प्रामाणिकपणे १ करोड किमतीचं लॉटरीचं तिकिट खऱ्या हकदाराला देणारे के. सुधाकरन

के. सुधाकरन

राजा हरिश्चंद्र हे इतिहासात प्रसिद्ध झाले ते सत्याचं पालन करण्यासाठी. ऋषी विश्वामित्रांनी त्यांची परीक्षा घेताना त्यांच्याकडून सगळं हिरावून घेतलं असताना त्या विषम परिस्थितीत ही राजा हरिश्चंद्र ह्यांनी सत्याचा ध्यास सोडला नाही. आपल्या ह्याच आचरणासाठी राजा हरिश्चंद्र इतिहासात पावन झाले. २१ व शतक कलियुगाचं आहे. जो तो स्वतःचा फायदा प्रत्येक ठिकाणी बघतो. आता तर अशी परिस्थिती आहे की स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्याचं ओरबाडून घेऊन दुसऱ्याच्या टाळूवरील लोणी खाणारे अनेक जणं आपल्या आजूबाजूला असतात. पण अश्या २१ व्या शतकात ही सत्याचा ध्यास न सोडणारा राजा हरिश्चंद्र आहे. ज्याने स्वतःला मिळालेले १ कोटी रुपये पण प्रामाणिकपणे योग्य व्यक्तीला दिले. ही गोष्ट आहे के. सुधाकरन ह्यांची.

महिन्याला मोठ्या मुश्किलीने रुपये १०,००० कमावणारे के. सुधाकरन ह्याचं एक दुकान आहे. जिकडे ते ज्यूस, कोल्ड ड्रिंक आणि लॉटरी तिकीटाची विक्री करतात. उत्तर केरळ मधल्या कन्हानगड च्या बाजारात त्याचं हे दुकान आहे. आजूबाजूच्या गावातील अनेकजण त्यांच्या ह्या दुकानातून आपलं नशीब आजमावण्यासाठी लॉटरीचं तिकीट विकत घेत असतात. ओळख असल्याने रोज तिकीट विकत घेणारे फोन वरून आपली तिकिटं बाजूला काढून ठेवायला सांगतात व नंतर वेळ मिळाल्यावर त्यांच्याकडून ती पैसे देऊन स्वतःकडे घेतात. अश्याच एके दिवशी पी. अशोकन ह्यांनी के. सुधाकरन ह्यांना फोन करून १० लॉटरी ची तिकिटं आपल्यासाठी वेगळी ठेवायला सांगितली. त्या दिवशी दुपारपर्यंत अशोकन ह्यांनी तिकिटे आपल्या ताब्यात घेतली नव्हती पण लॉटरीचा निकाल मात्र जाहीर झाला. ह्यात सुधाकरन ह्यांच्याकडे विक्रीला असणाऱ्या एका तिकिटाने तब्बल १ कोटी रुपयांच बक्षीस जिंकल होतं.

कोणत्या तिकिटाने बक्षीस जिंकलं ह्याची पडताळणी केल्यावर सुधाकरन ह्यांना लक्षात आलं की त्यांनी जी १० तिकिटे अशोकन ह्यांच्यासाठी बाजूला ठेवली होती त्यातल्याच एका तिकिटाने ही रक्कम जिंकली आहे. ह्याची सुतराम कल्पना अशोकन ह्यांना नव्हती कारण प्रत्यक्षात हा व्यवहार झाला नव्हता. अशोकन नी त्या तिकिटांचे पैसे सुधाकरन ह्यांना दिले नव्हते आणि सुधाकरन ह्यांनी कोणत्या नंबर ची तिकिटे बाजूला काढली आहेत हे अशोकन ह्यांना माहित नव्हतं. ह्यामुळे कायद्याच्या दृष्ट्रीने त्या तिकिटाचे खरे हकदार सुधाकरन हेच होते. किंबहुना त्यांनी अशोकनना त्या बदल्यात दुसरं तिकीट दिलं असतं तरी अशोकन ह्यांना काही कळण्याची सुतराम शक्यता नव्हती. पण गरीब असूनही सत्यशील असणाऱ्या सुधाकरन ह्यांनी ही कल्पना आपल्या वडिलांना दिली. त्यांच्या वडिलांनी ताबडतोब अशोकन ह्यांना १ करोड रुपये जिंकल्याची बातमी देण्याची आज्ञा सुधाकरन ह्यांना केली. सुधाकरन ह्यांनी मागचा पुढचा विचार न करता अशोकन ह्यांना त्यांनी १ करोड रुपये जिंकल्याचं सांगितलं. ह्या क्षणापर्यंत सुद्धा अशोकन ह्यांनी त्या तिकिटाचे पैसे सुधाकरन ह्यांना दिले नव्हते. त्यामुळे अशोकन ह्यांना सुद्धा ह्या फोनचं खूप आश्चर्य वाटलं.

भाड्याने घेतलेलं एक दुकान ६ जणांची जबाबदारी त्यात स्वतःच्या अपंग मुलीची पूर्ण जबाबदारी असं असताना पण के. सुधाकरन ह्यांनी प्रामाणिकपणे तब्बल १ कोटी रुपयांचं तिकीट अशोकन ह्यांना दिलं. अठरा विश्वे दारिद्र्य आणि इतक्या प्रचंड अडचणी समोर आ वासून उभ्या असताना के. सुधाकरन ह्यांनी आपला सच्चेपणा सोडला नाही. कायद्याच्या दृष्टीने त्या तिकिटाचे मालक ते असताना फक्त आपला प्रामाणिकपणा जपण्यासाठी त्यांनी जे योग्य आहे तेच केलं. असं केल्यावर त्यांना अनेकांनी विचारलं की तुम्ही खरंच योग्य केलं का? ह्यावर त्याचं उत्तर होतं.

I know what I did was just what I should have. My parents taught me to be honest, to do what is right, to consider everyone, rich and poor as equal.

के. सुधाकरन ह्यांचा सच्चेपणा इकडेच थांबत नाही. एकदा ट्रेन मधून जाताना त्यांना सोन्याची चेन मिळाली. ती चेन त्यांनी पोलिसांकडे सुपूर्द केली. पोलिसांनी त्या चेनच्या योग्य मालकाला शोधून त्यांना ती परत केली होती. त्यांच्या ह्या प्रामाणिकपणा बद्दल विचारल्यावर के. सुधाकरन ह्यापुढे जाऊन लोकांना संदेश देतात,

Try to do as much good as possible and to refrain from doing bad- that way, you can lead a happy, meaningful life.

दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आणि समोर १ करोड रुपये असताना कधीही सत्याची साथ न सोडण्याचे आई वडिलांकडून झालेले संस्कार हेच आयुष्याचा मूलमंत्र मानून पैश्याला दूर सारणाऱ्या के सुधाकरन ह्यांचा आदर्श सगळ्यांनी आपल्या आयुष्यात नक्कीच ठेवायला हवा. गरिबीत असून सुद्धा आयुष्याच सार इतक्या सहजतेने सांगणारा २१ व्या शतकातील राजा हरिशचंद्र के. सुधाकरन ह्यांना माझा कुर्निसात.

वाचण्यासारखे आणखी काही…

खगोल / अंतराळ
ललित
आरोग्यरहस्य

मनाचेTalks च्या लेखांबद्दल वाचकांच्या प्रतिक्रिया….

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!