दुष्काळाच्या येऊ घातलेल्या संकटापासून शेतकऱ्यांना मानसिक आधार: संकट हीच संधी

मानसिक आधार

प्रश्न – सर, मी एक शेतकरी आहे. माझे वय अठ्ठेचाळीस वर्ष आहे, माझ्याकडे पाच एक्कर जमिन आहे.

सव्वा एक्कर जमिनीवर एप्पल लावलेला आहे, एक एक्कर उस, दोन एक्कर कापुस आहे. अडीचशे संत्र्याची झाडं आहेत, ज्यांना पुढच्या वर्षी बहर येईल. सफरचंद, उस, कापुस ही पीकं हाता तोंडाशी आली आहेत, पण पाऊस कमी झाल्याने विहीरीमध्ये थोडेशेच पाणी उरले आहे. जर अजुन पाण्याची पातळी खाली गेली तर आतापर्यंत कष्टाने जमवलेलं हे सगळं, हातातुन जाण्याची सारखी भीती वाटते. अशा मध्ये मनात सारखं काहुर सुरु असते.

मुलाला उच्चशिक्षित करायचं माझं स्वप्न आहे आणि आता त्याचा अकरावी बारावीचा खर्च प्रचंड आहे. आधीच त्या आर्थिक कात्रीत सापडलो आहे, आता हे संकट उभं ठाकलं आहे.

आपण मला मॅसेज पाठवलात की आपल्या आयुष्यात येणारी वेगवेगळी आव्हानं आपल्या मदतीसाठी येतात, मग माझ्या आयुष्यात आलेलं हे आव्हान, माझी कसं बरं मदत करेल?

आपल्या उत्तराच्या प्रतिक्षेत, धन्यवाद!

नमस्कार XXX जी,

आपल्याला खरोखर मनःपुर्वक शतशः नमन!, ह्या देशाचा शेतकरी जेव्हा अपार कष्ट घेऊन धान्य, भाज्या आणि फळे पिकवतो, तेव्हाच आम्हाला ते सगळं खायला भेटतं, याबद्द्ल मी आपला ऋणी आहे. मला जाणीव आहे की आपल्या मेहनतीच्या आणि कष्टाच्या मानाने मिळणारा मोबादला हा कवडीमोल आहे.

त्याउप्पर हे निसर्गाचं चक्र बेभरवशाचं झालयं, तेव्हा आपल्या मनात संकटाचे ढग दाटुन येणं साहजिकच आहे. आपली चिंता, भीती आणि दुःख अगदी साहजिक आहे. आजच्या घडीला हीच चिंता पीक शेवटच्या टप्प्यात असणाऱ्या हजारो-लाखो शेतकऱ्यांची असेल.

माझा विश्वास आहे की देवाने ह्या जगात असं कुठलंही कुलुप बनवलं नसेल, ज्याची चावी नाही, आणि अशी कुठलीही समस्या बनवली नसेल, ज्याचं उत्तर नाही, तेव्हा चला, आपण दोघे मिळुन तुमच्या प्रश्नावरची उत्तरे शोधुया.

कुठल्याही समस्येला सोडवण्यासाठी दोन प्रकारे लढावे लागते.

१) तात्काळ कृती २) दिर्घकालीन उपाययोजना

आधी आपण तात्काळ काय करावे लागेल याविषयी बोलु.

तुमचे पीक हातातोंडाशी आलेले आहे, शेवटच्या टप्प्यात आहे, काही दिवस तग धरण्याइतके पाणी तुमच्या विहीरीत आहे, ही किती अनुकुल गोष्ट आहे? तिचा फायदा घ्या, वातवरणाचा अंदाज अगोदरच तुम्हाला आला आहे, तेव्हा त्याचाही फायदा घ्या, आता नकारात्मक विचार मनात अजिबात न घोळवता, आपले एकशे दहा टक्के लक्ष शेतामध्ये द्या, मनापासुन त्या परमपित्या परमेश्वराची प्रार्थना करा, तुमची अतुट श्रद्धा तुम्हाला नक्की यश देईल, आणि तुमची सगळी पिकं तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त भरघोस उत्पन्न मिळवुन देतील, असा विश्वास मनी बाळगुन, परीस्थितीवर आणि संक़टांवर तुटुन पडा.

वर्षभर एवढी मेहनत घेतलेली असताना, आता थोडक्यासाठी माघार नाही घ्यायची. माणुस पहीले मनामध्ये हरतो, मग प्रत्यक्षात हरतो. उभ्या बागा मोडणारे आणि जाळणारे पहिले मनाने खचलेले असतात, खरा लढवय्या शेतकरी शेवटच्या दाण्यापर्यंत झुंज देतो!

पाऊस पडावा की नाही, आणि तो किती पडावा, ह्यावर आपलं अजीबात नियंत्रण नाही, पण किती पाऊस पडला तर कोणत्या पीकाला किती पाणी द्यायचं, याचं नियोजन नक्कीच आपल्या हातात आहे. दुष्काळ पडेल का नाही, हे आपल्या हातात नाही, पण त्या दुष्काळरुपी राक्षसाला समोर बघुन भीतीने थरथर कापायचं, का निधड्या छातीने सामोरं जायचं, हे शंभर टक्के आपल्या हातात आहे.

तुमच्यासमोर आलेल्या आव्हानाला तुम्ही सुवर्णसंधी बनवा, रात्रंदिवस एक करा, कमीतकमी विक्रमी वेळे मध्ये कपाशीची काढणी करुन, दुष्काळ पडायच्या आधी ते काम संपवा.

वाईटात वाईट काहीही झाले, तरी तुमची जमीन आणि त्यात असलेले पीक तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला उपाशी मरु देणार नाही, ही खुणगाठ मनाशी निश्चित करा, बिनधास्त आणि निर्धास्त रहा.

नकारात्मक माणसांपासुन, चर्चेपासुन, टी. व्ही. वरील बातम्यापासुन दुर राहा. ते तुमचा उत्साह शोषुन घेतील.

जास्तीत जास्त उत्पन्न आणि कमीत कमी खर्च तुम्हाला अधिकाधिक शक्तीशाली बनवेल.

मुलाला आणि घरच्यांना सत्य परिस्थिती सांगत रहा, आणि पहाडासारखे खंबीर राहुन तुम्ही किती समर्थपणे परिस्थिती हाताळत आहात, हे त्यांना कळल्याचे दोन फायदे होतील. एक ते सुद्धा अनावश्यक खर्च कमी करतील, दुसरा कुटूंबातले सदस्य एकमेकांना मानसिक आधार देतील.

पैसा आणि प्रेम यांचा डायरेक्ट संबंध नसतो, पैसा आणि आनंद यांचाही डायरेक्ट संबंध नसतो. पुरेसा पैसा हाताशी नसतानाही आपण खुप प्रेमळ आणि खुप आनंदी राहु शकतो.

दिर्घकालीन उपाययोजना

तुमचे वय अठ्ठेचाळीस वर्ष आहे, आजपर्यंत तुम्ही कितीतरी दुष्काळांचे साक्षीदार असाल, मग भविष्याची उपाय योजना म्हणुन तुम्ही काहीतरी दुसरा उत्पन्नाचा सोर्स उभा करावा, असे तुम्हाला वाटले असणारच! आता त्यावर कठोरपणे अंमलबजावणीची सुरुवात करा.

मानसिक आधार

शेतीपूरक उद्योगधंद्यांपैकी एक

एकेक रुपया विचार करुन खर्च करा. आलेलं संपुर्ण उत्पन्न शेतात लावुन जुगाराल लावुन जीवाला घोर लावुन घेण्यापेक्षा, वीस ते तीस टक्के पैसा, बचत गुंतवणुकीत साठवण्याची सुरुवात कराल तर फक्त पाच ते दहा वर्षात आर्थिक विवंचनेतुन मुक्त व्हाल.

समस्या आहे, ती तीव्र आहे, हे सुद्धा मान्य पण येणारा प्रत्येक अनुभव दिवसांगणिक आपल्याला शहाणा बनवत आहे. प्रत्येक समस्या, प्रत्येक आव्हान आपल्यातल्या अफाट शक्तीला प्रदर्शित करण्याची एक संधीच आहे.

ज्यांनी गरीबीचे चटके भोगलेले असतात, पैशाची खरी किंमत त्यांनाच समजते.

ज्याचा समाजात पदोपदी अपमान होतो, तोच ईर्ष्येने पेटुन उठतो, आणि स्वतःला ह्या समाजापुढे सिद्ध करुन दाखवतो, अशी उदाहरणे तुम्ही नक्कीच पाहिली असतील.

तेव्हा हे आव्हान सुद्धा तुम्हाला काहीतरी देण्यासाठी आलेलं आहे, याची पक्की खात्री बाळगा, निराशा, भीती चिंता सोडा आणि कामावर फोकस करा.

आपल्या सर्व वाचक मित्रांना माझी विनंती आहे की ह्या आपल्या शेतकरी बांधवासाठी, आपण मनापासुन देवाकडे प्रार्थना करुया.

आपली प्रार्थना, श्रद्धा आणि विश्वास ही जगातली सर्वात चमत्कारिक देणगी आपल्याला मिळालेली आहे, तिचा वापर करुया.

आभार आणि धन्यवाद!

मनाचेTalks च्या लेखांबद्दल वाचकांच्या प्रतिक्रिया….

वाचण्यासारखे आणखी काही…

जागृत मन आणि सुप्त मन यांची शक्ती वापरून यशस्वी होण्याचं तंत्र…
Key of Subconscious Mind! जाणून घेऊ स्व-संमोहन कसे करता येईल…


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!