स्वस्तात परदेश प्रवास करता येईल असे देश कोणते?

पर्यटनासाठी परदेशवारी करणं कोणाला नको असतं. सुटीचा दिवाळी हंगाम, गुलाबी थंडी पडण्याचे दिवस आणि येणारं नवीन वर्ष असं असतांना आपल्यातले बरेचजण परदेशात सुटी घालवण्याच्या विचारानेच नुसते सुखावून जातात.

पण आपला रुपया डॉलरच्या तुलनेत सातत्याने खाली घसरतोये तेव्हा परदेश प्रवास करण्याचं स्वप्नं तसंच गुंडाळून मुकाट्याने आपण पुढच्या कमला लागतो कारण वाटतं हे परदेशात सुट्टी घालवणं काही आपल्या बस ची बात नाही ये!!!

पण आजही पर्यटनाच्या दृष्टीने खूप सुंदर असलेले असे काही देश आहेत जिथे आपला रुपया त्यांच्या चलनासमोर चांगला मजबूत आहे. म्हणजे पर्यायाने तिथे फिरायला जाणं आपल्याला परवडणारं किंवा फायदेशीर सुद्धा ठरू शकतं.

परदेश प्रवास
श्रीलंका

आशिया, दक्षिण आशिया आणि युरोपातल्या काही जागा अजूनही स्वस्त आहेत. तिथला व्हिसा मिळवण्याची प्रक्रियसुद्धा बरीचशी सोपी आहे. यातलाच एक पर्याय आहे श्रीलंका.

भारत आणि श्रीलंका यातला सांस्कृतिक सम्बन्धही चांगला आहे. तिथले समुद्रकिनारे, डोंगरदऱ्या आणि एकूणच सौंदर्य अनुभवण्यासाठी श्रीलंकेला जरूर भेट देता येईल.

आपल्या १ रुपयाच्या मोबदल्यात तिथे जवळपास २.३० लंकन डॉलर आपल्याला मिळू शकतात.

आणखी दुसरा पर्याय म्हंटल तर तो आहे व्हिएतनाम. तिथलं जेवण परंपरा आणि निसर्ग सगळं काही मनाला भुरळ पाडणारं आहे.

व्हिएतनामचा गोल्डन ब्रिज, तिथली वेगवेगळी संग्रहालयं, तिथलं क्युसीन सगळंच काही रिफ्रेश करणार आहे. आपल्या एका रुपयाची किंमत साधारण ३१७ व्हिएतनामी डोन्ग असल्याने बजेटची खूप काळजी न करता प्रवास प्लॅन करायला काही हरकत नाही.

परदेश प्रवास
गोल्डन ब्रिज- व्हिएतनाम

साऊथ अमेरिकेतील पॅराग्वे हा जागतिक कम्पनी मर्सरच्या अहवालानुसार जगातला सर्वात किफायतशीर म्हणजे स्वस्त देशांपैकी एक आहे.

इथं राहणं खाणं पिणं एकदम स्वस्त आहे. एका रुपयाच्या बदल्यात ८०.१४ ग्वारानी. साऊथ अमेरिकन अनुभव स्वस्तात घ्यायचा असेल तर पॅराग्वे हा एक मस्त पर्याय आहे.

आता हिरवळीने आच्छादलेला कम्बोडिया. कम्बोडियाचं सौंदर्य आणि प्राचीन हिंदू इतिहासाचा मिलाफ आम्हा भारतीयांना आपलेपणाचा फील देतं हे तर सांगायलाच नको.

येथे १ रुपयासाठी ५५.४४ रियल मिळतात.

परदेश प्रवास
मंगोलिया

मंगोलिया चे नदीकाठ आणि डोंगरदऱ्या प्रसिद्ध आहेत. इथलं चलन मंगोल तुंगरिक ची किंमत एका रुपयासाठी ३३.७१ आहे.

कॉस्टारिका या मध्य अमेरिकेतल्या देशाची जैव विविधता प्रसिद्ध आहे. ७.७८ कोस्टारिकन कोलोन म्हणजे आपला एक रुपया. ज्युरासिक पार्कचं चित्रीकरण इथेच झालं होतं.

हंगेरी हा मध्य युरोपातील एक सुंदर देश. इथला हॉटेल स्टे किफायतशीर आहे आणि म्हणूनच कमी खर्चाच्या युरोप सफरीसाठी हंगेरी प्रसिद्ध आहे. एका रुपयाला ३.८० फोरेट ची किंमत मिळते.

आइसलँड, बेलारूस हेही देश कमी खर्चात परदेशवारी करण्यासाठी अतिशय योग्य आहेत. परदेशांमध्ये राहण्यासाठी AirBnB खूप चांगला पर्याय आपल्याला देऊ शकेल.

हि गोष्ट माहित असणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. हॉटेलांपेक्षा AirBnB चे ऑकोमोडेशन नक्कीच आपल्या खिशाला परवडतील.

अमेझॉनवर उपलब्ध असलेली मराठी प्रवासवर्णन पुस्तके

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “स्वस्तात परदेश प्रवास करता येईल असे देश कोणते?”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय