नशीबवान असणं आणि कम-नशिबी असणं हे आपण स्वतःच ठरवू शकतो ते कसे?

आपल्या आजुबाजुला दोन प्रकारचे लोक असतात.
पहीले असतात ‘नशीबवान’
हे नेहमी आनंदात असतात, भाग्य यांच्यावर प्रसन्न असतं, यांना जोडीदार सुंदर भेटतो, यांच्याकडे मस्त घर असतं, हे दिसायलाही रुबाबदार असतात,
लोकांच्या दृष्टीने हे लकी असतात, योग्य वेळी, योग्य ठिकाणी हे हजर असतात.
म्युचल फंड असो वा शेअर बाजार, प्रत्येक ठिकाणी नशीब यांना साथ देतं.
प्रमोशन यांना फास्ट मिळते, यांची मुले प्रचंड हुशार निपजतात.
लग्न असो वा मांडव, जिथे तिथे यांच्याभोवती लोकांचा गराडा असतो.
मस्त मस्त ठिकाणी ते फिरायला जातात.
यांनी घेऊन ठेवलेल्या प्रॉपर्ट्यांना सोन्याचे भाव येतात.
आठवयतं का असं कोणी परीचयाचं?
का बरं भाग्य यांच्यावर फिदा असते?
दुसरी कॅटॅगिरी …. ‘कमनशिबी!’
अपयशी, अपशकुनी आणि पनौती! अफलातुन कंबाईन्ड असतं हे पॅकेज!
सदा तोंडावर बारा वाजलेलं, चारचौघात तोंड पाडुन बसलेलं.
लक्ष्मी टिळा लावयला येते आणि हे तोंड धुवायला जातात.
आहेत का असे दुर्दैवी जीव बघण्यात?
नशीबवान माणसात असं काय असतं, जे त्यांना लकी बनवतं?
१) चान्स पे डान्स
नशीबवान लोकं संधी ओळखतात, हात धुवुन तिच्यामागे लागतात, आणि संधीचं सोनं करतात.
अपयशी लोकांना संकटं दिसतात, त्यांच्यामागे लपलेल्या संधी नाही, त्यामूळे ते अजुनच चिंताक्रांत होतात.
मनातला ताण शरीरात रुपांतर होतो, आणि शरीर अजुनच कडक होतं, बुद्धी मंद होते, अक्कल राजीनामा देते.
नशीबवान लोक शांत असतात, ते स्वतःला प्रसन्न आणि आनंदी ठेवतात.
नशीबवान लोकं अजिबात ताण तणाव घेत नाहीत, म्हणुन त्यांची नजर तेज असते, बुद्धी दिवसेंदिवस अजुनच तल्लख बनत जाते.
२) जरा हटके
रोजचा एकच रुटीन माणसाचं जीवन नीरस बनवतो, तेच ऑफीस, तीच ट्रॅफीक, तेच ते काम, आजुबाजुला तेच ते लोकं, तेच ते शेड्युल वर्षनुवर्ष जगल्यास, मेंदुची नवनिर्मीतीक्षमता संपावर जाते.
तेच ते कपडे, तीच ती गाडी, तेच ते घर, तीच ती रुम, तेच ते कंटाळवाणं नीरस जीवन!
रोज तेच किचन, तोच स्वयंपाक, तीच भाजी, आणि तीच धुसफुस!
टी.व्ही वर तेच ते साऊथचे पिक्चर!
तेच ते फेसबुक आणि तेच ते व्हॉट्सएप!
त्यात ना कसलं थ्रील, ना कसला उत्साह!
म्हणुन थोड्या थोड्या दिवसांनी, आयुष्यात जाणीवपुर्वक बदल घडवा.
साचेबद्ध जगणं सोडा, बंधनांच्या साखळ्या तोडा.
बाहेर पडा, गडकिल्ले भटका, रानोमाळ फिरा,
प्रेमात पडा.
डायर्या लिहा, कविता करा.
संगीत ऐका, गाणी पाठ करा.
चित्रे काढा, डान्स क्लास लावा.
छोटीशी बाग बनवा, त्यात छानछान फुलं फुलवा.
लायब्ररी लावा, नवनवीन पुस्तकं वाचा, काहीही करा.
काहीही करा, ज्याने आयुष्यातला तोच तो पणा नाहीसा होईल!
३) कसलीही परिस्थीती असो, आभार मानत रहा!
कल्पना करा,
तुम्ही बॅंकेत गेला आहात आणि दरोडीखोरांनी बॅंक लुटण्याच्या प्रयत्नात तुम्हाला गोळी मारली, ती तुमच्या हाताला लागुन हात जायबंदी झाला.
आता तुम्ही नशीबवान आहात की अनलकी!
हेही तुमच्या विचारांवर ठरतं.
नशीबवान माणसं म्हणतात, की माझं नशीब फारचं चांगलं होतो, गोळी डोक्यात मारल्यास मी मेलो असत, हातावर निभावलं! थॅंक यु देवा!
अपयशी माणसं मात्र हात गेला म्हणुन नशीबाला बोल लावतात.
येणारा जाणार्याला आपली रामकहाणी सांगुन बोअर करत राहतात.
आपलं सुख, समाधान मानण्यावर असतं.
एक रिसर्च सांगतो की ऑल्मपिक मध्ये ब्रोंझ मेडल जिंकणारे खुप आनंदी असतात.
‘इथपर्यंत पोहचलो म्हणुन’ सिल्वर मेडल मिळालेले मात्र मनातुन दुःखी असतात.
‘इथपर्यंत पोहचुनही हरलो म्हणुन’…… तुम्ही कुठे आहात?
४) आतला आवाज ऐका
नशीबवान लोकं आपल्या सहावं इंद्रियाचा वापर करतात.
अपयशी लोकांना स्वतःशी संवाद करता येत नाही, त्यामूळे त्यांचं सुप्त मन त्यांना मार्गदर्शन करत नाही.
ध्यान केल्याने सहावं इंद्रिय जागृत होतं!
सिग्नल ओळखा! शांत निसर्गरम्य ठिकाणी गेल्याने सहावं इंद्रिय कार्यान्वित होतं!
५) आयुष्याकडुन अपेक्षा ठेवा!
नशीबवान लोकं स्वतःच्या आयुष्याकडुन उच्च प्रतिच्या अपेक्षा बाळगतात, आणि मग त्यांना तेच मिळतं.
“मला माहीत आहे, माझं भविष्य उज्ज्वल आहे.”
“माझं सगळं छानचं होईल.”
अपयशी लोकं स्वतःला त्या योग्य मानतच नाहीत. मग अकार्यक्षमतेचा ठपका त्यांच्यावर बसला तर नवल ते काय?
“माझ्या नशीबात तर कष्टचं आहेत.”
“हे एवढं चांगलं सगळं मला कशाला मिळेल?”
शेवटी दरिद्री विचार करणारे दरिद्रीच राहतात.
मनाने श्रीमंत असलं की धनाने श्रीमंत व्हायला वेळ लागत नाही!
आपण सगळे नशीबवान कॅटॅगिरीमध्ये स्वतःच स्थान अढळ बनवुया, अशा हृदयपूर्वक प्रार्थनेसह.
वाचण्यासारखे आणखी काही…
इच्छाशक्तीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थीवर मात करण्यासाठी हे करा
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
Whatabdautiful. Positive thought
What a beautiful article! Really excellent!