BSE मुंबई शेअर बाजार चे App.

BSE

मुंबई शेअर बाजार (BSE) हा आशियातील सर्वात जुना आणि जगात सर्वाधिक कंपन्यांचे व्यवहार होत असलेला शेअर बाजार असून बाजारातील घडामोडी गुंतवणूकदारांना समजाव्यात म्हणून BSE India या नावाचे ऍप गुगल स्टोरवर उपलब्ध आहे. हे अँप डाउनलोड करून क्लीक केले की होम पेज उघडण्यापूर्वी शेअरबाजाराची इमारत व ‘Experiance the new’ ही अँपची कॅचलाईन येते आणि होमपेज उघडते. होमापेजवर डिफॉल्ट ऑप्शन म्हणून विविध इंडेक्स, सेन्सेक्स, कमोडिटी, वॉचलिस्ट, पोर्टफोलिओ दिसतील परंतू ते आपल्या मर्जीप्रमाणे तयार करता येतील त्यांचा क्रम बदलता येईल.

याचे होमपेज चित्रात दाखवल्याप्रमाणे असून डाव्या बाजूस असलेल्या तीन आडव्या रेषा या मेन्यू दाखवत असून त्यातून अँप मध्ये प्रवेश करता येईल. या शेजारी BSE चा लोगो असून त्याशेजारी माईकचे चित्र आहे तो गुगलचा व्हाईस सर्च असून त्याद्वारे अँपमध्ये हाताने टाइप करण्याऐवजी आवाजाचा वापर करून टाइप करता येईल. शेजारी सर्चसाठी दुर्बिणीचे चित्र दिले असून त्यामुळे शेअर, डिरिव्हेटिव, म्युच्युअल फंड/ ई टी एफ, डिबेंचर आणि इतर गोष्टी यांचे भाव पहाता येतील. या बाजूला असलेले वर्तुळाकार बाण आपणास पहिल्या जागी म्हणजे आपण जेथून सुरुवात केली तेथे नेतील. या शेजारी असलेल्या तीन टिम्ब क्लिक केल्यास एडिट वॉचलिस्ट/पोर्टफोलिओ, एडिट होमापेज, री ऑर्डर टॅब, सेटिंग, अबाउट अस, हेल्प हे पर्याय दिसतील. यातील हेल्पला क्लिक केले असता होमापेज एडिट कसे करता येईल ते समजते. आपल्या गरजेनुसार ते करता येईल.

मेन्यूला क्लिक केले असता, होम, इक्विटी, इंडीसेस, सेन्सेक्स, एस. एम .इ. , डिरिव्हेटिव, करन्सी, कमोडिटी, इंटरेस्ट रेट डिरिव्हेटिव, इ. टी. एफ, कॉर्पोरेट, मार्केट स्टेटेस्टीक, मार्केट टर्नओव्हर, आय पी ओ/ ओ एफ सी, लिस्टिंग, नोटिसेस, वॉचलिस्ट, पोर्टफोलिओ हे पर्याय दिसतील. यामुळे आपल्याला खालील अनेक प्रकारची माहिती मिळते.

ज्यांचे भाव वाढले / कमी झाले असे समभाग, ज्यांची उलाढाल जास्त झाली असे समभाग, त्याचा आधीचा बंद भाव, उलाढाल, 52 आठवड्यात उच्च आणि नीच किमतीचे समभाग यांचे भाव दिसतील. याचबरोबर,

  1. विविध निर्देशांकांचे भाव, त्याचा बंद भावाशी संबध आणि टक्केवारीतील बदल समजेल.
  2. यातून विविध सेन्सेक्स, त्यात समाविष्ट समभाग, त्याचा बंद भाव, त्यातील भावातील फरक, टक्केवारीत झालेला बदल, खरेदी / विक्री किंमत निर्देशांकाशी असलेला संबध समजेल. याशिवाय निर्देशांकांचा आढावा व आलेख दिसेल.
  3. ज्या कंपन्या छोट्या आहेत त्यासाठी BSE ने एक वेगळी खरेदी विक्री व्यवस्था सुरू केली असून त्यांना बाजारातून भांडवल उभारणी करता येईल याची स्वतंत्र व्यवस्था केली असून त्यांचे भाव, झालेले सौदे, मागील भाव, त्यातील रुपयात पडलेला आणि टक्केवारीत पडलेला फरक आणि खरेदी विक्री संख्या दिसेल.
  4. डिरिव्हेटिव कराराचे / करन्सीचे / कमोडिटीचे/इंटरेस्ट रेट डिरिव्हेटिवचे /ई टी एफ या सर्वांचे भाव, उलाढाल, मागील किंमत, त्यात रुपयात आणि टक्केवारीत पडलेला फरक, खरेदी विक्रीची संख्या दिसेल.
  5. विविध कंपन्यांच्या कॉर्पोरेट बेनिफिट दाखवणाऱ्या सूचनांची माहिती मिळेल.
  6. बाजारातील विविध आकडेमोड/ उलाढाल, विविध कंपन्या आणि संबंधितांच्या सूचना पाहता येतील.
  7. आपण तयार केलेली वॉचलिस्ट आणि पोर्टफोलिओ या संबंधीची सर्व माहिती मिळेल.

नाविन्यपूर्ण अनुभव असे देणारे हे अँप असून मार्केट व्यवहाराशी संबंधित सर्वांनी ते आपल्याकडे ठेवणे जरुरीचे आहे. 
या अँपची माहिती होण्याच्या दृष्टीने हा लेख लिहिला असून, मी हे अँप डाउनलोड करून वापरत आहे व ते उपयुक्त आहे असे माझे मत आहे. अँप निर्माण करणाऱ्या कोणाशीही माझा कोणत्याही प्रकारे व्यावसायिक संबध नाही.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!