ध्येय मोठे ठेवले तर यशही असाधारण मिळेल

“ज्या वस्तुंची इच्छा तुम्ही करता, तेव्हा तुम्ही प्रार्थना करा, त्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतीलच, असा विश्वास ठेवा, आणि त्या तुम्हाला प्राप्त होतीलच!”
बायबल
वॉल्ट डिस्नेनं आयुष्यभर डिस्नेलॅंडचं स्वप्न आपल्या उराशी जपलं होतं, जेव्हा त्याचा ड्रिमप्रोजेक्ट ‘डिस्नेवर्ल्ड’ पुर्ण होत आला होता, तो डोळे भरुन बघण्यासाठी, दुर्दैवाने वॉल्ट डिस्ने हजर नव्हता, १९६६ मध्ये वॉल्ट डिस्नेचं निधन झालं.
त्याच्या स्मरणार्थ पहिल्यावाहिल्या भव्य डिस्नेलॅंडच्या उद्घाटनाच्या दिवशी स्टेजवर फक्त एक रिकामी खुर्ची ठेवण्यात आली होती.
मग त्याचा उत्तराधिकारी मायकेल आईसनर स्टेजवर येऊन म्हणाला की, जाता जाता वॉल्ट डिस्नेने लोकांचं मनोरंजन करण्यासाठी, ही अनोखी भेट जगाला दिली आहे आणि तो अनंताच्या प्रवासाला गेला आहे.
ही होती फक्त एका माणसाच्या स्वप्नांची शक्ती, आपल्या कल्पनाशक्तीच्या बळावर त्याने सर्व जगाला आकर्षित करणारी कंपनी उभी केली.
हे तुम्हाला आम्हाला शक्य आहे का? ‘हो’ तर कसे?
- आपल्या प्रत्येकाच्या मेंदुमध्ये अठरा महापद्म पेशींची एक आदर्श कार्यक्षम यंत्रणा सुसज्ज असते.
- आपल्या मनाचा वापर करण्यासाठी आपल्याला कुठे जायचे आहे, काय साधायचे आहे, हे फक्त त्या यंत्रणेला सांगावे लागते.
- आतापर्यंत तुम्हाला जे जे काही मिळाले आहे, ते तुमच्या बुद्धीने तुम्हाला प्राप्त करुन दिले आहे.
१) मनःशक्तीचा उपयोग
- मनाचे दोन भाग असतात, सुप्त मन आणि जागृत मन!
- चेतन मन ठरवते, ‘काय हवे’? आणि अचेतन मन ठरवते ‘ते कसे मिळवावे’?
- उत्तम विचार उत्तम परिणामांना आकर्षित करतात. सामान्य विचार सामान्य परिणामांना आकर्षित करतात.
- तुम्ही ज्याची अपेक्षा करता, ते तुम्हाला मिळते. फक्त प्रश्न एवढाच आहे की, ‘तुम्हाला काय हवे?’ आणि ‘तुम्ही स्वतःकडून काय अपेक्षा करता?’
२) ध्येयांना सुस्पष्ट आकार द्या
- आपल्याला नेमके काय हवे आहे, ते नेहमी आपल्या जागृत मनाला सतत सांगत राहा.
- सुप्त मन आपल्या ध्येयाचे आपल्याला विस्मरण घडवु शकते.
- म्हणुन निश्चित केलेले ध्येय, स्पष्ट शब्दांत लिहुन सतत डोळ्यासमोर ठेवणे आवश्यक असते. सुप्त मनाला सतत संदेश दिला जातो.
- ध्येय लिहुन काढल्याने संपुर्ण मन ध्येयाप्रति वचनबद्ध होते.
- एखादे ध्येय लवकर पुर्ण होईल, एखादे ध्येय उशीरा! पण हवे ते मिळेलच!
कोंबडीच्या अंड्यातुन पिल्लु बाहेर यायला एकवीस दिवस लागतात, मानवी गर्भाला नऊ महिने आणि हत्तीच्या पिल्लाला जन्म घ्यायला तब्बल दोन वर्ष लागतात.
उद्दिष्ट्ये अशीच असतात, काही लवकर साध्य होतात, काही उशीरा!
रिचर्ड एटनबेरो ह्याने महात्मा गांधीच्या जीवनावर सिनेमा बनवण्याची कल्पना केली. त्याने उद्दिष्ट्य ठरवले होते, पण ब्रम्हांड तेव्हा तयार नव्ह्ते.
रिचर्डने हार मानली नाही, त्याने वीस वर्ष वाट बघितली, अखेर त्याला गांधीच्या भुमिकेसाठी ‘बेन किंग्जले’ सापडला. सर्व योग जुळुन आले. अप्रतिम सिनेमा तयार झाला.
एटनबेरोला जेव्हा गांधीची कल्पना सुचली तेव्हा बेन किंग्जले बालक होता.
मनासारखा गांधी मिळत नसल्यामुळे रीचर्ड वीस वर्ष थांबला!
अखेर त्याने पाहिलेले स्वप्न पुर्ण झाले, बेन किंग्जलेने मुर्तीमंत गांधी साकारले, जे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचले.
रिचर्डने ब्रम्हांडाला अवधी दिला, त्याबद्ल्यात ब्रम्हांडाने रिचर्डला जे जे हवे ते सर्व पुरवले, चित्रपटाला अनुरुप हिरो, पैसे, मार्केटिंग आणि वितरण!
पुन्हा एकदा स्वप्नांची शक्ती जगाने बघितली.
• ऍमेझॉनचे वैशिष्ट आहे, जगातली सर्वोत्कृष्ट सेवा देणारी ऑनलाईन सेलींग कंपनी बनण्याचे.
• एम. आर. एफ. टायरचा मालक पन्नास वर्षांपुर्वी मरिना बीच वर फुगे विकत होता, त्याने सर्वश्रेष्ठ टायर कंपनी बनवायचे ठरवले, आज एम. आर. एफ. टायर कुठे आहे? सांगायची गरज नाही. केवळ सकारात्मक विचारांच्या बळावर एक रस्त्यावरचा फुगेविक्रेता टायरच्या दुनियेचा आनभिषिक्त सम्राट बनला.
• सोळा वर्षांपुर्वी, म्हणजे २००२ मध्ये, राधाकिशन दमानी यांनी डिस्काउंट रिटेल सुपरमार्केटच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. आज डिमार्टची १६० आऊटलेट आहेत. ते दररोज काही करोडचा नफा कमवतात. तुमच्या आमच्यासारखा एक माणुस हे कसे साध्य करु शकला? कल्पनाशक्ती आणि बुद्धीच्या बळावरच ना?
• आयुष्यातलं सर्वात मोठ्ठं दुःख, म्हणजे आपल्या वडीलांच्या निधनाचा धक्का, हे दुःख पचवुनही, लगेच दुसऱ्या दिवशी, विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर क्रिकेटच्या पीचवर जबरद्स्त परफॉर्म करु शकले, कारण त्यांचे ध्येय त्यांना उर्जा देत होते! नाहीतर साधारण माणुस कधीच कोलमडला, कोसळला असता.
• ध्येयामध्ये असाधारण ताकत असते, आपल्याकडुन अशक्य गोष्टी पुर्ण करवुन घेण्याची सुद्धा!
जीवनाचे उद्दीष्ट्य माहित झाल्याने तुमचे जीवन जास्त अर्थपुर्ण होईल.
ज्याच्याकडे सुस्पष्ट उद्दीष्ट असते, त्याच्याकडे नकारात्मकतेसाठी वेळ नसतो.
जीवनात हवे ते प्राप्त करण्यासाठी तुम्हाला फक्त दोनच गोष्टींची आवश्यकता आहे.
१) एकदम स्पष्ट ध्येय ठेवा.
२) तुमचे मन ते पुर्ण करेल, त्यावर विश्वास ठेऊन, वाट पहा, ध्येयाच्या दिशेने निरंतर वाटचाल चालु ठेवा!
धन्यवाद आणि शुभेच्छा!
वाचण्यासारखे आणखी काही…
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा