कॅशलेस व्यवहार करण्याचे विविध पर्याय आणि इंटरनेट बँकिंगची माहिती जाणून घ्या.

आपल्या देशातील प्रत्येकाने जास्तीतजास्त कॅशलेस व्यवहार करावेत अशी सरकारची इच्छा असून यास चालना देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रोख रकमेच्या व्यवहाराची कोठेही नोंद होत नसल्याने त्यातून अर्थव्यवस्था नेमकी कोणत्या दिशेकडे आहे याचा निश्चित अंदाज बांधता येत नाही. बहुतेक व्यवहार (कॅशलेस व्यवहार) रोख रकमेचा किमान वापर करूनच व्हावेत असे सरकारचे धोरण असल्याने या संबंधी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. एका विशिष्ठ रकमेच्या वरील व्यवहार रोख स्वरूपात करण्यास बंदी असून ते व्यवहार बेकायदेशीर समजण्यात येऊन त्यावर दंड आकारण्याची तरतूद आहे. याशिवाय ते आयकर खात्याच्या निदर्शनास येऊन त्यांची चौकशी होऊ शकते. यात आपले दैनंदिन व्यवहार रोखीने करता येऊ शकतील असे गृहीत धरण्यात आले असून ज्यांना शक्य असेल त्यांनी हे व्यवहारसुद्धा रोख रकमेने न करता म्हणजे कॅशलेस व्यवहार करावेत यासाठी प्रोत्साहन देण्यात आलेले आहे. कॅशपासून ‘लेसकॅश ते कॅशलेस’ चा प्रवास अनेक गोष्टींनी करता येतो. हे व्यवहार अतिशय पारदर्शक आहेत आणि त्याची कुठेनाकुठे नोंद होत असल्याने त्याचा मागोवा घेणे शक्य आहे. त्यातील महत्वाच्या गोष्टींवरील हा धावता दृष्टिक्षेप….

कॅशलेस व्यवहार करण्याचे विविध पर्याय

  • धनादेश किंवा चेक : पैसे हस्तांतरित करण्याची ही सर्वात जुनी पद्धत असून ज्यास पैसे द्यायचे असतील त्याचे नाव, रक्कम, धनादेश दिल्याची तारीख आणि सही करून द्यायचा असतो. सदर व्यक्ती किंवा संस्था आपल्या खात्यात जमा करण्यासाठी देईल. त्याचे समाशोधन होऊन ती रक्कम संबंधितास मिळेल. ही प्रक्रिया कमीतकमी वेळेत व्हावी अशा तांत्रिक सुधारणा केल्या गेल्या असून यामध्ये पैसे मिळू न शकण्याच्या काही अडचणी आहेत. जसे चेक देणाऱ्याची सही न जुळणे किंवा त्याच्या खात्यात पुरेशी शिल्लक नसणे.
  • धनाकर्ष (Dimand Draft) : किंवा डी डी, ही एक पैसे खात्रीने हस्तांतरित करण्याची जुनी पद्धत आहे. हा एका बँकेने दुसऱ्या बँकेस दिलेला पैसे देण्यासंबंधीचा आदेश असल्याने पैसे मिळणार नाहीत असे होत नाही. चेक आणि डी. डी. साठी संबंधित व्यक्तीस किंवा त्याच्या प्रतिनिधीस बँकेत जावे लागते त्याचप्रमाणे पैसे मिळण्यास विलंब होतो या दोन पद्धतीतील त्रुटी आहेत.
  • ECS, NEFT, RTGS, IMPS : पैसे चढत्या क्रमाने, वेगाने हसत्तांतरीत करण्याच्या नेटबँकिंगच्या आधुनिक पद्धती असून यामुळे कोठूनही कोठे पैसे पाठवणे शक्य झाले आहे. या प्रत्येक पद्धतीत फरक असून त्याचे निश्चित असे फायदे तोटे आहेत. यामधील व्यवहार हा खाते क्रमांक, ECS किंवा IFS कोड वापरून केला जातो. यात काही फरक पडल्यास संबंधित खाते अस्तीत्वात नसेल तर व्यवहार होत नाही परंतू जर त्या क्रमांकाचे खाते आणि कोड अस्तित्वात असेल तर पैसे अन्य व्यक्तीच्या खात्यात जावू शकतात. बँकेच्या चुकीने असे व्यवहार झाल्यास ते उलट करण्याचा अधिकार बँकेस आहे परंतू ग्राहकाच्या चुकीने असे व्यवहार झाल्यास ते व्यवहार उलट होऊ शकत नसल्याने केवळ विनंती करून अथवा कायदेशीर कारवाई करूनच उलट होऊ शकतात. मोठया प्रमाणात रक्कम द्यायची असल्यास खाते क्रमांक आणि IFS कोड यांची पुन्हा पुन्हा खात्री करून घ्यावी. याशिवाय अल्प रक्कम पाठवून ती मिळाल्याची खात्री करून घेऊन मगच मोठी रक्कम पाठवावी. असे व्यवहार ऑनलाईन करण्याची सवलत आणि इंटरनेट कनेक्शन असणे जरुरी आहे. याशिवाय बँकेत जाऊनही हे व्यवहार करता येतात.
  • डेबिट आणि क्रेडिट कार्ड : आता बँकांनी आपल्या सर्व ग्राहकांना दिलेली ATM कार्ड ही ATM कम डेबिट कार्ड आहेत. तर अनेक बँका, बँकेतर वित्तसंस्था या क्रेडिट कार्ड च्या व्यवसायात असून त्यांनी अनेकांना अशी कार्ड दिली आहेत यामुळे रोख अथवा उधारीचे व्यवहार करणे शक्य झाले आहे. याचा कार्डक्रमांक आणि तीन अंकी संकेतांक CVV यांचा तसेच एक तात्पुरता व्यवहार क्रमांक OTP यांचा वापर करून पैसे नेटबँकिंगचा वापर करून हसत्तांतरीत करता येतात अथवा एका मशीनवर (POS) पासवर्डद्वारेओळख पटवून करता येतात.
  • ई-वॉलेट आणि मोबाईल वॉलेट : ही वेगळ्या प्रकारची पैशांची पाकिटे आहेत. ज्याप्रमाणे आपण घरातील कपाटातून घेतलेले पैसे पाकिटात ठेवतो आणि वापरतो त्याप्रमाणे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड ई वॉलेटशी जोडून पासवर्ड वापरून व्यवहार करता येतात उदा. PayPal, Payoneer ई.तर खात्यातील पैसे मोबाईल वॉलेटमध्ये टाकून आपल्या गरजेनुसार वापरता येतात उदा. PayUMoney, Peytm ई. हे पर्याय वापरण्यास अधिक सोपे आणि छोट्या मोठया व्यवहारास उपयुक्त असल्याने अधिक लोकप्रिय आहेत.
  • UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस : यावर एक स्वतंत्र लेख लिहिणार असून ही पैसे ट्रान्सफर करण्याची वेगवान आणि अचूक पद्धत आहे. यासाठी आभासी पत्त्याची ( Vertual Address) जरुरी आहे. सध्या रोज एक लाख रुपयांच्या मर्यादेत या पद्धतीने व्यवहार करता येतात.
  • गिफ्ट कार्ड : डेबिट कार्डच्या आकाराची ही एक विशिष्ठ रक्कम असलेली आधुनिक आहेराची पाकिटे असून ती बँक अथवा मोठया दुकानदारांकडून मिळतात आणि अनेक ठिकाणी गरजेनुसार वापरता येतात.
  • AEPS आधार अनेबल पेमेंट सिस्टीम : छोट्या प्रमाणात व्यवहार करण्यासाठी ही पद्धत उपयुक्त असून त्यासाठी खाते आधार संलग्न असणे जरुरी आहे. छोट्या फिंगर स्कॅनरने ओळख पटवून पैशाचे व्यवहार केले जातात. आधारसंबंधी सर्वोच्य न्यायालयाच्या अलीकडच्या निर्णयामुळे यापद्धतीचे भवितव्य अंधारमय आहे.
  • USSD अनस्ट्रक्चर सप्लिमेंटरी सर्व्हिस डाटा: या पद्धतीने ज्यांच्याकडे स्मार्टफोन आणि इंटरनेट नाही अशा व्यक्तींना आपले छोटे बँकिंग व्यवहार करू शकतात. यासाठी मोबाईलची नोंदणी बँकेकडे असणे आवश्यक आहे. बहुतेक सर्व बँकांनी आपल्या खातेदारांना ही सोय देऊ केली आहे.

वाचण्यासारखे आणखी काही…

ऑनलाईन बँकींग गैरव्यवहार आणि ग्राहक
गूगलचे नवे पेमेंट अॅप “TEZ” आता बदललेले नाव “गुगल पे”


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय