माहित आहे का अवकाशातला हा देश ‘स्पेस किंगड्म ऑफ ऍसगार्डिया’?

Asgardia

इगर अशरबेली म्हणतात, “आम्ही अवकाशात नवीन कायदेशीर चौकट बनवू. आम्ही प्रचलित कायदे स्वीकारून हे करणार आहोत. नव्या जगाच्या अवकाश संशोधनाला योग्य असे हे कायदे असतील.” हे सगळे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ वाटत असले तरी या ऍसगार्डियाला ट्विटरवर जगभरातून २२ हजार फॉलोअर्स सुद्धा आहेत.

कित्येक वर्षांपूर्वी पृथ्वीवर लोकांना आपलं आणि आपल्याला नजरेत असलेल्या लोकांचंच आयुष्य ठाऊक असायचं. हि अमेरिका ती रशिया ते तिकडे आफ्रिका असा काही विचारच नव्हता.

पण आता दुसऱ्या देशात जाणं आणि त्याच्या चर्चा यात नवीन काही राहीलं नाही. पण काही वर्षांनी कोणी जर तुम्हाला म्हंटल कि मी ते जे अवकाशात आहे त्या ‘स्पेस किंगड्म ऑफ ऍसगार्डिया’ चा नागरिक आहे, तर!!

Asgardia

काही शास्त्रज्ञ किंवा शास्त्रज्ञ म्हणण्यापेक्षा व्यवसायिक यासाठी प्रयत्नशील असून अवकाशातील या नियोजित देशाचं नाव Asgardia असं आहे. म्हणजे खरं तर  हे व्यावसायिक मॉडेल आहे.

पण विशेष म्हणजे या देशात सहभागी होण्यासाठी ५० हजार लोकांनी आतापर्यंत अर्जही केले आहेत. या देशाचं राष्ट्रगीत आणि ध्वज ठरवण्यासाठी स्पर्धाही घेतली जात आहे. या देशाची वेबसाईट सुद्धा बनवली आहे…. Asgardia Space Kingdom.

या ‘देशा’चा पहिला उपग्रह पुढील वर्षी प्रक्षेपित केली जाणारा आहे, असं Asgardia च्या वेबसाईटवर म्हटलं आहे. पृथ्वीच्या कक्षेतील ही खरीखुरी नो मॅन्स लॅंड असेल, असंही वेबसाईटवर म्हटलं आहे. या देशाला संयुक्त राष्ट्र मंजुरी देतील अशीही त्यांना आशा आहे.

पण तज्ज्ञांना मात्र हे व्यवहार्य वाटत नाही. आंतरराष्ट्रीय कायद्यांनी बाह्य अवकाशावर देशांना सार्वभौमत्व सांगता येत नाही, असा मुद्दा काही तज्ज्ञ मांडतात.

युरोपियन स्पेस एजन्सीसाठी १५ वर्षं काम केलेले संशोधक लेना द विन म्हणतात, ”Asgardia चं नागरिकत्व मिळण्यापूर्वी लोकांच्या अर्जांची योग्य छाननी केली जाईल आणि नंतर त्यांना पासपोर्टही दिला जाईल.”

त्या म्हणाल्या, “ज्या ठिकाणी तुम्ही पाय ठेऊ शकत नाही अशा देशाचे तुम्ही नागरिक कसे होऊ शकता, असं वाटणं सहाजिक आहे. ही कल्पनाच मुळात डोक्यात बसणं कठीण आहे.”

“मी नेदरलॅंडची नागरिक आहे आणि आता पॅरिसमध्ये आहे. तुम्ही ज्या देशाचे नागरिक आहात, तिथं राहताच असं नाही,” असं त्या म्हणाल्या.

व्हिएना येथील Aerospace International Research Center ही खासगी कंपनी या प्रकल्पाचं संचलन करत आहे. या कंपनीची स्थापना रशियातील संशोधक आणि उद्योगपती डॉ. इगर अशरबेली यांनी केली आहे.

पॅरिसमध्ये त्यांनी या प्रकल्पाची घोषणा केली. पत्रकार मला मूर्ख रशियन शास्त्रज्ञ म्हणतील, असं ते म्हणाले.

पृथ्वीवरील देशांच्या कायद्यांपासून मुक्त असं हे ठिकाण असेल, असं ते म्हणाले.

या प्रकल्पामुळे पृथ्वीवरील सर्व लोकांसाठी व्यवसाय आणि विज्ञानात अनेक संधी निर्माण होतील, असा दावा या कंपनीनं केला आहे.

लंडन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस पॉलिसी अँड लॉ या संस्थेचे संचालक प्रा. सेड मॉस्टेशर या प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय कायद्यांनी कशी परवानगी मिळेल यावर शंका उपस्थित केली.

या प्रकल्पात सध्या फक्त एकाच व्यक्तीने पैसा पुरवला आहे. पण भविष्यात निधीसाठी Crowdfundingचा वापर होणार आहे. जाणकारांच्या मते हि विश्वासार्ह व्यावसायिक मॉडेल नाही.

इगर अशरबेली म्हणतात, “आम्ही अवकाशात नवीन कायदेशीर चौकट बनवू. आम्ही प्रचलित कायदे स्वीकारून हे करणार आहोत. नव्या जगाच्या अवकाश संशोधनाला योग्य असे हे कायदे असतील.” हे सगळे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ वाटत असले तरी या आसगार्डियाला ट्विटरवर जगभरातून २२ हजार फॉलोअर्स सुद्धा आहेत.

माहिती- विकिपीडिया

वाचण्यासारखे आणखी काही…

खगोल / अंतराळ
ललित
आरोग्यरहस्य

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!