मला कुठलंही काम द्या… आणि बघा मी करू शकतो कि नाही!!

महेंद्र प्रताप

वयाच्या ५ व्या वर्षी राजा महेंद्र प्रताप ह्याने एक धाडस केलं. मित्रांनी प्रतापची तू विद्युत उर्जा असलेला धातूचा खांब आपल्या हाताने पकडू शकत नाही असं म्हणत खिल्ली उडवली. प्रताप च्या लहान निरागस मनाला ह्या धाडसातला धोका लक्षात आला नाही. त्याने धाडस करून एका उच्च दाबाच्या धातूच्या रॉडला पकडलं. त्या वेळी अंगातून जाणाऱ्या उच्च दाबाच्या विजेच्या धक्याने ने राजा महेंद्र प्रताप चा जीव तर वाचला पण ह्या धाडसाने त्याला कायमच अधू बनवलं. त्याचे हात कोपऱ्यापासून तर पाय गुढग्यापासून कापावे लागले. तेव्हापासून ते वयाच्या १६ व्या वर्षीपर्यंत त्याचं घर हेच त्याचं विश्व झालं. ह्या १० वर्षात तो घराबाहेर पडू शकला नाही. एक चुकीचं धाडस त्याला आयुष्यभराची शिक्षा देऊन गेलं होतं. ही १० वर्ष त्याच्यासाठी प्रचंड कठीण काळ होता. त्याच्या शब्दात सांगायचं झालं तर

I would stay in my room. My father felt embarrassed to call me in front of guests. He considered me a burden and good for nothing.

महेंद्र प्रताप

आपण विचार करू शकत नाही अशी अवहेलना आपल्या स्वकीयांपासून प्रताप ला झेलावी लागत होती. दोन्ही हात आणि पाय विजेच्या धक्क्याने गमावलेल्या प्रताप ला चालणं ही अशक्य होतं. त्याला जमिनीवर लोळून पुढे जावं लागत होतं. ह्यामुळे त्याचे कोपरे आणि गुडघे सोलून निघत होते. पण अश्या परिस्थितीत त्याच्या ३ बहिणींनी त्याला आधार दिला. जिथे चालणंच मुश्कील होतं तिथे शिक्षण आणि शाळा तर लांबची गोष्ट होती. पण प्रताप लहानपणापासून हार मानणारा नव्हता. हळूहळू तो चालायला शिकला आणि आपल्या बहिणींची पुस्तकं वाचून त्याने अभ्यास सुरु केला. शाळेत आणि कॉलेज ला न जाता तो १० वी आणि १२ वीची परीक्षा देऊन उत्तीर्ण झाला. अतिशय मेहनतीने तो चालायला शिकला. आपल्या तोंडाने आणि कोपऱ्याचा वापर करत गोष्टी उचलायला शिकला. ज्या दिवशी जेव्हा १० वर्षानंतर घराबाहेर पडला तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. तब्बल १० वर्ष चार भिंती हेच त्याचं विश्व होतं. पण घराबाहेर पडताच त्याच्या विश्वाला मर्यादा नव्हत्या.

महेंद्र प्रताप

हात नसूनही हस्ताक्षर किती सुरेख आहे बघा!

प्रताप ने त्याच जिद्दीने वाणिज्य विषयात पदवी मिळवली. नंतर उस्मानिया विद्यापीठातून एम.बी.ए. ची पदवी मिळवली. त्या काळात एम.बी.ए. ची पदवी चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाल्यामुळे त्याला अनेक ठिकाणाहून नोकरीसाठी बोलावणं आलं. पण मुलाखती मध्ये त्याचं अपंगत्व बघून कोणत्याच कंपनीचा हा आपण दिलेलं काम करू शकेल ह्यावर विश्वात बसत नव्हता. त्यामुळे अपंग म्हणून त्याला नोकरीच्या अनेक संधी मधून डावलण्यात आलं. भारतात १९९५ साली अस्तित्वात असलेल्या कायद्याने अपंग व्यक्तीला नोकरीत समान संधी देण्याचं प्रावधान आहे. पण खऱ्या आयुष्यात मात्र फक्त कागदोपत्रीच कायदा अस्तित्वात असल्याचा अनुभव प्रताप ला आला. दिल्ली च्या एका बँकेत त्याला असिस्टंट मॅनेजर पदावर संधी मिळाली. त्या संधीचं सोनं करताना प्रताप ने अजून चांगल्या नोकरीसाठी आपली दावेदारी सुरु ठेवली. त्याच्या ह्या कष्टाचं फळ त्याला लवकरच मिळालं. भारत सरकारच्या नवरत्न कंपनीपेकी एक असणाऱ्या ओ.एन.जी.सी. अहमदाबाद ने त्याला फायनान्स आणि अकौंट ऑफिसर म्हणून नोकरी दिली.

महेंद्र प्रताप

अपंग म्हणून आपल्याला काहीतरी वेगळी वागणूक आणि सहानभूती दाखवणाऱ्या लोकांची चीड प्रतापला होती. म्हणून आपल्या कोपरा, गुडघा आणि तोंडाच्या साह्याने कॉम्प्यूटर चा वापर, लिखाण तसेच इतर सगळी काम करण्याचं तंत्र त्याने आत्मसात केलं. एकदा ऑफिसात फॉर्म भरायचा होता तेव्हा अनेकांनी त्याला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा त्यांना नम्रपणे नकार देताना त्याने आपल्या स्व हस्ताक्षरात तो फॉर्म भरून दिला होता. ओ.एन.जी.सी. च्या म्यानेजर नी प्रतापचं कौतुक करताना म्हंटल,

He never feels awkward, He is self-made and never fails to do work assigned to him. ONGC is very happy with his performance.

ओ.एन.जी.सी. ने दिलेल्या घरात आज प्रताप सगळी कामं स्वतः करतो. ज्यात अगदी कपडे धुण्यापासून नाश्ता बनवणं ही समाविष्ट आहे. आपल्या घरी येणाऱ्या सगळ्या मित्रांचं, पाहुण्यांचं स्वागत अगदी हसतमुख करतो. आज तो बस, ट्रेन, विमानातून सगळीकडे एका सामान्य माणसासारखा हिंडतो. आज त्याच्या अपंगत्वाला तो पुरून उरला आहे. पण राजा महेंद्र प्रताप चा हा प्रवास इतका सोप्पा नक्कीच नाही. प्रताप आज आत्मविश्वासाने सांगतो

Assign me any work; I am capable of doing all of them. I don’t need the sympathy of people. Treat me normally and I will love it. I wish that people and society treat disabled with respect, dignity and accept them.

आज वयाच्या ३३ व्व्या वर्षी एक सामान्य आयुष्य जगताना त्याने वर्ल्ड डिसेबल फोरममध्ये चीन आणि जपानमध्ये भारताचं नेतृत्व केलं आहे. आजही त्याची खंत मांडताना तो म्हणतो.

Special facilities are made to make the public places accessible to the handicapped. They don’t face any discrimination or obstacles. In our country, there is a dearth of an obstacle-free environment.

लहानपणी केलेल्या एका चुकीच्या धाडसामुळे राजा महेंद्र प्रताप ला आपले दोन्ही हात आणि पाय गमवावे लागले. पण आयुष्याच्या खेळात तो थांबला नाही. वयाच्या ५ व्या वर्षी सुद्धा मागचा पुढचा विचार न करता विजेचा खांब पकडणारा राजा महेंद्र प्रताप हरण्यातला नव्हता. ‘Yes, I Can’ हे तत्व त्याने कधीच सोडलं नाही. आपल्या दुर्दम्य इच्छाशक्ती च्या जोरावर आणि प्रचंड मेहनतीने आज त्याने स्वतःचं नाव निर्माण केलं. ज्या वडिलांना एके काळी तो ओझं वाटला त्याच वडिलांची छाती आज त्याच्याविषयी सांगताना अभिमानाने फुलून येते. आपल्याला आयुष्यात अनेक अडचणी येतात, अपयश येतात, अपघात होतात, आपली माणसं लांब होतात पण जेव्हा तुम्ही आपल्या लक्ष्याकडे आपली वाटचाल समर्थपणे सुरु ठेवतात तेव्हा अडथळ्यांच्या शृंखलासुद्धा आपोआप तुटून पडतात. अपंग असूनपण एक सामान्य आयुष्य जगणाऱ्या ह्या अवालियाला माझा कुर्निसात.

वाचण्यासारखे आणखी काही…

खगोल / अंतराळ
ललित
प्रेरणादायी/MOTIVATIONAL


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!