एन. आर. आय. व्यक्ती पी. पी. एफ. खाते काढू शकते का?

पी. पी. एफ. खाते

अलिककडेच पी. पी. एफ. मुदतपूर्तीनंतरचे पर्याय या विषयाच्या संदर्भात प्रसारित केलेल्या लेखास अनुसरून काही व्यक्तींनी एन. आर. आय. व्यक्तींच्या या खात्यासंबंधीच्या शंका उपस्थित केल्या. त्याच्या शंकांचे निरसन या द्वारे करीत आहे.

पी. पी. एफ. हि करमुक्त उत्पन्न देणारी, सरकारची हमी असणारी तसेच करसावलतींचा लाभ देणारी सर्वात जुनी योजना आहे. सध्याच्या नियमानुसार ही योजना फक्त भारतीय नागरिकांसाठी आहे. त्यामुळेच अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारलेली परंतू मूळ भारतीय असलेल्या व्यक्तीस हे खाते उघडता येत नाही. २००३ पूर्वी एन. आर. आय. व्यक्ती हे खाते उघडू शकत होत्या. अशा खात्याची मुदत संपल्यावर ती खाती बंद झाली. या बंदीनंतर पुढे १५ वर्ष झालेली असल्याने सध्या कोणत्याही एन. आर. आय. चे असे खाते असण्याची शक्यता नाहीच.

राहिला प्रश्न अशा व्यक्तींचा जे भारतीय नागरिक होते तेव्हा त्यांनी पी. पी. एफ. खाते काढले आणि नंतर दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले आहे. २०१७ च्या अर्थखात्याच्या परिपत्रकानुसार ३ ऑक्टोबर २०१७ पासून एखादा खातेधारक पी. पी. एफ. खाते चालू करून नंतर दुसऱ्या देशाचा नागरिक झाला असेल तर त्याने ज्या दिवशी दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले त्यादिवशी त्याने आपले पी. पी. एफ. खाते बंद केले असे समजण्यात येऊन त्यानंतर सदर व्यक्ती त्याचे खाते स्वतःहून बंद करेपर्यंत त्यावर ४% प्रतिवर्षं प्रमाणे व्याज देण्यात येईल. अशा प्रकारे सरकारी निर्णय झाल्यावर त्याची सूचना बँकापर्यत नीटपणे पोहोचली नाही आणि सरकारने यावर चक्क घुमजाव केले असून २३ फेब्रुवारी २०१८ रोजी नवीन पत्रक काढून जुने परिपत्रक मागे घेतले आहे त्यामुळे नवीन नियमानुसार जुना निर्णय रद्द झाला असून सदर खाती मुदतपूर्तीपर्यंत चालू ठेवता येतील आणि त्यात NRE/NRO खात्यातून पैसेही भरता येतील.

ज्यांनी आपली खाती बंद केली नाहीत त्यांना यामुळे काहीही फरक न पडून सर्व सेवा सुविधा पूर्वीप्रमाणे मिळत राहातील. ज्यांनी जुन्या परिपत्रकाप्रमाणे आपली खाती बंद केली त्यांचे काय? त्यांना ३ ऑक्टोबर १७ पासून खाते बंद करेपर्यंत च्या कालावधीतील व्याजाचा फरक मिळाला पाहिजे. याशिवाय त्यांनी खाते बंद केल्याने त्यांची इच्छा असल्यास नवीन खाते काढण्याची एक संधी मिळाली पाहिजे. सध्याच्या नियमानुसार एन. आर. आय. व्यक्ती पी. पी. एफ. खाते काढू शकत नाहीत. अर्थमंत्रालयाने यासंबंधी खुलासा करणे जरुरीचे आहे.

P.P.F. बद्दल आणखी काही….

महिन्याच्या ५ तारखेआधी P.P.F. मधील गुंतवणूक फायदेशीर

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF) – माहित करून घ्या मुदतपूर्तीचे विविध पर्याय!


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!