मावळच्या दर्‍याखोर्‍यात भटकण्याचा अनुभव! (किल्ले लोहगड आणि विसापूर भटकंती)

आज एक अनोखा अनुभव शेअर करणार आहे! मावळ प्रदेश – तिथे आहे किल्ले लोहगड आणि विसापूर चा किल्ला!

लोणावळ्यापासुन सात किलोमीटर अंतरावर मळवली नावाचे गाव आहे.

मळवली पासुन आठ किलोमीटर अंतरावर, जमिनीपासुन साडेतीन हजार फुट उंचीवर, लोहगड नावाचा किल्ला आहे.

त्याच्याच बाजुला विसापुरचा किल्ला आहे. साक्षात शिवप्रभुंच्या चरणस्पर्शाने पावन झालेला विसापुरचा किल्ला!

मिर्झा राजे जयसिंगाने स्वराज्यावर स्वारी केल्यावर, तहामध्ये जे तेवीस किल्ले मुघलांना दिले गेले होते, त्यातला एक आहे हा विसापुरचा किल्ला!

किल्ल्यावर जाताना, नजर जाईल तिथपर्यंत, आजुबाजुला पसरलेल्या विस्तीर्ण डोंगराच्या पर्वतरांगा! आणि मधोमध प्रचंड उंचीवर असलेले किल्ले लोहगड आणि विसापुर!

मळवली लोहगड हे सात किलोमीटर अंतर मी पायीपायी चालण्याचे ठरवले.

चालु लागलो तेव्हा, सुरुवातीला असं वाटलं, मी एकटाच आहे, “मै और मेरी तन्हाई!”

गड चढताना, रस्त्यामध्ये पावसाळ्यात ठिकठिकाणी धोधो भरुन वाहणारे धबधबे, त्यांच्या खुणा सोडुन गेलेले दिसत होते.

मध्येच कुठे एखादे साठलेले पाण्याचे तळे होते, कुठे नागमोडी वाटा, कुठे अवघड चढण, कुठे कड्याकपारी!

आतापर्यंत फक्त पुस्तकात वाचलेले दर्‍याखोर्‍या आणि कड्याकपारी असे शब्द पहील्यांदाच जागृतपणे अनुभवत होतो.

ऑफ सिझन असल्याने फार तुरळक गर्दी होती. इथे मुंबई-पुण्याचे पर्यटक पावसाळा अनुभवायला येतात.

निसर्गाचा उन-सावलीचा खेळ सुरु होता, डोंगरावर हिरवीगार झाडी, पठारावर ओसाड माळरान आणि दुरदुरपर्यंत नीरव शांतता!

रस्त्यामध्ये एका ठिकाणी मस्त तळे लागले, खुप वेळ चालत होतो, म्हणुन विश्रांतीसाठी तिथे ध्यान करायला बसलो, निसर्गाच्या सानिध्यात ध्यान केल्यास खुपच प्रसन्न वाटते.

अर्धा तास ध्यान केले, डोळे उघडले.

असंच समोरच्या अजस्त्र डोंगराकडे एकटक पाहत होतो, निरनिराळे विचार मनात येत होते, हा सह्याद्री किती घटनांचा साक्षीदार असेल ना? जवळ जवळ नऊशे वर्ष जुन्या लेण्या इथे कोरल्या आहेत, त्याच्या आधीच्या, नंतरच्या किती माणसांना ह्याने बघितले असेल? सांभाळले असेल?

काही तास चालल्यावर सबकॉन्शिअस माईंड प्रचंड एक्टीव्ह होते. शरीर श्रमले की, विचार करण्याची तर्कशक्ती नाहीशी होते, चालण्याची क्रिया शरीर यंत्रवत करु लागते.

अशा वेळी झालेला स्वसंवाद आनंददायी आणि आयुष्यभर लक्षात राहणारा असतो.

तर विचारात गढलेला असताना, अचानक असा भास झाला की समोरचा मावळचा पर्वत माझ्याशी बोलत आहे. माझ्या कानात काहीतरी सांगत आहे.

“ये रे बाळा, स्वागत आहे तुझे!”

मी चपापलो!

अरे! हे मनाचे खेळ आहेत, असा विचार करुन पुढे चालु लागलो,

पण जसजसा चालु लागलो, तसतसा अंदरमावळ आणि पवनमावळ पर्वत, दोघेही माझ्या नजरेसमोर, हळुहळु उलगडु लागले, आणि दोन बाहु मला प्रेमाने आपल्या कुशीत घेत आहेत, असे भास होवु लागले.

काय खरे आणि काय खोटे तेचं कळेना!

गिर्यारोहण करण्याचा हा तसा माझा पहीलाच अनुभव!

साडेतीन हजार फुट उंचीवर अवाढव्य पसरलेले हे पर्वतराज!

आता मी त्यांच्याशी मनातल्या मनात बोलु लागलो आणि तो पर्वत मला!

पुढचे काही तास आमचा हा संवाद चालु होता!

आणि जे चाललयं त्याच्यावर माझाचं विश्वास बसत नव्हता!

चिंचोळ्या वाटेनं चढाई करताना मी पडेल का अशी मला भिती वाटत होती, आणि

पर्वतराज मला कानामध्ये हळुच सांगत होता,

“मला घाबरु नको बाळा,”

“तु किती अजस्त्र आहेस? चढायला अवघड आहेस? आकाशाएवढा उंच आहेस तु? नाही का?” मी प्रश्न विचारला.

“शत्रुंपासुन आपल्या माणसांचा बचाव करण्यासाठी, मी हे रुप घेतलं आहे.” तो शांतपणे म्हणाला!

“पण जसा मी संरंक्षक आहे, तसा मी पोषकही आहे, बरं का!”

“माझ्यावर पडलेला पाण्याचा प्रत्येक थेंबन्थेंब ह्या जमिनीला सुपीक बनवतो, माझ्या अंगाखांद्यावर मिरवत असलेल्या धबधब्यांचं आकर्षण तर तुला माहीतच आहे!”

“माझा दगड टणक आहे, राकट, कणखर आहे, पण ह्याच दगडामुळे ह्या डोंगरावर कोरलेल्या लेण्या नऊशे वर्ष झाले तरीही टिकुन आहेत!”

“किल्ल्याचे दगड, पायर्‍या, बुरुज, बांधकाम, दरवाजे, देवळ्या ह्याच दगडाने घडवलेले आहेत!”

“प्रॉथर नावाच्या इंग्रजाने, मराठ्यांनी पुन्हा बंड करु नये म्हणुन तोफा डागुन, गडाचे दोन्ही दरवाजे उध्वस्त केले, पण माझे ते काही बिघडवु शकले नाहीत!”

“आजही माझ्यावर विसावलेले लाडके किल्ले, इथल्या वैभवाची, ऐतिहासिक वारशाची साक्ष देत, दिमाखात उभे आहेत की नाही?”

मी मनोमन त्या पर्वतराजीपुढे नतमस्तक झालो.

“तु बापासारखा आहेस!”

बाहेरुन कठिण, कणखर, टणक, रांगडा, शिस्तप्रिय, ज्याच्या डोळ्यात डोळे घालुन बोलता येत नाही असा!

“अगदी आकाशाएवढ्या उंचीचा!”

पण आतमधुन मात्र तु आईच्या ह्र्दयाचा आहेस!

“प्रेमळ, वात्सल्याने भरलेला, मायाळु!”

“तुझ्या अंगाखांद्यावर खेळणार्‍या तुझ्या लेकरांना खायला प्यायला देतोस, ह्याच राकट कणखर दगडांनी लेकरांना रिझवण्यासाठी, पाऊस पडला की, खळखळ धबधब्याने निसर्गरम्य, आणि मनोरंजक खेळ तयार करतोस!”

“तुच आमचा मायबाप आहेस!” “तुझा हात डोक्यावर असल्यास आणि पाठिशी तुझा आशिर्वाद असल्यास आम्हाला अजुन काय पाहीजे?”

संध्याकाळ झाली होती!

मनसोक्त भटकुनही समाधान झालेले नव्हते.

पाय निघतच नव्हता, पण निघणे भाग होते.

जड मनाने मी पर्वतराजाचा निरोप घेतला!

गडकिल्ले भटकताना तुम्हाला असेकाही विलक्षण अनुभव आले आहेत का? मला जाणुन घ्यायला आवडतील!

धन्यवाद!


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

वाचण्यासारखे आणखी काही…

खगोल / अंतराळ
प्रेरणादायी/MOTIVATIONAL

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय