जगभरात ५% लोकांचे दोनही डोळे वेगवेगळ्या रंगांचे असण्याचे कारण काय?

शारीरिक वैशिष्ठ्ये

प्रत्येक मनुष्य प्राणी आपल्या शरीराची विशिष्ट ठेवण घेऊन जन्म घेतो. शरीराचे अवयव तेच, पण इतक्या अफाट जनसागरात एकसारखे दिसणारे लोक असतात का? निर्मात्याने प्रत्येक व्यक्तीला वेगळा चेहेरा आणि शरीराची ठेवण दिलेली आहे. बरेचदा लोक इतरांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी टेक्नॉलॉजी च्या मदतीने आपल्या शरीरातील जडण घडणीमध्ये आर्टिफिशिअल बदल करवून घेतात. हे बरेचदा फक्त दिसण्यासाठी किंवा काही हौस नाहीतर सोय म्हणून केले जाते.

पण काही लोकांमध्ये अशी काही शारीरिक वैशिष्ठ्ये लहानपणापासूनच असतात. खरंतर शास्त्रीय भाषेत त्याला म्युटेशन म्हणजेच विकार म्हणतात. खूप दूरचे दिसणे किंवा ऐकू येणे, दोन्ही डोळ्यांचा रंग वेगवेगळा असणे याचबरोबर लोखंडसारखी मजबूत हाडं किंवा काही लोकांमध्ये कुठलीही गोष्ट सहजासहजी पचवणे, इलेक्ट्रिसिटी करंट विनासायास पास होणे यासारख्या खूपशा विशेष क्षमता किंवा शारीरिक वैशिष्ठ्ये असतात. असे लोक जगभरात फक्त ५ % आढळतात. आणि जेनेटिक कारणांमुळे हि विशेष शारीरिक वैशिष्ठ्ये त्यांना जन्मतःच मिळाले असतात. आफ्रिकेध्ये राहणाऱ्या एका इसमाकडे अशी अद्भुत शक्ती आहे की तो एखाद्या उंटसारखं हवं तितकं पाणी पोटात साठवू शकतो आणि गरज पडली तर पुन्हा हे पाणी शरीरातून काढून ते तो पुन्हा वापरू शकतो. आता ही अद्भुत शक्ती नसून अशीच ५ टक्क्यांमध्ये आढळणारी विशेष ऍबिलिटी आहे. जगात काही असे पण लोक आहेत ज्यांच्या मध्ये कधीही आजारी न पडण्याची ऍबिलिटी आहे. अशी इम्युनिटी प्रयोगशाळेत तयार करता येईल का यासाठी शास्त्रज्ञ आशा लोकांवर संशोधन करत आहेत.

आता असेच काही आभावा ने आढळणारे बॉडी फिचर्स किंवा शारीरिक वैशिष्ठ्ये (म्युटेशन्स) काय आहेत ते पाहू…

शारीरिक वैशिष्ठ्ये

१) गोल्डन ब्लड – आतापर्यंत आपण जे रक्ताचे गट पाहिले ते आहेत A, B, O …. पण गोल्डन ब्लड हा एक आभावानेच आढळणारा ब्लड ग्रुप आहे. १९६१ साली या ब्लड ग्रुपचा शोध लागला. त्यावेळी शास्त्रज्ञांना प्रश्न पडला होता की हा रक्ताचा कुठला प्रकार असू शकतो? बऱ्याच अभ्यासांनंतर हे निदर्शनात आले की आशा रक्तात अँटीजन्स नसतात. म्हणजे हे रक्त निगेटिव्ह ही नसतं आणि पॉसिटीव्ह ही नसतं. आणि याचमुळे या प्रकारचे रक्त इतके रिअर आहे की जगभरात फक्त ४० लोकांमध्येच या गटाचे रक्त आहे. असं दुर्मिळ असल्यानेच या रक्तगटाचं नाव गोल्डन ब्लड ठेवलं गेलं. ज्या लोकांच्या शरीरात गोल्डन ब्लड असते ते कोणालाही रक्तदान करू शकतात पण स्वतः दुसरे कोणाचे रक्त घेऊ शकत नाहीत.

शारीरिक वैशिष्ठ्ये

२) खूप कमी झोप – रात्री झोप न लागणे किंवा अति झोप घेण्याची सवय असणं या गोष्टी सर्रास आढळतात. पण काही लोक असे असतात की त्यांना झोपण्याचीच जास्त गरज पडत नाही. यामध्ये काही फेमस पर्सनॅलिटीज सुद्धा आहेत निकोला टेस्ला, विन्स्टन चर्चिल. यांच्यामध्ये एक असा शारीरिक दोष होता ज्यामुळे ते जास्त वेळ झोपू शकत नव्हते. तरीही ते दुसऱ्या लोकांपेक्षा जास्त काम करू शकत होते. ज्या लोकांमध्ये अश्या म्युटेशन्स असतात ते खूप कमी वेळात आपली झोप पूर्ण करू शकतात. आणि झोपण्यात कमी वेळ घालवत असल्याने त्यांना कामाला जास्त वेळ मिळत मिळतो. म्हणजे ज्या वेळात लोक आराम करतात तेवढ्या वेळात यांची झोप झालेली असते. या प्रकारच्या प्रोब्लेमला DEC-2 म्युटेशन म्हणतात. आणि हे म्युटेशन ज्यांच्यात असतं त्यांना कमी वेळात जास्त काम करण्याचं कसब जन्मतःच अवगत असतं. हे लोक काही दिवस बिना झोपता सुद्धा राहू शकतात. आशा लोकांना  Familial Natural short sleepers असे म्हणतात. खरंतर आशा लोकांसाठी हे एक वरदानच आहे.

शारीरिक वैशिष्ठ्ये

Chimerism

३) वेगवेगळ्या रंगाचे डोळे – दोन्ही डोळ्यांमध्ये वेगवेगळे रंग असण्याच्या या शरीरीक प्रवृत्तीला चॅमेरिझम Chimerisom म्हणतात. या प्रकारचे डोळे जगभरात फक्त ५% लोकांमध्येच आढळून आले आहेत. दोन्ही डोळ्यांचा रंग वेगवेगळा असल्याने हे कुठल्या आजारासारखे वाटते पण हा काही आजार नाही. साधारणपणे कुठल्या व्यक्तीचा एक DNA असतो पण शास्त्रज्ञांनी जेव्हा या प्रकारच्या लोकांचा अभ्यास केला तेव्हा त्यांनी पाहिले की या प्रकारच्या व्यक्तींमध्ये दोन वेगवेगळे DNA असतात. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात दोन DNA असण्याची शक्यता तेव्हा असते जेव्हा एखादी महिला दोन वेगवेगळ्या पुरुषांबरोबर शरीरी सबंध ठेवते आणि होणाऱ्या मुलाची शारीरिक ठेवण दोन्ही पुरुषांच्या शुक्राणू पासून प्रभावी होतात.

Heart Diagram

४) शरीरात कोलेस्ट्रॉल न बनणे – पूर्ण जगभरात काही असे मोजकेच लोक आहेत ज्यांच्या शरीरात कोलेस्ट्रॉल बनतच नाहीत. या लोकांना पूर्ण आयुष्यात हृदयाचे आजार होत नाहीत. यांच्या शरीरात  PCSK 9  नावाचे जीन आढळत नाहीत. सामान्यतः PCSK 9 हे जीन सर्वांच्या शरीरात असतात. या जीनचे काम असते कॉलेस्ट्रोल, फॅटी ऍसिड आणि मेटाबॉलिजम मेंटेन करणे. साध्या भाषेत सांगायचे तर या PCSK 9 जीन मुळेच कॉलेस्ट्रोल शरीरात बनते. पण या काही मोजक्या लोकांच्या शरीरात  PCSK 9 हे जीन नसते त्यामुळे त्यांच्या शरीरात कोलेस्ट्रॉल निर्माण होत नसल्याने हृदयाच्या आजारांपासून हे लोक दूर असतात. बऱ्याच फर्मास्युटिकल कम्पन्या या जीनचे शरीरातील प्रमाण कमी करण्यासाठी औषधं बनवण्याचा प्रयत्न सुद्धा करत आहेत. म्हणजे हृदय रोगांचे प्रमाण आटोक्यात आणता येईल.

शारीरिक वैशिष्ठ्ये

५) मजबूत हाडं –  LRP 5  हा जीन हाडांची शक्ती कित्येक पटींनी वाढवतं. ज्या लोकांच्या शरीरात या प्रकारचे म्युटेशन असते त्यांची हाडं लोखंडासारखी मजबूत असतात. या जीनचा हाडांच्या बरोबरीने आपल्या त्वचेवरपण प्रभाव पडतो. त्यामुळे त्वचा चिरतरुण राहण्यास सुद्धा मदत होते. पण याचा एक दुष्परिणाम असा की हाडांमध्ये लवचिकता असण्याचे प्रमाण खूपच कमी असते.

मनुष्य प्राण्यांमध्ये विशेष एबिलिटी चे म्युटेशन्स असण्याची लिस्ट मोठी आहे. यामध्ये पाण्यात श्वास घेणे, वीज खाऊन जिवंत राहणे असे बरेच म्युटेशन्स यात येतात. आणि असेही म्हंटले जाते की हे म्युटेशन्स आपण आपल्या शरीरात डेव्हलप करू शकतो.

वाचण्यासारखे आणखी काही…

खगोल / अंतराळ
ललित
प्रॉपर्टी/मालमत्ता खरेदी

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!