आपण गूगल, जीमेल वापरताना किंमत मोजत नाही तर गूगल पैसे कसं कमावतं?

अमरनाथ यात्रेतील लंगरमधील मोफत अन्नाशिवाय या जगात कुठेही काहीही मोफत मिळत नाही. “देअर इज नो फ्री मील्स”, “देअर इज नो सच थिंग, ऍज फ्री लंच”, अश्या तर म्हणी आहे पाश्चिमात्य जगात.
याचा अर्थ कोणाला मोफत किंवा छुप्या स्वार्थाशिवाय काहीही मिळत नाही. मग गूगल आपल्याला ‘फ्री’ मध्ये इतकं सारं कसं काय देतं?
साहजिकच आहे गुगल किंवा कोणालाही आपली गुणवत्ता टिकवण्यासाठी, सगळे इन्फ्रास्टक्चर, एम्प्लॉयी आणि सर्व खर्च यासाठी निधी हा उभा करावाच लागतो.
गुगल आपल्याला ‘फ्री’ मध्ये इतकं सारं कसं काय देतं? किंवा का देतं? असे प्रश्न साहजिकच अनेकांना पडतात. अर्थात ते पडायलाच हवेत. आज ‘माय’ सोडल्यास कोणीही फ्रीमध्ये काहीही देत नाही.
मग ही गूगलगाय मोफत गूगल दूध कशी देत असावी? मग गूगल पैसा कसं कमावतं? हे प्रश्न अनेकांच्या मनात असतात.
1) गुगल ही पाश्चिमात्य कंपनी. त्यामुळे ‘फ्री मील्स’ देण्याचा संबंधच नाही. गूगल हवं तेव्हा हवं तितकं त्याच्या ‘सर्च इंजिन’द्वारे कुठे कुठे फिरवून आणतं, हवी ती माहिती देतं.
2) गूगल च्या ‘जीमेल (Gmail)’ वरून वैयक्तिक तसेच व्यावहारिक मेल संवाद सुरू असतात. मग ही सर्व ‘सेवा’ गूगल कशी ‘फ्री’ मध्ये त्याच्या ‘ग्राहकांना’ देत असेल? आणि का देत असेल?
3) कोणताही मोबाईल विकत घ्या त्यात गूगल क्रोम डाउनलोड केल्याशिवायही गूगल सर्च इंजिन त्यामध्ये (inbuilt) असतं. गूगल ऍप स्टोअर्समधून हवं ते ऍप डाउनलोड करता येतं. त्यातून ‘कनझ्यूमर’ हवी ती ‘सेवा’ घेऊ शकतो. ही सेवा ग्राहकाला खरंच ‘फ्री’ मिळते का?
4) जानेवरी २०१६ मध्ये ओरॅकल आणि गूगलच्या कायदेशीर वादात, खटल्यावेळी ओरॅकल च्या वकिलाने सांगितलं होतं की गूगलने २००८ मध्ये ३१ बिलिअन अमेरिकन डॉलर्स इतका महसूल त्याच्या इंटरनेट सेवांमधून कमावला.
याशिवाय २२ बिलिअन डॉलर्स त्याने अँड्रॉउडमधून कमावले. मग इतकी सारी माया या गूगलमायने कशी कमावली? गूगल म्हणजे ‘फ्री’ मध्ये सेवा देणारा ‘दयावान’ असताना त्याने इतकी माया कुठून कमावली? दया कुछ तो गडबड है!
5) गूगलने ओरॅकलवर हा दावा केला आहे की त्याने अँड्रॉइड संबंधित नियमांची पायमल्ली केली. या दाव्याविरुद्ध गूगलकडून मोबदला मिळावा म्हणून ओरॅकलने गूगलने कमावलेला फायदा, महसूल जाहीर केला.
इथे लक्षात घेण्यासारखा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, गूगलने स्वतः हे आकडे जाहीर केलेले नाहीत. ओरॅकलने गूगलने जाहीर केलेल्या कागदपत्रांवरून या महसुलाचा अंदाज लावला आहे.
6) इथे गुगल पेचात पडले कारण जर हा कमावलेला प्रचंड फायदा मान्य केला तर ओरॅकलची बाजू मजबूत होईल आणि अमान्य केलं तर इन्व्हेस्टटर्सना चुकीचा संदेश जाईल.
इन्व्हेस्टटर्सना आपली गुंतवणूक बुडेल अशी भीती वाटून ते गुंतवणूक काढून घेतील, यामुळे गूगलने एका हुशार राजकारण्याप्रमाणे ‘सुरक्षित’ मार्ग अवलंबला; तो म्हणजे, “झाकली मूठ सव्वालाखाची.” काहीच उघड केलं नाही.
पण “कोंबडा आरवला नाही तर सूर्य उगवायचा राहत नाही!” अश्या गोष्टी लपत नाहीत.
गूगलवर जाहिरात दिसणं हा एक स्वतंत्र विषय आहे, यांत ‘की वर्ड्स (Keywords)’ महत्त्वाचे असतात. योग्य की वर्ड्सनुसार, योग्य ‘ग्राहकांना’ म्हणजे जी व्यक्ती गूगल सेवांना ‘फ्री’समजे, ती मुळात ग्राहक आहे आणि ग्राहकाला काहीही कधीही ‘फ्री’ मध्ये दिलं जात नाही.
ही आहे गूगलकडे असलेली सोन्याची कोंबडी! गूगलच्या इंजिनने जगभर ‘सैर’ करणारे, सर्च करणारे लोक हे गूगलचे मुळात ग्राहक आहेत.
शिवाय गूगलवर जाहिराती देणारे उत्पादनकार हे सुद्धा गूगलचे ग्राहक आहेत. या दोघांची एका माध्यमावर गूगल सांगड घालतं, त्यांची भेट करवून देतं आणि यातून स्वतः प्रचंड महसूल कमावतं.
गूगलगाय अशी संपत्ती कमावतं म्हणून फ्रीमध्ये दूध देतं. पण दुभत्या गायीच्या लाथाही सहन कराव्या लागतात.
सौजन्य : www.arthasakshar.com
वाचण्यासारखे आणखी काही….
फेसबुककडून नोकरीसाठी रिजेक्ट झालेल्या ब्रायनने बनवले व्हाट्स ऍप..
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
👍