फोटोंचा बदलता जमाना आणि बदलत्या जमान्यातले आपण!!

फोटो कसा आला ते कळायला काही मार्गच नसायचा. फोटो जेव्हा धुवून येतील तेव्हा कळायचं आपण नक्की काय बंदिस्त केल. त्यात कोणाचं डोक कापलं की कोणाचा हात!

लहानपणी आपल्या आठवणी कुठेतरी सांभाळून ठेवणे हे दुय्य्म असायचं. कोणताही क्षण मनसोक्त जगून त्याची मज्जा घेऊन मग कधीतरी आठवण झाली तर त्या जपवून ठेवाव्या अस वाटायचं.

एखाद भावंड, कुटुंब, किंवा मित्र – मैत्रिणींचं गेट टू गेदर असून दे अथवा मे महिन्याची किंवा दिवाळीची सुट्टी असू दे. सगळ्यात महत्वाचं काही असेल तर ते क्षण अनुभवणं.

कधी एकदा सगळ्यांना भेटून त्या क्षणांचा आस्वाद घेतो अस व्हायचं. फोटो काढणं किंवा त्या क्षणांना बंदिस्त करणं हे नंतर व्हायचं. ह्याला कारणं ही बरीच होती.

मला आठवते त्याकाळी आपल्याकडे कॅमेरा असणं हेच मुळी मोठी गोष्ट होती. माझ्या बाबांकडे त्याकाळी लाल रंगाचा कोनिका चा कॅमेरा होता.

आताच्या जमान्याप्रमाणे त्याचे पिक्सल वगरे माहित नाही. पण नक्कीच कमी असतील. त्याकाळी १२०० रुपयाचा असलेला कॅमेरासुद्धा खूप काही होता.

तो हातात येणं म्हणजे आपण ट्रेनिंग करून ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासारख होत. त्यात सगळ्यात मोठी अडचण म्हणजे योग्य तो क्षण टिपण्याची.

हाताशी असणारे फक्त ३२ ते ३६ फोटो कसे वापरायचे ह्याचाच जास्त उपापोह व्हायचा. पहिले १५ तर पटकन जायचे. पण नंतरचे काढताना दहा वेळा विचार करावा लागायचा.

अनेक सूचनांनंतर मग मोजून मोजून आठवणी बंदिस्त केल्या जायच्या. कारण नंतर एखादी आठवण बंदिस्त करायला फोटो बाकी ठेवण्यासाठी हा आटापिटा.

त्याहीपेक्षा सगळ्यात मोठ आव्हान असायचं ते म्हणजे बंदिस्त केलेले क्षण नक्की बंदिस्त झाले कि नाही ह्याचं! कारण ते कळायला काहीच मार्ग नसायचा. फोटो जेव्हा धुवून येतील तेव्हा कळायचं आपण नक्की काय बंदिस्त केल. त्यात कोणाचं डोक कापलं की कोणाचा हात!

रोल फिरला नाही किंवा चुकून उघडा झाला तर सगळचं गेलं. ह्यामुळे फोटो काढणं ही कला तर होतीच त्यापेक्षा ते मोठ टेन्शनच काम होत.

ह्यामुळेच की काय मी आणि इतर अनेक त्याच्या वाटेला जायला थोड बिचकून असायचो.

फोटो कसे येतात तोवर खूप उत्सुकता असायची. कित्येकदा पूर्ण रोल संपायचा नाही. मग उरलेले फोटो दुसरीकडे वापरून तो पूर्ण रोल धुवायला नाही जायचा तोवर मनात घालमेल चालूच असायची.

सगळ्यात आतुरतेचा क्षण म्हणजे जेव्हा फोटो घरी आणले जात. तेव्हा अधाशासारखे ते कधी एकदा बघतो अस व्हायचं. त्यातले काही चांगले आणि उत्तम आले असतील तर दुग्धशर्करा योग.

कधी एकदा अल्बम मध्ये टाकून अनेकदा त्याची पारायण करतो अस व्हायचं. अश्या आठवणींचे अल्बम घरात आजही जपून ठेवलेले आहेत. आजही बघताना ते सगळे क्षण पुन्हा जगतो.

काळ बदलला कॅमेरा आणि डी.एस.एल.आर चा जमाना जाऊन आता त्याची जागा मोबाईल ने घेतली. मोबाईल मध्ये आता अनेक मेगा पिक्सल आणि मल्टीपल कॅमेरे आले.

फोटो काढणं आता खूप सोप्प झाल. मोबाईलच्या वाढत्या मेमरी क्षमतेने हजारो फोटो सांभाळून ठेवण्याची क्षमता मोबाईलला दिली. मग काय हवं होत. सगळेच फोटोग्राफर झाले. मग हवा तो क्षण बंदिस्त करण्याची अहमिका लागली. सेल्फी ने तर कहर केला.

मग आपण क्षण बंदिस्त करण्याच्या मागेच लागलो. ह्या सगळ्यात काय सुटून जाते आहे हे कळून पण आपल्याला वळत नाही अशी आपली अवस्था झाली आहे.

सगळच बंदिस्त करणाच्या नादात आपण ते अनुभवण विसरलो आहेत. आज मित्र- मैत्रिणी, कुटुंब भेटले कि सगळ्यात आधी फोटो काढण्याची स्पर्धा लागते.

नवीन मित्र मैत्रिनींना भेटताना पण लोक नाव पण न विचारता आधी सेल्फी घेतात. कोणीतरी नवीन आज आपल्याला भेटायला आला/आली किंवा कोणीतरी जुना मित्र/मैत्रीण आज आपल्याला भेटला/भेटली.

तर ते क्षण आपण अनुभवतच नाहीत. एकतर फोटो काढतो किंवा गॉसिप सुरु होत. आपल्या लोकांच्या मनात काय आहे? हे जाणून घ्यायचा किती जण मनापासून प्रयत्न करतात?

नक्कीच ते क्षण वेगळे आणि बंदिस्त करावेसे असतात ह्यात वाद नाही. पण आपण ते जगलोच नाही तर ते लक्षात तरी कसे राहणार? त्या मेमरी, सेल्फी सारख्या शॉर्ट जगणाऱ्या असतील.

नक्कीच ते क्षण वेगळे आणि बंदिस्त करावेसे असतात ह्यात वाद नाही. पण आपण ते जगलोच नाही तर ते लक्षात तरी कसे राहणार? त्या मेमरी, सेल्फी सारख्या शॉर्ट जगणाऱ्या असतील.

दुसरी सेल्फी आली कि पहिलीला डिलीट केली तस नाही का? कारण ते चेहरे जरी आपल्या मोबाईल मध्ये फोटो म्हणून बंदिस्त झाले तरी त्या भावना कधीच आपल्या पर्यंत अथवा समोरच्याचा मनापर्यंत पोहचल्या नाहीत. फोटोतली खरी मज्जा कुठे आहे माहित आहे का?

जेव्हा आपल्या जवळच्या कोणत्याही आपल्या माणसासोबत एक कप चहा/कॉफी घेतानाचा फोटो जेव्हा आपण त्या क्षणी एकमेकांशी काय बोललो हे आपल्याला आठवेल तेव्हा.

आजकाल आपण बोलतच नाही. आपल्याला घाई असते ती लोकांना दाखवण्याची.

फोटोतली मज्जा अनुभवायची असेल तर फोटो साठी आधी आठवणी तयार करायला आपल्याला शिकायला हवं. फोटो तेव्हाच मज्जा देतील जेव्हा ते बघताना आपल्याला ते क्षण जाणवतील.

ते क्षण आपण निर्माण केले तर मग एक फोटो सुद्धा आयुष्यभर पुरतो. नाही का? बघा आपल्या जुन्या अल्बम मधील ते ३६ फोटो. कदाचित एखाद्यात डोकं नसेल, हात नसेल किंवा चुकीच्या वेळी बंदिस्त झाले असतील पण ते बघताना तुमच्या तोंडावर हसू आणि मनात आठवणी नक्कीच येणार.

काही तर इतके बोलके कि बघताना डोळ्यात पाणी पण आणतील. पुढल्या वेळेस फोटो काढण्याआधी आठवणी तयार करण्यास विसरू नका. मग फोटोतली मज्जा काही वेगळीच जाणवेल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय