Ten Laws of Marketing! मार्केटींग चे दहा नियम!

मार्केटींग फक्त बिजनेस मध्येच नाही, जगात प्रत्येक ठिकाणी आवश्यक आहे, अमेरीकेमध्ये, एका बेरोजगार माणसाने नौकरी मिळवण्यासाठी, स्वतःचे फ्लेक्स छापुन चौकाचोकात लावले आणि त्यावर लिहले, “मला तुमच्या कंपनीत काम करण्याची संधी द्या!”

आपली वस्तु किंवा सेवा तोपर्यंत विकली जाऊ शकत नाही, जोपर्यंत आपण ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवत नाही. ब्रॅंडेड कंपन्या आपल्या नफ्याच्या बारा टक्के रक्कम जाहीराती आणि मार्केटींग वर खर्च करतात.

मार्केटींग फक्त बिजनेस मध्येच नाही, जगात प्रत्येक ठिकाणी आवश्यक आहे, अमेरीकेमध्ये, एका बेरोजगार माणसाने नौकरी मिळवण्यासाठी, स्वतःचे फ्लेक्स छापुन चौकाचोकात लावले आणि त्यावर लिहले, “मला तुमच्या कंपनीत काम करण्याची संधी द्या!”

जिथे बेरोजगारांना नौकर्‍या मिळत नव्हत्या, अशाच लोकांच्या गर्दीत आपल्या ह्या धाडसी चालीने त्याने सगळ्या माध्यमांचे लक्ष वेधुन घेतले, अनेक कंपन्यांनी त्याला बोलावले, व सर्वात जास्त पगार ऑफर केला, त्या कंपनीत तो रुजु झाला.

आपल्या आगळ्यावेगळ्या मार्केटींगने त्याने हे साध्य केले. फक्त पैसे खर्चुन मार्केटींग करता येते असे मुळीच नाही. त्यासोबतच काही बेसीक ज्ञान आणि कल्पकताही लागते.

ज्याप्रमाणे भौतिकशास्त्राचे सिद्धांत असतात, तसेच मार्केटींगचेही नियम आहेत.

मार्केटींगच्या क्षेत्राचा पंचवीस वर्षाचा सखोल अभ्यास करुन, जॅक ट्राऊट आणि अल राईज ह्या जोडगोळीने असे बावीस सिद्धांत मांडले, ह्या नियमांना वापरुन जगभरात कित्येक कंपन्यानी आपला नफा कित्येक पटींनी वाढवला.

त्यापैकी दहा नियम मी आज तुमच्याशी शेअर करत आहे. ह्या सुत्रांचं पालन करुन आपण मार्केटमधला आपला वाटा, निश्चितपणे वाढवु शकतो.

१) नेतृत्वाचा नियम

दुसर्‍यांची नक्कल करण्यापेक्षा, स्वतःची कल्पकता वापरुन, जगाला नवं आणि आकर्षक प्रॉडक्ट देऊन, आपल्या क्षेत्राचे लीडर बना. चंद्रावर पहीलं पाऊल ठेवणारा माणुस नील आर्मस्ट्रॉग होता, दुसरा कोण होता, हे कुणाच्या लक्षात नाही.

इतरांसारखे प्रॉडक्ट बनवुन, तेच ते विकुन तुम्ही लोकंचं लक्ष वेधुन घेऊ शकत नाही. असं काहीतर विका, जे आधी कूणीही बनवलं नव्हतं.

कोकोकोलाने शीतपेय सर्वात पहील्यांदा बनवलं, एप्पलने आयपॉड बनवला, नंतर ह्यांना कित्येकांनी कॉपी केलं, पण आजही मार्केट लीडर कोण आहे?

२) लॉ ऑफ कॅटॅगिरी

कल्पना चावलाचं नाव प्रत्येकाला माहित असतं, कारण ती पहीली भारतीय महिला अंतराळवीर होती. तुम्ही मार्केटचे लीडर जरी बनु शकला नाहीत तर आपल्या कॅटॅगिरीचे लीडर बनु शकता.

डेल कंपनी पहीली कंपनी होती जिने आपले कॉम्पुटर ऑनलाईन विकण्याची सुरुवात केली.

३) लॉ ऑफ माईंड
  • आपल्याला काहीही सर्च करायचे असल्यास आपण गुगलवर जातो.
  • दोन मिनीटात बनु शकणारा आणि कमीत कमी साधनांमध्ये बनणारा एकच पदार्थ आपल्या डोक्यात येतो, मॅगी! कारण मार्केटींग!
  • आपले प्रॉडक्ट, आपल्या सेवा लोकांच्या मनात ठसवा!
४) लॉ ऑफ पर्सेप्शन
  • कित्येकदा वस्तु जेवढ्या भासवल्या जातात, तितक्या उत्कृष्ट नसतातही, पण त्या नाव बघुन विकल्या जातात.
  • लक्सचा साबण इतरांपेक्षा बेस्ट असतोच, असे नाही, पण त्यांची ब्रॅंड व्हॅल्यु अशी काही आहे की नाव बघुन माल खपतो.
  • मम्मी असुन नवयौवनासारख्या सुंदर दिसु, अशा भाबड्या समजुतीतुन आया संतुर घेतात, हा पर्सेप्शनचा लॉ आहे.
५) लॉ ऑफ फोकस
  • तीस मिनीटे डिलीव्हरी टाईम नाहीतर पिझ्झा फ्री हे ऐकल्याबरोबर, डॉमिनोज पिझ्झा डोळ्यासमोर येतो. कारण हे मनावर ठसवण्यात ते यशस्वी झाले होते. त्यांनी वक्तशीरपणा ह्या एकाच गोष्टीवर फोकस केला आणि ब्रॅंड एस्टाब्लिश केला.
  • म्हणुन ठंडा मतलब _कोका कोला असं चटकन उत्तर येतं!
  • ‘घराला घरपण देणारी माणसं’, ही टॅगलाईन डी एस कुलकर्णींची ओळख बनली होती. तुम्हीही तुमच्या व्यवसायाची एक टॅगलाईन बनवुन ग्राहकांच्या मनात घर करु शकता.
६) स्वतःच्या वेगळेपणाचा नियम

दुसर्‍यांची कॉपी केल्यास आपली जाहिरात होण्याऐवजी आपण ज्याची कॉपी करतो, त्याचीच जाहिरात होते. पतांजलीने स्वदेशी मॅगी आणली खरी, पण मॅगीचा ब्रॅंड अजुन डोळ्यापुढे येत राहीला.

तसंचं पतांजलीने डाबर हनीला नावं ठेवले तरी नकळत त्यांचाच प्रचार होत होता.

७) शिडीचा नियम

हा लॉ सांगतो, स्वतःची मार्केटमधली पोझीशन ओळखा, आणि त्याचा सकारात्मक वापर करा.

एवीस कंपनी नंबर दोनला होती, तेव्हा त्यांनी त्याचा अनोखा वापर केला, “आम्ही दोन नंबरला आहोत, आम्हाला एक नंबर बनण्यासाठी आम्ही खुप मेहनत करतो” अशा आशयाच्या जाहीरातींनी त्यांनी लोकांची सहानभुती आणि विश्वास संपादन केला.

८) स्पर्धेचा नियम

आपल्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध उघड युद्ध छेडल्याने आपण चटकन जगाच्या नजरेत येतो. त्यात आपलाच फायदा असतो.

उदा. कोकोकोला वि. पेप्सी, एप्पल वि. ब्लॅकबेरी, आदीदास वि. नायके. हे लोक आपापसात स्पर्धा असल्याचे भासवतात, आणि दोघेही कमवतात, कारण दोघांमध्ये श्रेष्ठ कोण? हे शोधण्याच्या प्रयत्नात, बाकीच्या स्पर्धक खुप मागे पडतात.

लोकांना दोन खणखणीत भांडणारे पक्ष असले की एकाची साईड घ्यायला आवडते.

९) विरोधाचा नियम

दुसर्‍यांच्या स्ट्रॉग पॉईंटला टक्कर देण्यापेक्षा त्याचे कच्चे दुवे शोधा आणि त्याला स्वतःची शक्ती बनवा.

उदा, डॉमिनोजच्या तीस मिनीटात डिलीव्हरी ह्या जाहीराती विरोधात, एखाद्या पिझ्झा कंपनीने अशी जाहीरात ठेवली असती की आम्ही नुसतं तीस मिनीटात पिझा देऊ असं वचन देत नाही, पण आम्ही चवदार पिझ्झा असेल, असं वचन नक्की देतो.

मुष्टीयुद्धात विरोधी मल्लाच्याच बळाचा वापर करुन त्याला पाडलं जातं अगदी तसं विरोधाच्या नियमाचा वापर करुन बलाढ्य शत्रुच्या नाजुक जागेवर वार केला जावु शकतो.

१०) मत बदलवण्याचा नियम

मार्केटमध्ये आपली गरज निर्माण करण्यासाठी जाहीरात करुन आपल्याबद्द्ल अनुकुल मते बनवत रहा. दिर्घकालीन फायदा होईल.

उदा. म्युचल फंड ‘सही है!’ ह्या जाहिरातीने शेअर मार्केट आणि म्युचल फंड याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोण बदलवला. आजकाल दर महिन्याला पाच हजार करोड रुपयांच्या म्युचल फंडाची खरेदी होत आहे.

तुम्ही तुमची मार्केटींग तगडी बनवा, नात्यांमध्ये असो वा धंद्यामध्ये, स्वत;ला आकर्षक प्रेझेंट करा, लोकांवर प्रभाव पाडा, मार्केटींगचे युद्ध थंड डोक्याने लढा, आयुष्याची रंगत वाढेल आणि मजा येईल.

मार्केटींगचा खेळ जिंकण्यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा!

धन्यवाद!

मानाचे Talks च्या वाचकांच्या प्रतिक्रिया:
वाचनकट्टा...
वाचनकट्टा – मार्केटिंग बद्दल मराठी पुस्तकांचा

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय