रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहार आणि निसर्गोपचार वापरून उपाय

फक्त काळजी करत राहण्यापेक्षा आहार विहारातले काही नियम पाळून आपण आपले आरोग्य नक्कीच निरामय ठेऊ शकतो.

तेव्हा योग्य आहार घ्या, प्रदूषणापासून दूर रहा, नियमितपणे व्यायाम करा. आणि छोट्या मोठ्या आजारांना आपल्यापासून दूर ठेवा.

अचानक बदलणाऱ्या तापमनामुळे किंवा अस्थिर वातावरणामुळे अनेक जणांना तब्बेतीच्या तक्रारी उद्भवतात.

रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे सर्दी, खोकला, घसादुखी, डोकेदुखी आणि व्हायरल इन्फेक्शन चे प्रमाण पण खूप वाढलेले आहे. असे आजार होऊ नये याची काळजी घेणं हे नक्कीच आपल्या हातात आहे.

या सर्व आजारांपासून वाचण्यासाठी आपण आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी आपण पौष्टिक आहार घेतला पाहिजे आपण आपल्या आहारात अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन आणि मिनरल युक्त पदार्थांचा सामावेश करायला हवा.

नियमितपणे फळं, पालेभाज्या आणि ड्रायफ्रूट चा समावेश आहारात करायला हवा.

आपण आपल्या आहारात व्हिटॅमिन ‘सी’ चं प्रमाण वाढवलं पाहिजे त्यासाठी लिबु, संत्री यांचा वापर आपल्या रोजच्या आहारात केला पाहिजे.

रोज सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध घालून घेतल्याने अनेक आजारांपासून आपलं रक्षण होतं. याचबरोबर व्हिटॅमिन ‘ए’ चा समवेश सुद्धा आहारात केलाच पाहिजे. ते आपल्याला गाजर, रताळी आशा गोष्टीतून मिळू शकतं.

आपण आपल्या आहारात मासे किंवा ऑईली फिशचा समावेश नेहमी केला पाहिजे. रावस, बांगडा यासारख्या मास्यांमध्ये ‘ओमेगा थ्री फॅटी आसिड’चं प्रमाण जास्त असल्याने प्रतिकारशक्ती वाढून अनेक आजारांपासून रक्षण होते.

तसंच अक्रोड मध्ये सुद्धा ओमेगा थ्री फॅटी आसिडचे प्रमाण जास्त आहे. अक्रोडची पूड घरी बनवून ठेऊन ती रोजच्या जेवणाबरोबर घेतली तरी नक्कीच फायदा होतो.

रोज सकाळी आवळ्याचा रस किंवा चूर्ण मधातून घेतल्याने आपल्या शरीरातील टॉक्सिन्स पूर्णपणे निघून जातात. आपलं रक्त शुद्ध होतं. उत्साह आणि जोम प्राप्त होतं आणि त्याबरोबरच रोगमुक्ती होते.

रोजच्या आहारात भाज्यांचं सूप, आलं, तुळशीचा चहा याचा समावेश असू द्यावा.

त्याचबरोबर कांदा, हळद, लसूण यांचा समावेश आहारात केल्याने संसर्ग होण्याचं प्रमाण कमी करता येतं.

तसंच तळलेले पदार्थ, मैद्याचे पदार्थ, अल्काहोल, स्मोकिंग या गोष्टी शक्यतोवर टाळल्या पाहिजेत.

आपल्या शरीरात आपण सेवन केलेल्या सर्व न्यूट्रिण्ट्सच शोषण योग्य रितीने होण्यासाठी आपली पचनशक्ती चांगली असणं हे मुळात सर्वात महत्वाचं!!

पचनशक्ती वाढवण्यासाठी प्रोबायोटिक पदार्थांचा समावेश असला पाहिजे. आपण नियमित दही, इडली, डोसा यांचा समावेश आहारात केला पाहिजे. रोज अर्धी वाटी दही खाल्ल्याने पचनशक्ती वाढून पचनासंबंधित आजार बरे होतात.

तसेच दिवसभरात जास्तीत जास्त गरम पाणी पिण्याची सवय करून घेतली पाहिजे. पाण्यात लिंबाचे तुकडे घालून ठेवलेलं पाणी पिण्याने अशक्तपणा कमी होतो. या सर्वांबरोबर योग, पुरेशी झोप आणि आराम करणं हेही तितकंच महत्वाचं.

आता आपण रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे काही नैसर्गिक उपाय पाहू.

१) सोनं, चांदी आणि ताम्ब या त्रिधातूंनी युक्त पाणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी परिणामकारक ठरतं.

एवढंच नाही तर अगदी मानसिक आजारांपासून ते शारीरिक व्याधींपर्यंत हे पाणी खूप उपयुक्त ठरतं.

यासाठी एका तांब्याच्या टोपात सोन्याचा किंवा चांदीचा दागिना स्वच्छ धुऊन घालावा. हे पाणी उकळून समप्रमाणात दिवसातून तीन वेळा घ्यावं.

लहान मुलांसाठी हे पाण्याचं प्रमाण आपण अर्ध करू शकतो. यामुळे शरीरातील पेशी उत्तम कार्य करू लागतात.

२) रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवळा हा अत्यंत उपयुक्त आहे. वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांवर आवळा उपयुक्त आहे.

यात व्हीटॅमीन ‘सी’ सुद्धा असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यात त्याची मदत होते. त्यामुळे प्राचीन आयुर्वेदात आवळा हा अमृतासमान मानला गेला आहे.

आवळ्याचा रस, पूड, सुकलेले आवळे, च्यवनप्राश, मुरावळा हेही गुणकारी आहे. रोज सकाळी आवळ्याचा रस किंवा चूर्ण मधातून घेतल्याने आपल्या शरीरातील टॉक्सिन्स पूर्णपणे निघून जातात.

आपलं रक्त शुद्ध होतं. उत्साह आणि जोम प्राप्त होतो आणि त्याबरोबरच रोगमुक्ती होते.

३) सातही धातूंवर अश्वगंधा काम करते. त्यामुळे ताणतणाव आणि त्यापासून होणाऱ्या बऱ्याच आजारांपासून देखील अश्वगंधा आपलं रक्षण करते.

अश्वगंधा स्त्री आणि पुरुषांच्या अनेक आजारांवर देखील गुणकारी आहे. ती नर्व्हस सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम तसेच रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी आणि युरिनरी सिस्टीमवर देखील गुणकारी ठरते.

अश्वगंधाचं चूर्ण अर्धा ते एक चमचा नियमित दुधाबरोबर घेतलं पाहिजे. त्याने प्रतिकारकशक्ती वाढते आणि एजिंग प्रोसेस कमी होते. आणि अनेक आजारांपासून रक्षण होतं.

४) तसंच आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी तुळस अत्यंत परिणामकारक आहे.

तुळस हि ऑलराउंड इम्युनिटी बूस्टर आहे. अगदी सर्दी खोकल्यापासून ते मोठमोठया आजारांपर्यंत ते मानसिक आजारांवर सुद्धा तुळस उपयुक्त आहे.

तुळशीची पानं, तुळशीचा अर्क, तुळशीचा चहा यांचा नियमित वापर केला पाहिजे.

तर मग फक्त काळजी करत राहण्यापेक्षा असे आहार विहारातले नियम पाळून आपण आपले आरोग्य नक्कीच निरामय ठेऊ शकतो.

तेव्हा योग्य आहार घ्या, प्रदूषणापासून दूर रहा आणि नियमितपणे व्यायाम करा. आणि छोट्या मोठ्या आजारांना आपल्यापासून दूर ठेवा.

एका तांब्याच्या टोपात सोन्याचा किंवा चांदीचा दागिना स्वच्छ धुऊन घालावा. हे पाणी उकळून समप्रमाणात दिवसातून तीन वेळा घ्यावं.

वाचण्यासारखं आणखी काही….

आयुर्वेदाचार्य वैद्य खडीवाले यांनी सांगितलेली जीवनशैली…

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय