चिरतरुण जपानी लोकांच्या आरोग्याचं रहस्य जाणून घ्या…

साधारणतः असं म्हंटल्या जातं कि तंत्रज्ञानाने आपलं आयुष्य सुखकर आणि सोपं बनवलं आहे तरी दुसरी बाजू पाहता त्यामुळे आपले सक्रिय राहणे कमी होत चालले आहे म्हणजेच आपण आळशी होत चाललो आहोत या टेक्नॉलॉजीच्या अतिवापराने…..

कारण जी कामं आधी आपण स्वतः करायचो ती जागा बरेच प्रमाणात मशीन आणि रिमोट किंवा कुठल्याही ऑटोमेशन ने घेतली आहे.

स्थूलपणा, डायबिटीस, हार्ट अटॅक, कोलेस्ट्रॉल, मायग्रेन, कॅन्सर यांसारखे आजार जगभरात पसरत चालले आहेत. पण जपानबद्दल हे ऐकून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही कि तंत्रज्ञान आणि नवनव्या संशोधनांमध्ये सर्वात अग्रेसर असूनही जपान जगातल्या सर्वात सुदृढ देशांच्या यादीत आपलं नाव टिकवून आहे.

जपानमध्ये लाईफ एक्सपेक्टन्सी रेट जगात सर्वात जास्त आहे. काही वर्षांपूर्वी मेलबर्न मधील युनिव्हर्सिटीने केलेल्या सर्व्हेमध्ये हे निदर्शनास आलं कि जपानमध्ये ५०००० पेक्षा जास्त लोक १०० वर्षांपेक्षा जास्त आयुष्य सहज जगतात.

स्थूलपणा बद्दल विचार केला तर जपानमधला ओबेसिटी रेट सर्वात कमी आहे. जपानी लोक स्थूल असल्याचं शक्यतोवर बघण्यात येत नाही. जपानमध्ये झोपणे, चालणे एवढंच नाही तर खाण्या पिण्यात सुद्धा तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते पण तरीही इथले लोक इतके हेल्थी असतात.

खाण्यापिण्या पासून डेली रुटीन आणि लाइफस्टाइल च्या बाबतीत बऱ्याच गोष्टी खरेतर जपान्यांकडून शिकण्यासारख्या आहेत. यांचे हे नियम आणि लाइफस्टाइल फॉलो केली तर दीर्घायु, नितळ त्वचा आणि सुदृढ शरीर आपणही नक्की कमावू शकतो.

जपानी लोकांच्या आरोग्याचे असे काही राज आता आपण बघू…

जपानी

१) चहाचे प्रकार- जपानी लोकांमध्ये चहा पिणं हा एक वेगळाच सोहळा असतो. चहा हे त्यांचं फेव्हरेट ड्रिंक आहे. पण तिथे चहा दूध आणि साखर टाकून प्यायलाच जात नाही.

इकडे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि वेगवेगळ्या प्रसंगांना वेगवेगळ्या पद्धतीने चहा घेतला जातो.

इथे १०० पेक्षा जास्त चहाचे प्रकार आहेत. आणि सर्वात जास्त इथे ग्रीन टी प्यायली जाते. वेगवेगळे आजार आणि अशक्तपणा मध्ये पण येथे चहाचा आरोग्यासाठी उपयोग केला जातो.

येथे २८ पेक्षा जास्त प्रकारची ग्रीन टी प्याली जाते. यात Sencha , Gyokuro , Matcha आणि Hoji -Cha सर्वात जास्त प्रसिद्ध आहे.

या चहाचे वेगवेगळे प्रकार हाडांपासून, केस, त्वचा, पाचनशक्ती या सर्वांसाठी गुणकारी असतात. तसेच अँटिऑक्सिडन्ड युक्त असल्याने हा चहा शरीराला डिटॉक्स करण्यास सुद्धा मदत करतो. त्याचमुळे थकवणाऱ्या कामांमध्ये सुद्धा हे लोक ऍक्टिव्ह राहू शकतात.

२) पायी चालणे – जपानमध्ये रोजच्या दिनक्रमात लोक पायी चालण्यालाप्राधान्य देतात. तंत्रज्ञानाचा इतका चमत्कारी विकास असलेल्या जापानमध्ये पायी चालणं हा तिथल्या लोकांच्या लाइफस्टाइलचा महत्त्वाचा भाग आहे हे ऐकून आश्चर्य वाटेल.

जपानमध्ये आज सुविधांची काहीही कमतरता नाही पण तरीही इथले लोक आपल्या खाजगी वाहातून प्रवास करण्यापेक्षा पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करण्याला प्राधान्य देतात.

कारण त्यामुळे ते आळस दूर ठेऊन स्वतःला नेहमी फिट ठेऊ शकतात. बस किंवा ट्रेन मध्ये बसे पर्यंत यांना भरपूर पायी चालावं लागतं. आणि हे चालणं त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरतं.

३) जपान्यांच्या आहार आणि आहार घेण्याच्या पद्धती – जापानी लोकांच्या आरोग्याचं रहस्य हे त्यांच्या खाण्या पिण्याचा सवयीत सुद्धा खूप दडलेलं आहे.

यांच्या जेवणात कॅलरी, फॅट आणि शुगर चे प्रमाण खूप कमी असते त्यामुळे यांचं वजन अति प्रमाणात वाढत नाही आणि डायबिटीस, कोलेस्ट्रॉल, स्थूलपणा अश्या बऱ्याच आजारांपासून हे कोसो दूर राहतात.

स्वतःला चिरतरुण ठेवणारे हे जपानी लोक आपल्या नित्त्याच्या आहारात काय खातात हे आता बघू..

अ. सीफूड आणि सीव्हीड, व्हेज असो कि नॉनव्हेज जापानी लोक समुद्रजन्य आहारच घेतात. समुद्रात मिळणारे झुडपं या त्यांच्या भाज्या सर्रास असतात.

याचबरोबर मांसाहार हा त्यांच्या आहाराचा मुख्य घटक असतो. समुद्री भाज्या जमिनीवर उगणाऱ्या भाज्यांपेक्षा १० पटीने ताकदवर असतात.

आणि मत्स्याहारात चिकन आणि मीट पेक्षा कित्येक पटींनी जास्त पोषक तत्व असतात. जगभरातल्या मत्स्याहाराचा १०% हिस्सा हा जपानमध्ये वापरला जातो. आणि जापानचे लोक वर्षभरात १ लाख टन समुद्रीभाज्यांचे सेवन करतात. फक्त १ कप समुद्री भाज्यांमध्ये ५ ते १० प्रकारचे प्रोटीन असतात.

तसेच आयोडीन आणि पोटॅशियमचे प्रमाण सुद्धा भरपूर असते. मासळी मध्ये ओमेगा ३ फॅटी ऍसिड, व्हिटॅमिन ‘डी’, व्हिटॅमिन ‘बी’, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, आयर्न आणि झिंक यासारखे पोषक तत्त्व मोठ्या प्रमाणात असतात. समुद्री भोजन करणाऱ्यांची त्वचा नेहमी जवान दिसते हे तर वेगळे सांगायलाच नको.

ब. जापनीज आहारात दूध आणि दुधाच्या पदार्थांचा वापर खूप कमी प्रमाणात केला जातो. येथे समुद्री भोजनाचे प्रमाण जास्त असल्याने.

हे लोक दुग्धजन्य पदार्थांचा वापर कमी करतात. मैदा आणि पिठापासून बनलेल्या पदार्थांचा वापर येथे कमी केला जातो. आणि जास्तीत जास्त वापर भाज्यांचा केला जातो.

यामुळे इथल्या लोकांना पोटाचे विकार खूप कमी प्रमाणात होतात. पोळी किंवा ब्रेडपेक्षा इथे तांदूळ जास्त खाल्ला जातो. इथल्या तांदळाच्या प्रजातीही आपल्याकडच्या तांदळांपेक्षा बऱ्याच प्रमाणात वेगळ्या आहेत. हे तांदूळ फॅटफ्री असतात हेही तितकंच महत्त्वाचं.

क. खाणं बनवण्याची आणि खाण्याची पद्धत हि सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. येथे तळलेले पदार्थ खूप कमी खाल्ले जातात.

येथे अन्न हे मुखतः वाफेवर शिजवलं जातं त्यामुळे पोषक तत्त्व खाण्यामध्ये पूर्णतः शोषले जातात. येथे ड्राय स्नॅक्स खूप कमी प्रमाणात खाल्ले जातात.

आणखी एक गम्मत म्हणजे हे लोक ज्या भांड्या मध्ये जेवण जेवतात त्याचा आकार कमी असण्यावर त्यांचा भर असतो. लहान मुलाला जेवण दिलं जात असल्यासारखं इथे छोट्या भांड्यात जेवणं, हेच योग्य मानलं जातं.

कारण इथे ओव्हर इटिंग ऍबनॉर्मल समजलं जातं. मोजकंच जेवण करणारी व्यक्ती नेहमी ऍक्टिव्ह असते, शरीराचे ब्लड प्रेशर नॉर्मल राहते तसेच हृदयाचे आजार सुद्धा याने दूर राहतात.

ड. स्वच्छता हि जपानी लोकांच्या आयुष्यातला एक महत्वाचा घटक आहे. साफसफाई ठेवल्याने आजार पसरत नाहीत. मानसिक संतुलन चांगले राहते ज्यामुळे विनाकारण होणाऱ्या आजारांपासून स्वतःला वाचवता येतं.

इथले लोक खानपान आणि लाइफस्टाइल आरोग्यपूर्ण असण्याच्या बाबतीत जसे जागरूक असतात तसेच ते रुटीन बेसिस वर हेल्थ चेकअप करत असतात. इथले लोक महिन्यात कमीतकमी एकदा डॉक्टरकडे जाऊन रुटीन चेकअप करतातच.

या आहेत जपान्यांच्या सवयी ज्या त्यांना आरोग्यपूर्ण ठेवतात. आणि जपानच्या प्रगती मागचं एक कारण म्हणजे तिथल्या लोकांचं आरोग्य हे सुद्धा आहे. या सवयी तशा पहिल्या तर बऱ्याचशा आपण पण लावून घेऊ शकतो. आणि आपले शरीरसुद्धा असे चिरतरुण नक्कीच ठेऊ शकतो.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “चिरतरुण जपानी लोकांच्या आरोग्याचं रहस्य जाणून घ्या…”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय