि ते मनमोकळेपणे हसवतात.

पण एका बेसावध क्षणी टचकन डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा आणणारा असा आहे हा ‘तीसरी कसम’.

ह्या चित्रपटाला त्यावर्षीचा ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ असा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, समीक्षकांनी आणि रसिकांनी ह्याची खुप स्तुती केली पण….. तद्दन गल्लाभरु चित्रपटांच्या गर्दीत हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर मात्र कोसळला.

पहील्यांदाच निर्माता झालेल्या शैलेंद्रने खुप कर्ज काढलं होतं, आर्थिक अडचणीमुळे तो अजुनच दारु प्यायला लागला आणि ताण सहन न होवुन प्रकृतीअस्वाथ्यामुळे त्याचं निधन झालं.

आज योगायोगाने हा पिक्चर युट्युबवर पाहीला, आणि त्याने लेखणी उचलायला भाग पाडलं.

धन्यवाद!..

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय