आंतराष्ट्रिय दर्जाचे मानक सोने भारताकडून विकसित- भारतीय निर्देशक द्रव्य

Gold

जगातील दुसरी चीननंतरची सर्वात मोठी सोन्याची बाजारपेठ असलेला भारतातील सोनार आजपर्यंत शुद्ध सोन्याच्या तपासणीसाठी स्विझर्लेंड आणि कॅनडा येथून आयात केलेल्या शुद्ध सोन्यास आधारभूत मानत असत. आता इंडीया मिंटकडून विकसित ‘९९९९'(९९.९९%) शुद्ध सोन्याच्या बारचा संदर्भ म्हणून आधार घेवून त्यावरून खरेदी केलेले सोने, नाणी, दागिने यातील सोन्याची शुद्धता निश्चित करता येवू शकेल. यातील सोन्याची शुद्धता उच्च दर्जाची असून त्यात दहा लाख भागात शंभर एवढी अत्यल्प अशुद्धता असेल. हे व्यापारी आणि ग्राहक या दोघांच्याही दृष्टीने फायद्याचे होईल.

Bartiya Nirdeshak Dravya BND -४२०१ असे या विकसित केलेल्या सोन्याचे वर्णन असून “भारतीय निर्देशक द्रव्य” असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. हे प्रमाणित सोने विकसित करण्यात इंडीया गव्हर्मेन्ट मिंट, भाभा अणुशक्ती केंद्र, कौंसिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च- नॅशनल फिजिकल लेबॉरेटरी आणि नॅशनल सेंटर फॉर कॉंपोझीशनल क्यारेक्टरायझेशन ऑफ मटेरियल यांचा महत्वाचा सहभाग होता. “Make in India” या पंतप्रधानांच्या महत्वांकांक्षी कार्यक्रमाचा हा एक भाग आहे. मानक सोने हे सोनारांकडे संदर्भ म्हणून हॉलमार्किंगसाठी त्याचप्रमाणे जमा सोने, दागिने यांची शुद्धता निश्चित करण्यासाठी, सुवर्ण संचय योजनेतील सोन्याचे प्रमाणिकीकरण करण्यासाठी उपयुक्त असते.

२० ग्रॅम्स वजनात उपलब्ध BND -४२०१ हा बार त्यांच्यासारख्या अन्य आयात बारच्या किंमतीच्या तुलनेत २५% स्वस्त असून या बारचे सहायाने केलेले यांत्रिक प्रमाणीकरण हे पारंपरिक पद्धतीच्या भट्टी प्रामाणिकरणापेक्षा कमी वेळखाऊ आणि पर्यावरणास पूरक असे आहे. ज्याचा उपयोग सोनार आणि हॉलमार्क सेंटर यापुढे करू शकतील. या विकसित सोन्याचे आंतरराष्ट्रीय मानकीकरण IS (इंटरनॅशनल सिस्टिम ऑफ युनिट) यांनी मान्य केल्याने या बारची निर्यात होवू शकते. अशीच इतर सुवर्ण आणि इतर मौल्यवान धातू यांची मानके भविष्यात निर्माण करण्याची इंडिया मिंट ली. यांची महत्वांकांक्षी योजना आहे .

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!