भीमा कोरेगाव युद्ध – दोनशे वर्षांपूर्वीचा इतिहास

Bhima-Koregaon

Bhima Koregaon

कालपासून महाराष्ट्र पेटला आहे, त्याला पार्श्वभूमी आहे दोनशे वर्षांपूर्वीच्या एका युद्धाची!! भूतकाळ लक्षात ठेऊन त्याचा संदर्भ ध्यानात घेऊन भविष्य उज्वल करण्याकडे ना आपल्या राज्यकर्त्यांचा कल ना समाजाचा. आज येथे आपण या दंगलीबद्दल जास्त काही न बोलता कोरेगाव भीमा येथे झालेल्या ब्रिटिश आणि पेशव्यांच्या नेतृत्वाखालील मराठेशाही यांच्यातील लढाईच्या रंजक इतिहासाबद्दल बोलू.

bhima-koregaon-battleकोरेगाव भिमाची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भिमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई १ जानेवारी इ.स. १८१८ रोजी इंग्रज ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व पेशवे मराठा साम्राज्य यांच्यात झाली होती. इ.स. १८०० च्या दशकांत मराठा साम्राज्य अनेक तुकड्यांत विभागलेले होते. त्यात पुण्याचे पेशवे, ग्वाल्हेर संस्थानाचे शिंदे, इंदूरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड आणि नागपूरचे भोसले असे विखुरलेले कमकुवत साम्राज्य होते. ब्रिटिश साम्राज्याने ग्वाल्हेर, इंदूर, बडोदा व नागपूर यांच्या प्रमुखांशी तह करून त्या त्या संस्थानांचा भाग आपल्या राज्याला जोडला होता.

१३ जून इ.स. १८१७ रोजी पेशवे आणि गायकवाड घराण्यात महसुलावरून वाद झाला त्यात बाजीराव पेशवे यांनी ब्रिटिशांची मध्यस्थी घेतली. व बडोदा संस्थानाचा मोठा भाग पेशवाईत समाविष्ट केला. परंतु यासाठी ब्रिटिशांची मध्यस्थी घेतल्यामुळे अप्रत्यक्षपणे तो भाग ब्रिटिशांनी आपल्या राज्यास जोडला. यामुळे मराठा साम्राज्य ब्रिटीश अधीनस्त झाले आणि पेशवे केवळ नामधारी उरले. अल्पावधीतच पेशव्यांनी ब्रिटिशांना नमवण्याच्या प्रयत्नात खडकीची लढाईत केली परंतु ब्रिटिशांनी तेथेही पेशव्याचा पराभव केला. ही लढाई ५ नोव्हेंबर इ.स. १८१७ रोजी झाली होती. त्यानंतर पेशव्यांनी तेथून साताऱ्याला पळ काढला आणि ब्रिटिशांनी पूर्णपणे पुण्यावर ताबा मिळवला. पुणे हे “चार्लस बार्टन बर”“कर्नल जनरल स्मिथ” याच्या नेतृत्वाखाली होते.

ब्रिटिश पेशव्यांचा पाठलाग करतच होते. दरम्यान कर्नल स्मिथ याला भिती वाटत होती की पेशवा तेथूनही निसटून कोकणात जातील व तेथे राज्य करतील, म्हणून त्याने कर्नल बर याला कोकणात आणखी कुमक पाठवण्यास सांगितली. आणि एक जास्तीची कुमक पुण्याजवळील शिरूर येथे ठेवण्यास सांगितली. दरम्यान पेशवे कर्नल स्मिथचा पाठलाग चुकवून निसटून जाण्यात यशस्वी झाले परंतु दक्षिणेकडून कर्नल “थेओफिलस प्रिझलर” सैन्यासह तयार होताच, ते पाहून पेशव्यांनी मार्ग बदलला आणि पूर्वेकडे चालत नाशिकच्या वायव्य भागातून पुढे सरकले आणि कर्नल स्मिथ त्यांच्यावर हल्ला करेल या भीतीने ते पुन्हा पुण्याकडे वळले. डिसेंबर इ.स. १८१७ च्या अखेरीस कर्नल बरला बातमी समजली की पेशवे पुण्यावर चालून येत आहेत तेव्हा त्याने शिरूर येथील सैन्याला मदतीसाठी तयार राहण्यास सांगितले ते सैन्य पुढे सरसावले आणि त्यांची लढाई कोरेगाव भिमा या गावात झाली.

ब्रिटिशांच्या बाजूने एकूण ८३४ सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन “फ्रान्सिस एफ. स्टाँटन” करीत होता तर पेशवाईंच्या साम्राज्याच्या बाजूने २८,००० सैनिक होते, ज्याचे नेतृत्व सेनापती “पेशवा बाजीराव दुसरा” करीत होता. इंग्रजांच्या सैनिकांत ‘बॉम्बे नेटिव लाइट इन्फेंट्री तुकडी‘चे ५०० महार सैनिक होते, काही युरोपियन व इतर काही सैनिक होते. पेशव्यांच्या सैनिकांत मराठा, अरब या सैनिकांचा समावेश होता. पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते व महार, मांग व इतर अस्पृश्यांना अत्यंत हीन वागणूक दिली जात असे, याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मासाठी ब्रिटिशांच्या बाजूने पेशव्यांविरूद्ध लढले आणि विजयी झाले.

आता या इतिहासाला कुठल्याही सामाजिक तराजूत न तोलता पुढे जायला आपला समाज आणि राजकीय व्यवस्था जोपर्यंत शिकणार नाही तोपर्यंत दंगलींमधून होणारे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, जीवित हानी हे सारे असेच चालू राहणार. वेगवेगळे मीडिया हाउसेस आपापला अजेन्डा चालवत वेगवेगळ्या समाजाला झुकते माप देऊन बातम्या बनवत राहणार.

bhima-koregaon-vijaystambh

भीमा कोरेगाव युद्धाच्या समरणार्थ उभारलेला विजयस्तंभ

कोरेगाव भिमाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी शूर महार सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी ७५ फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर २० शहिद व ३ जखमी महार सैनिकांची नावे कोरलेली असून स्तंभावर लिहिले आहे — ‘One of the Triumphs of the British Army of the Earth’. महार सैनिकांच्या सन्मानार्थ येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी १ जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरातून बौद्ध (पूर्वाश्रमीचे महार), दलित, शीख व इतर जातीचे लोकही लाखोंच्या संख्येने येत असतात. बुद्धमुर्ती व डॉ. आंबेडकरांची प्रतिमा समोर ठेवून बुद्धवंदना घेऊन शहिद सैनिकांच्या विजयस्तंभाला मानवंदना दिली जाते. आता या इतिहासाला कुठल्याही सामाजिक तराजूत न तोलता पुढे जायला आपला समाज आणि राजकीय व्यवस्था जोपर्यंत शिकणार नाही तोपर्यंत दंगलींमधून होणारे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, जीवित हानी हे सारे असेच चालू राहणार. वेगवेगळे मीडिया हाउसेस आपापला अजेन्डा चालवत वेगवेगळ्या समाजाला झुकते माप देऊन बातम्या बनवत राहणार.

थोडक्यात काय, ना ब्राम्हण जिंकले न मराठे जिंकले आणि ना दलित जिंकले, जिंकले ते फक्त इंग्रज!!


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

1 Response

  1. RAJU SAWANT says:

    THE BRST INFORMATION

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!