फक्त संवादाचा सूर बदलून नवरा बायको चे नाते टवटवीत कसे ठेवता येईल?

जर तुमचे नवरा बायको चे रिलेशन दोन वर्षापुर्वीचे आहे, आणि तुमच्यामधले पुर्वीचे गाढ प्रेम कमी होऊन क्षुल्लक कारणांमुळे खटके उडत आहेत, तर आजचा लेख तुमच्यासाठी आहे.

ह्या जगात सगळ्यात जास्त जोक्स आणि कॉमेडी सिरीअल्स हे नवरा-बायकोच्या भांडणावर का बनवले जातात?

असे का होते, की काही दिवसांपुर्वी एकमेकांचे जीव की प्राण असणारे दोन प्रेमी जीव सुरुवातीच्या गोड गुलाबी वर्षांनंतर एकमेकांना असहनीय वाटु लागतात?

बायकांच्या मनात नेमकं काय चाललयं, हे माणसांना कधी समजेल का?

सुरुवातीला इंटीमेंट असलेलं प्रेम कालांतराने एर्रिटेटिंग का बरे होतं?

ह्या आणि अशा अनेक गहन प्रश्नांची उत्तरं ‘मेन्स आर फ्रॉम मार्स एंड वुमेन्स आर फ्रॉम व्हिनस’ नावाच्या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक जॉन ग्रे ह्यांनी आपल्या पुस्तकात मांडली. लेखिका शुभदा यांनी या पुस्तकाचा ‘तो आणि ती’ या नावाने मराठी अनुवाद केलेला आहे.

जॉन म्हणतात, की स्त्री आणि पुरुष दोघांची, जडणघडणच एकमेकांपासुन वेगळी आहे. त्यांची विचार करण्याची पद्धत आणि प्रतिसाद देण्याची वृत्ती वेगवेगळी आहे, ज्या जोडप्यांना आपल्या साथीदाराचं योग्य आकलन होईल, त्या दोघांमध्ये वादविवादां संपुन त्यांचं रुपांतर दाट स्नेह आणि मधुर संबंधामध्ये होईल.

जॉनने आपल्या पुस्तकात सुखी वैवाहीक जीवनाचे अनेक फॉर्मुले मांडले. त्यातले काही आज तुमच्याशी शेअर करत आहे.

पहीला गोल्डन रुल – पुरुषांसाठी

१) स्त्री जेव्हा पुरुषाला एखादा प्रॉब्लेम्स सांगते, तेव्हा तिला उत्तरं नको, आधार हवा असतो.

🛎संवाद १

ती – ऐक ना, आज ऑफीसला जायचं, मला जीवावर आलं आहे.

तो – मग नको जाऊस!

ती – असं कसं? महत्वाची कामं आहेत, जावं तर लागेलचं!

तो – मग जा! तु जेव्हा बघितलं तेव्हा, एवढी कंफ्युज का असतेस?

ती – तु चुप्प बस! माझं डोकं दुखतयं आता!

तो – काय किरकीर आहे यार!

इथे तिला ऑफीसला जायचं तर आहे पण फक्त व्यक्त व्हायचं आहे की आज ऑफीसला जाण्यासाठी तिला एक पुश हवा आहे, पण त्याला मात्र तिचं बोलणं गुंतागुंतीचं आणि निरर्थक वाटत आहे

मराठी माणुस कानडी माणसाला भेटला तर दोघांना एकमेंकाची भाषा समजणार नाही अगदी तसं काहीसं आहे हे!

आता वरचाच प्रसंग जरा वेगळ्या स्वरुपात पाहु!

🛎संवाद २

ती – ऐक ना, आज ऑफीसला जायचं, मला जीवावर आलं आहे.

तो – हो ना! आज किती उकडतयं! आज ऊन पण खुप आहे! तु ना, मस्त सुटी घे!

ती – असं कसं? महत्वाची कामं आहेत, जावं तर लागेलचं!

तो – खरचं तु आपल्या कामाशी किती कमीटेड आहेस ना!” “एक पण दिवस सुट्टी घेत नाहीस!

ती – (हसत) एवढं पण हरभर्‍याच्या झाडावर चढवु नको म्हणलं”, ”चल, उशीर होतोय, निघते मी ऑफीसला!

तो – लव्ह यु! बाय!

तेव्हा माणसांसाठी पहीला गोल्डन नियम हा आहे की जेव्हा तुमची बायको कसल्याही समस्या शेअर करते, तेव्हा तिला सल्ले देणं बंद करा, फक्त तिचं ऐकुन घ्या.

ती प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी सक्षम आहे, फक्त तुमच्याजवळ व्यक्त होणं, ही तिची मानसिक गरज आहे.

ह्या दृष्टीने विचार केल्यास तिचं बोलणं ‘भुणभुण आणि किरकीर’ वाटणार नाही, आणि एवढं कळालं तरी अनेक मोठी भांडणं टळतील.

दुसरा गोल्डन रुल – स्त्रियांसाठी

२) मागितल्याशिवाय दिले गेलेले सल्ले नवर्‍याला मुळीच आवडत नाहीत!

🛎प्रसंग

ती – तरी तुला म्हण्टलं होतं ना मी, एकदा फोन करुन नीट पत्ता विचारुन घे

तो – अरे, मला ही जागा माहीत आहे!” “आधी आलो आहे मी इथे!

ती – जर माहीत आहे तर कितीतरी वेळापासुन, तिथल्या तिथे गोल गोल का फिरतोय आपण?

तो – ते मी…

ती – अजुन एकदा फोन करुन विचार ना!

तो – तु प्लिज थोडावेळ आपलं तोंड बंद ठेवशील का?

आणि भांडण सुरु!……

पुरुषाने जर कधी सल्ला मागितलाच नाही आणि तरीही पत्नीकडून सातत्याने उपदेश आणि मार्गदर्शनाचे डोस त्याला न मागता फ्री मध्ये दिले जात असतील, तर त्याला ते अनावश्यक आणि अपमानास्पद वाटु लागतात.

मान्य आहे, ती त्याला त्याच्या भल्यासाठीच सल्ले देत आहे, त्याची मदतच करत आहे, सल्ले देऊन, मार्ग सुचवुन ती हे दाखवत आहे की मी तुझी काळजी करते, पण त्याचा अहंकार जागा होवुन तो तिच्याकडे दुर्लक्ष करु लागतो.

ती अजुनच सल्ले द्यायला लागते.

आणि त्याला वाटतं, “ही एवढं का शिकवते?” “मला काही अक्कल नाही का?”

तेव्हा स्त्रियांसाठी हा गोल्डन रुल आहे, की उठताबसता मोफत सल्लागार समितीचे अध्यक्षपद मिरवणं थांबवा, आणि जोपर्यंत नवर्‍याकडुन एखादा प्रश्न शेअर केला जात नाही तोपर्यंत स्वतःला संयमाने रोखुन धरा. आपल्या पार्टनरवर विश्वास दाखवा.

३) एखादा प्रॉब्लेम सतावत असेल तर स्त्रियांना मात्र तो सांगुन टाकल्याने हलकं वाटतं!

एखादा प्रॉब्लेम सतावत असेल तर पुरुषांना तो सोडवेपर्यंत एकटं आणि शांत रहायला आवडतं!

समस्यांना सामोरे जाताना स्त्री पुरुष दोघांचाही प्रतिसाद वेगवेगळा असतो.

स्वप्नाली आणि नीरज दोघेही जॉब करतात, दोघांचाही आजचा ऑफीसमधला दिवस कामाच्या तणावात गेलेला आहे.

तणावातुन हलकं आणि रिलॅक्स होण्याचं, त्याचं आवडतं साधन क्रिकेट बघणं हे आहे, मॅचच्या दिवशी चिप्सची पाकीटे आणि शीतपेयं घेऊन तो लवकर घरी येऊन टी. व्ही. पूढे बसतो.

जेव्हा कोहली पुढे सरसावत चौके छक्के लगावतो, तेव्हा नीरजची आनंदाची पातळी वाढु लागते, आणि तणाव एकदम नाहीसा होतो.

याच्या अगदी उलट तिचं आहे, तिला दिवसभराच्या घडामोडी त्याच्यासोबत शेअर करायच्या आहेत.

🛎प्रसंग

ती – आज ना आमच्या बॉसने अजुन एक प्रोजेक्ट माझ्यावरच सोपवलाय! अगोदरच एवढा वर्कलोड आहे ना!आमच्याकडे जे काम करतात, त्यांनाच अजुन काम लावतात.

तो – हुं

ती – आणि एवढं करुनही, ज्या बायका नुसतं पुढं पुढं करतात, शान मारतात, त्यांनाचं प्रमोशनं मिळतात

तो – आयला. विकेट पडली!

ती – मी काहीतरी बोलतेय, आणि तुझं लक्षचं नाहीये, मुर्ख आहे का मी?

आणि भांडण सुरु!…

दोघेही तणावात असताना असे प्रसंग टाळण्यासाठी काय करावं?

आपली पत्नी कसल्यातरी कारणामुळे टेंशनमध्ये आहे हे लक्षात येताच, पुरुषांनी थोडसं शांत राहुन तिचं लक्षपुर्वक ऐकुन घ्यावं.

आणि तो तणावात आहे, असं लक्षात आल्यावर बायकोनेही अप्रिय विषय काढु नये, वाटलचं तर एखाद्या मैत्रीणीला फोन करुन काही वेळ बोलुन मन हलकं करावं, त्याला थोडा एकांत द्यावा.

४) ऑर्डर सोडु नका, तक्रारींचा पाढा वाचु नका, विनंती करा!

🛎संवाद १

ती – दररोज मीच लेकरांना शाळेतुन घरी आणते, आज तर तुम्ही घरीच आहात ना! आज मी जाणार नाही, जा, आज तुम्ही घेऊन या!“

तो – रोज आणतेस मग आज पण तुच आण ना! मला थोडं काम आहे!

ती – सगळी कामं मी एकटीनचं करायचं गुत्तं घेतलयं का? तुमची काही जबाबदारी म्हणुन आहे का नाही?

आणि भांडण सुरु!……..

पुरुषांना आपल्यावर कोणी ऑर्डर सोडलेल्या आवडत नाहीत, त्यांचा आत्मसन्मान दुखावतो आणि मग ते स्वतःचा विरोध कृतीमधुन दाखवुन देतात. ज्यामुळे विसंवाद अजुनच वाढतो.

याउलट त्यांना जर गोड शब्दांमध्ये विनंती, आर्जव केली, तर ते कठिण काम करायलाही एका पायावर तयार होतात.

🛎संवाद २

ती – ऐका ना! आज मला ना, थोडसं काम आहे, तुम्ही मुलांना शाळेतुन आणु शकता का प्लिज?

तो – हो! तु निर्धास्त रहा, डार्लिंग! आज मी आणतो मुलांना शाळेतुन!

ती – थॅंक यु!

🛎संवाद ३

तो – किती दिवस झाले, तु मस्त पावभाजी बनवली नाहीस! आज बनव बरं!

ती – माझी तब्येत ठिक नाहीये! रोज वेगवेगळे आयटम्स बनवणं माझ्याच्याने होणार नाही!

ऑर्डर ऐकणं, ना माणसांना आवडतं, ना स्रियांना, एकमेकांवर अधिकार गाजवल्याने दुरावा वाढतच राहतो.

पुरुष जसे स्वतःची गरज असल्याचे पाहुन आनंदी होतात तशाच बायका स्वतःची स्तुती ऐकुन, खुश होतात, कौतुकाचे शब्द ऐकुन कितीही थकलेल्या असल्या तरी आपल्या माणसांसाठी, त्यांच्यावरच्या प्रेमासाठी, पुन्हा कंबर कसुन कामाला लागतात.

स्त्रियांना स्वतःला स्पेशल फिल करवुन घ्यायला आवडतं!

वरील प्रसंगात नवरा असं बोलला असता तर

🛎संवाद ४

तो – तुझ्या हातची पावभाजी खावीशी वाटतेय! बनवशील?


लेख लांबला, पण ह्या विषयावर अजुनही खुप काही सांगण्यासारखं आहे! त्याविषयी पुढच्या भागात लिहेन.

माझे लेख आवडत असल्यास लाईक, कमेंट शेअर करा.

मनःपुर्वक आभार, शुभरात्री!

वाचण्यासारखे आणखी काही…

प्रासंगिक
पालकत्व
प्रेरणादायी/MOTIVATIONAL

मानाचे Talks च्या वाचकांच्या प्रतिक्रिया:

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

3 thoughts on “फक्त संवादाचा सूर बदलून नवरा बायको चे नाते टवटवीत कसे ठेवता येईल?”

    • Manache Talks paratham tumche khup khup Dhnyavad asech lekh lihun samnya lokanchyaa jivanatle problem solve karnatyat apla lekh khup mahatpurn padato

      Reply
      • नमस्कार! मनाचेTalks मध्ये आपले मनस्वी स्वागत. हे फेसबुक पेज 𝑴𝒐𝒕𝒊𝒗𝒂𝒕𝒊𝒐𝒏 𝒇𝒐𝒓 𝑮𝒐𝒐𝒅 𝑳𝒊𝒇𝒆 ❤️ या 𝑷𝒂𝒔𝒔𝒊𝒐𝒏 साठी आहे.

        मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेले तीन डॉट्स वर दाबून ‘Add मनाचेTalks to Favourites’ यावर क्लिक करा…

        #मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇

        व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇

        https://chat.whatsapp.com/I6p7m8Cruee4otE6qRWJoE

        टेलिग्राम चॅनल👇

        https://t.me/manachetalksdotcom

        Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय