E.L.S.S. इतर बचत येजना आणि आयकरातील तरतूद

या योजनांत गुंतवणूक करतांना निश्चितच धोका आहे परंतू यातून मिळणारा परतावा पाहिला असता थोडी जोखिम (Calculated Risk) पत्करली तर अल्पमुदतीत अधिक आकर्षक उतारा भांडवलवृधी होण्याची खात्री आहे

ELSS योजना कशी काम करते?

समभाग संलग्न बचत योजना (E.L.S.S.) या विशेष प्रकारच्या गुंतवणूक योजना असून त्या म्यूचुअल फंडाच्या पुरस्कार्त्यांकडून राबवण्यात येतात. या योजना निरंतर (Open Ended) किंवा बंदिस्त (Closed Ended) या दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहेत. यामधे एकरकमी किंवा जमेल तशी गुंतवणूक करता येते. त्याचप्रमाणे त्यात किमान ₹ ५००/-आणि कमाल कितीही रकमेची नियोजनपूर्वक गुंतवणूकही (SIP) करता येते. यामधे केलेल्या गुंतवणुकीवर ८०/C च्या विहित मर्यादेत सूट मिळते. लाभांश (Dividend) आणि मूल्यवृद्धी (Growth) हे दोन्ही पर्याय उपलब्ध असून या योजनेस लाभांश पुर्नगुंतवणूक (Dividend Reinvestment) हा पर्याय उपलब्ध नाही. या योजनेतीली ८०% रक्कम ते अनुकरण करीत असलेल्या इंडेक्स मधील वैविध्यपूर्ण (Diversified) अशा समभागात जसे S&P nifty किंवा S & P nifty 500 या इंडेक्समधील समभाग आणि २०% रक्कम डेट, मनी मार्केटमधे गुंतवली जाते. (अधिक तपशिलासाठी योजनेचे मागणीपत्र पहावे)

वेगवेगळ्या बचत येजना आणि त्यासाठी असलेली आयकरातील तरतूद..

सध्या मान्यताप्राप्त निवृत्तीयोजनेची वर्गणी (P.F., V.P.F.), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (N.S.C.), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (P.P.F.), विमा हप्ते, गृहकर्ज परतफेड, शैक्षणिक फी, राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (N.P.S.), करबचत मुदत ठेवी (Tax Saving FDR), सुकन्या समृद्धी योजना (S.S.Y.), वरीष्ठ नागरिक बचत योजना (S.C.S.S.) साधनातील गुंतवणुकीला दीड ते दोन लाख या मर्यादेत आयकर कलम ८०/सी खाली आयकर सवलत मिळते.

यातील काही योजनांचा परतावा (Return) मिळतो तो योजनेच्या प्रकारानूसार करमुक्त असतो किंवा नसतो. त्याचप्रमाणे यातील बहूतेक योजनांचा गुंतवणूककाळ हा किमान पाच वर्षे तरी असतोच. पी एफ, व्ही पी एफ यांना सध्या ८.६५ % करमुक्त उतारा मिळत असून त्यांचा गुंतवणूक कालावधी प्रदीर्घ आहे. पी. पी. एफ. व एन. एस. सी. मधून मिळणारा उतारा (Return) वार्षिक ७.६ % आहे यातील एन. एस. सी. मधील पहिल्या ४ वर्षात मिळालेले व्याज हे उत्पन्न करपात्र समजले जाते आणि त्याला पुनर्गुतवणूक केल्याचा फायदा मिळतो तर अंतिम वर्षात ती होत नसल्याने करपात्र उत्पन्नात मिळवले जाते. पी पी एफ मधील उत्पन्न करमुक्त आहे परंतू यातील रक्कम पाच वर्षाहून अधिक काळ अडकून राहते. टॅक्स सेविंग एफ. डी. मधून पाच वर्षात मिळणारा उतारा ७ ते ७.५% असून तो करपात्र आहे. एन. पी. एस. मधून मिळणारा उतारा हा योजनेनुसार आणि दीर्घ काळ असून त्याची निश्चित अशी हमी नसल्याने ज्यांची दीड लाख गुंतवणूक पूर्ण झाली आहे आणि ज्यांच्याकडे जास्तीचे पैसे आहेत अशा लोकांना पन्नास हजारांची अधिकची करसवलत घेण्यास योग्य आहे.

एस. एस. वाई. (सुकन्या समृद्धी) ही योजना मुलींनी स्वावलंबी व्हावे यासाठी असून त्यातील गुंतवणूक मुलीच्या वयानुसार १४ ते २१ वर्षांपर्यंत अडकून राहते आणि ती संबधित मुलीलाच मिळते. सध्या यातून मिळणारा परतावा ८.१ % असून तो करमुक्त आहे. तर एस. सी. एस. एस.ही योजना सेवानिवृत्त झालेल्या लोकांसाठी असून यातून दर तीमाहीस मिळणारे ८.३% व्याज करपात्र आहे. ही गुंतवणुक पाच वर्ष कालावधीसाठी आहे. सुकन्या समृद्धी योजनेची अधिक माहिती येथे वाचा.

या सर्व योजनांच्या तुलनेत ई. एल. एस. एस. ही कोणतीही निश्चित हमी न देणारी योजना आहे. भविष्यात भांडवल उभारणी करण्यासाठी जोखिम स्वीकारण्याची तयारी असलेल्या प्रत्येकास उपयुक्त आहे. या योजनेचा किमान गुंतवणूक कालावधी तीन वर्ष असून हा कालावधी संपला तरी गुंतवणूक काढून घेण्याचे बंधन नसते. यावर मिळणारा डिव्हिडन्ट त्याचप्रमाणे भांडवली नफा हा पूर्णपणे करमूक्त आहे. moneycontrol चे संकेतस्थळावर २६ ऑक्टोबर २०१७ रोजी उपलब्ध असलेल्या माहीती प्रमाणे मूल्यांकनानूसार (Top Ranking Scheme) एल. अॅड. टी. टॅक्स अँडव्हाटेंज ही योजना प्रथम स्थानावर असून त्याचा मागील वर्षाचा परतावा २५% तर मागील तीन वर्षाचा सरासरी परतावा १७.८% आहे. येथेच उपलब्ध योजनांचे कामगिरीनुसार (Top Performing Scheme) एस. बी. आई. टॅक्स अँडव्हांटेज स्कीम २ ,रिलायंस टॅक्स सेवर फंड , आई. सी. आई. सी. आई. प्रू राइट फंड, अॅक्सीस लॉन्ग टर्म ईक्विटी फंड, प्रिन्सिपल टॅक्स सेविंग यातून मिळालेला गेल्या पाच वर्षाचा सरासरी परतावा २२% हून आधिक आहे. आयकरामध्ये आपण आरोग्यविम्यावरसुद्धा आपत्कालीन सुरक्षेशिवाय सुद्धा सूट मिळवू शकतो त्याबद्दल आपण पुढे बोलू.

या योजनांत गुंतवणूक करतांना निश्चितच धोका आहे परंतू यातून मिळणारा परतावा पाहिला असता थोडी जोखिम (Calculated Risk) पत्करली तर अल्पमुदतीत अधिक आकर्षक उतारा भांडवलवृद्धी होण्याची खात्री आहे आणि त्यासाठी अनेक फंड हाउस कडील आकर्षक योजनांचे पर्याय उपलब्ध आहेत. याशिवाय थोडे थांबण्याची तयारी असेल तर नुकसान होण्याची अजिबात शक्यता नाही. हा दृष्टीकोन ठेवून अशा योजनांचा विचार धाडसी गुंतवणुकदारांनी करावा.

“भारतीय शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड: जाणून घ्या, गुंतवा आणि कमवा” या दीपक शिंदे लिखित पुस्तकात गुंतवणूक म्हणजे काय?, शेअर बाजाराची प्रार्थमिक माहिती तसेच म्युच्युअल फंड याबद्दलची मुद्देसूद माहिती अभ्यासासाठी उत्तम आहे.

(यात उल्लेख केलेल्या योजनांची शिफारीश केलेली नाही. आपण आपली गुंतवणूक योजना समजून घेवून स्वतःचे जोखमीवर करावी)


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय