माहित आहे का, हिग्स बोसॉनच्या शोधात भारताचे योगदान!!

Higgs Boson

आपल्या भारतीयांना हे माहित नसेल की पूर्ण विश्वाच्या निर्मितीच्या मागे असणाऱ्या कणाच्या शोधामागे एका भारतीय  शास्त्रज्ञाचे खूप मोठे योगदान आहे. सत्येंद्रनाथ बोस ह्यांनी प्रथम मांडलेल्या कल्पनेवर पुढील संशोधन झाल आहे.

“हिग्स बोसोन” किंवा दैव कण हे नाव आपल्या कानावर अनेकवेळा पडलेल असेल. पण हिग्स बोसॉन (Higgs Boson) म्हणजे नक्की काय? किंवा त्याबद्दल इतकी चर्चा का चालू आहे? ह्याला दैव कण अस का म्हणतात? ह्या पासून सामान्य माणूस खूप लांब आहे. हिग्स बोसॉन म्हणजे ढोबळमानाने अस म्हणू कि जगात असलेल्या वस्तुमानाच गुपित किंवा त्याच्या मुळाशी जो कण आहे तो म्हणजे हिग्स बोसॉन.
१९२० च्या दशकात भारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस आणि अल्बर्ट आईनस्टाइन ह्यांनी बोस-आईनस्टाइन सिद्धांत मांडला. बोस ह्यांनी आईनस्टाइन ला लिहिलेल्या पत्रातून ह्या संबंधी आपलं मत व्यक्त केल होत. पुढे १९६० च्या दशकात पिटर हिग्स आणी त्यांच्या सहकाऱ्यांनी ह्या कणा संबंधी आपली कल्पना मांडली. गेली पन्नास वर्षे हुलकावणी देणारा हिग्स बोसॉन म्हणजेच गॉड पार्टिकल हा मूलभूत कण अखेर सापडला असल्याचा दावा ‘सर्न’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वैज्ञानिकांनी ४ जुलै २०१२ ला केला. विश्वाच्या निर्मितीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारा हा कण सापडल्याने आता विश्वरचनाशास्त्र व भौतिकशास्त्र यांच्या संकल्पनांची फेरमांडणी होते आहे. एकविसाव्या शतकातील हा अत्यंत महत्त्वाचा शोध असून त्याची तुलना इलेक्ट्रॉनच्या शोधाशी करण्यात येत आहे. ‘सर्न’ (युरोपियन सेंटर फॉर न्यूक्लियर रीसर्च) या वैज्ञानिक संघटनेतर्फे विश्वनिर्मितीचे रहस्य उलगडण्यासाठी अणू आघातकाचे म्हणजे अणू एकमेकांवर वेगात आदळविण्याचा महत्वाकांक्षी प्रयोग केला गेला आहे.

Satyendranath Bose

भारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस

हिग्स बोसॉन समजून घ्यायला आपल्याला थोड विश्व समजून घ्यावं लागेल. विश्व कसं बनल आहे. त्याचे काही नियम आहेत. विश्वाच्या रचनेच एक मॉडेल आपण बनवलं तर ते ज्या रचनेतून बनेल ते म्हणजे कणांच भौतिकशास्त्र (पार्टिकल फिजिक्स). तर ह्या कणांच्या भौतिकशास्त्राची रचना आपल्याला सांगते कि हे विश्व १२ कणांच बनलेलं आहे. ६ क्वार्क्स ६ लेप्टोन. क्वार्क्स कुटुंबात प्रोटॉन आणि न्युट्रॉन येतात तर लेप्टोन कुटुंबात इलेक्ट्रोन आणि न्युट्रीनो हे कण येतात. ह्या मॉडेल मध्ये ह्या १२ कणांसोबत ४ बल हि येतात ज्यात गुरुत्वाकर्षण आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक बल आहेत. तर हि बल भौतिकशास्त्रांच्या नियमाप्रमाणे ह्या १२ कणांसोबत असतात. म्हणजे ह्या बलांना ह्या कणांसोबत नेणारा एक कण असला पाहिजे. तो कण म्हणजेच बोसॉन. म्हणजे जर का बोसॉन कणांना बाजूला काढल तर ह्या १२ कणांना वस्तुमान उरणार नाही. पण हा बोसॉन कण रबरबॅंड सारखा ह्या १२ कणांना चिकटलेला असतो. त्यामुळे त्याचं अस्तित्व शोधण्यासाठी गेली ५० वर्ष संशोधक प्रयत्न करत होते. संशोधकांनी असा विचार केला कि जर कणांना वस्तुमान नसेल तर ते कोणत्यातरी फिल्ड मधून प्रवास करत असताना वस्तुमान घेत असणार. हे फिल्ड म्हणजेच हिग्स फिल्ड. हे हिग्स फिल्ड संपूर्ण विश्वात व्यापलेले आहेत. ह्या हिग्स फिल्ड चा ही कण असणार जो कि विश्वातील सगळ्याच कणांना वस्तुमान देतो. हाच तो हिग्स बोसॉन अथवा ज्याला दैव कण अस म्हणतात.

दैव कण म्हणजे त्यात देव असतो असं नाही. खरे तर हे नाव देण्यामागचं खर कारण वेगळच आहे. नोबेल पुरस्कार मिळवणारे लिओन लेंडरमॅन ह्यांनी पहिल्यांदा ह्या कणांना दैव कण अस म्हंटल. ह्या मागे त्यांना सूचित करायचं होत की कण शोधण प्रचंड कठीण काम होत. जवळपास ५० वर्षांचं संशोधन आणि मल्टी बिलियन अमेरिकन डॉलर खर्चून उभारलेला एक्सलेटर ह्यासाठी लागला. ह्या कणांना शोधण्यासाठी खूपच प्रयत्न करावे लागले. त्यासाठी त्यांनी ह्याला दैव कण अस म्हंटल. हिग्स बोसॉन हे नाव प्रचलित न होता मिडियानी त्याच दैव कण हेच नाव प्रसिद्ध केल. ह्या सगळ्यामुळे हिग्स बोसॉन च्या भोवती देवाच वलय झाल.

वर सांगितल्याप्रमाणे हिग्ज बोसॉन हा कण विश्वनिर्मितीच्या वेळी म्हणजे १३.७ अब्ज वर्षांपूर्वी झालेल्या महाविस्फोटात तयार झाला व एका अदृश्य प्रभाव क्षेत्रात त्याचे अस्तित्व आहे. जेव्हा इतर काही कण हिग्ज बोसॉनच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांची गती कमी होते व नंतर त्यांना वस्तुमान प्राप्त होते, असा हा सिद्धान्त आहे. प्रकाशाचे कण मात्र तो रोखू शकत नाही. सर्नच्या वेबसाइटवर गॉड् पार्टिकलचे (दैवी कणांचे) पुरावे देणारी ध्वनिचित्रफीत पाहता येते.

आपल्या भारतीयांना हे माहित नसेल की पूर्ण विश्वाच्या निर्मितीच्या मागे असणाऱ्या कणाच्या शोधामागे एका भारतीय शास्त्रज्ञाचे खूप मोठे योगदान आहे. सत्येंद्रनाथ बोस ह्यांनी प्रथम मांडलेल्या कल्पनेवर पुढील संशोधन झाल आहे. म्हणून ह्या कणाला त्याचं नाव म्हणजे बोस ह्या आडनावावरून बोसॉन अस नाव देण्यात आल आहे. पुढल्या वेळी आपण जेव्हा ह्याबद्दल काही वाचू, ऐकू किंवा बघू त्या वेळेस त्या महान भारतीय संशोधकाची आठवण काढण्यास विसरू नका.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

1 Response

  1. Vandana says:

    Ho hemazya mulane mala 6mahinya purvi sarva sangitle aahe yatun pudhe manav kasa nirman zala asava he hi samjavle..yatil utkranti cha niyam hi samjavla..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!