भारतीयांचं अवकाशात झेपावण्याचं स्वप्न – GSLV MkIII-D2/GSAT-29

GSAT-29

आज १४ नोव्हेंबर २०१८ ला इस्रो पुन्हा एकदा आकाशाकडे झेपावत आहे. ह्या वेळेस इस्रोचं सगळ्यात शक्तिशाली रॉकेट जी.एस.एल.व्ही. मार्क ३ आपल्यासोबत ३४२३ किलोग्राम वजनाचा जीसॅट २९ (GSAT-29) हा उपग्रह घेऊन त्याला जी.टी.ओ. म्हणजेच जिओस्टेशनरी ट्रान्स्फर ऑर्बीट मध्ये प्रक्षेपित करेल. त्या नंतर ह्या उपग्रहावर असलेल्या थ्रस्टर च्या साहाय्याने त्याला जिओस्टेशनरी ऑर्बीट मध्ये ठरलेल्या कक्षेत स्थापन केले जाईल. पुढील १० वर्ष हा उपग्रह भारताच्या कम्युनिकेशन मधला महत्वाचा वाटा उचलेल.

ह्या उपग्रहावर Ka आणि Ku बॅण्ड ट्रान्सपोंडर असून भारताच्या जम्मू काश्मीर आणि पूर्वेकडील राज्यांमधील लोकांचं कम्युनिकेशन ह्यामुळे सुलभ होणार आहे. ह्या सोबत इस्रो ह्या वेळेस पहिल्यांदा Q आणि V बॅण्ड सोबत ओप्टीकल कम्युनिकेशन तंत्रज्ञान वापरत आहे. भारताच्या कम्युनिकेशन मधील महत्वाचा दुवा ठरणारा हा उपग्रह ज्या रॉकेट मधून प्रक्षेपित केला जाणार आहे. ते रॉकेट येत्या काळात आपल्या सोबत भारताची चंद्रमोहीम घेऊन जाणार आहे.

जी.एस.एल.व्ही. मार्क ३ उड्डाण करतानाचं वजन जवळपास ६४० टन इतके प्रचंड असते. पहिल्या स्टेज मध्ये दोन एस २०० बुस्टर आपल्यासोबत प्रत्येकी २०७ टन वजनाचं इंधन १३० सेकंद प्रज्वलन करून तब्बल ५००० किलोन्यूटन बल निर्माण करतात. दुसऱ्या टप्प्यात एल ११० लिक्विड स्टेज विकास इंजिन प्रणाली वापरली जाते. (विकास इंजिन हे नाव भारतीय अवकाश संशोधनाचे जनक विक्रम अंबालाल साराभाई ह्यांच्या नावावरून दिलेलं आहे). ह्यामुळे ११० किलोन्युटन बल निर्माण होते. ११३ सेकंदानंतर हि स्टेज सुरु होऊन २०० सेकंद चालते. तिसरी व सगळ्यात महत्वाची स्टेज म्हणजे क्रायोजेनिक अप्पर स्टेज. ह्याच स्टेज साठी लागणारं तंत्रज्ञान आजवर भारताला देण्यात आलं नव्हतं. पण स्वतःच्या हिमतीवर भारतीय व स्पेशली इस्रो च्या अभियंत्यांनी हे इंजिन बनवून यशस्वी करून दाखवलं. ह्यात सी. ई. २० क्रायोजेनिक इंजिनांचा वापर केला जातो. २०० किलोन्युटन बल ह्या प्रक्रियेत निर्माण करून उपग्रहाला योग्य कक्षेत नेले जाते.

ह्या रॉकेट ची क्षमता ४००० किलोग्राम (४ टन) वजनाचे उपग्रह जी.टी.ओ. कक्षेत प्रक्षेपित करण्याची असून पुढील काही काळात एस.सी.ई. २०० ही इंजिन वापरून ती ६००० किलोग्राम (६ टन) पर्यंत नेली जाणार आहे. ह्यामुळे उपग्रह प्रक्षेपण करण्यासाठी भारताला आता कोणत्याही इतर देशाच्या रॉकेट वर अवलंबून राहवं लागणार नाही. हेच रॉकेट २०२२ पर्यंत भारतीयांना अवकाशात घेऊन जाणार आहे. उद्याच्या जी.एस.एल.व्ही. मार्क ३ उड्डाणासाठी इस्रो च्या वैज्ञानिक आणि संशोधक ह्यांना खूप शुभेच्छा.

वाचण्यासारखे आणखी काही…

खगोल / अंतराळ

सरकारी योजना


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!