आपल्या सौरमालेत प्रवेश करणारा पहिला एलिअन ऑब्जेक्ट- “ओयुमुआमुआ”

माणूस खूप सूक्ष्म प्राणी आहे. पण आपल्यासारखं कोणीतरी अजून आहे का ह्या शोधासाठी आत्ता कुठे तो आपल्या घराच्या आजूबाजूला बघायला लागला आहे.
“ओयुमुआमुआ” हे नाव वाचयला आपल्याला दोन मिनिटे लागली असतील. तर काय प्रकार आहे हा? “Oumuamua” हा मानवाला ज्ञात झालेला सौरमालेतून भ्रमण करणारा पहिला इंटस्टेलर ऑब्जेक्ट आहे. इंटस्टेलर ऑब्जेक्ट म्हणजे काय? हे आपण आधी जाणून घ्यायला हवं. अवकाशातील कोणतीही बॉडी जी तारा आणि उपतारा ह्या शिवाय इंटरस्टेलर स्पेस मध्ये आहे आणि कोणत्याही ताऱ्याशी गुरुत्वाकर्षणामध्ये बांधलेली नाही त्याला इंटरस्टेलर ऑब्जेक्ट अस म्हंटल जात. “ओयुमुआमुआ” हा असा पहिला इंटरस्टेलर ऑब्जेक्ट आहे.

सौरमालेतून ओयुमुआमुआचा प्रवास पिवळ्या रंगाच्या रेघेत दिसतो आहे.
ओयुमुआमुआ हे नाव त्याला शोधणाऱ्या संशोधकांनी दिल आहे. त्याचा हवाईन भाषेत अर्थ होतो “A messenger from afar arriving first”. अवकाशात नवीन शोध लावणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला त्या वस्तू अथवा शोधला नाव देण्याची मुभा असते. तर “ओयुमुआमुआ” चा शोध ऍस्ट्रोनॉमर Robert Weryk यांनी “Pan-STARRS 1 telescope” च्या मदतीने १९ ऑक्टोबर २०१७ ला हवाई येथे लावला. त्याचा शोध लागला तेव्हा ओयुमुआमुआ पृथ्वीपासून ३३,०००,००० किमी अंतरावरून प्रवास करत होता. आधी त्याला धुमकेतू अस म्हंटल गेल. नंतर त्याला इंटरस्टेलर ऑब्जेक्ट अस नवीन वर्गीकरण केल गेल. ओयुमुआमुआ विषयी वैज्ञानिक बुचकळ्यात पडायला अनेक कारणे होती. ओयुमुआमुआ चा आकार सिगार सारखा आहे. साधारण ८०० फुट X १०० फुट. ओयुमुआमुआ हा बर्फाने बनलेला असून त्याचा पृष्ठभाग कार्बन ने संपन्न आहे. ओयुमुआमुआ ची कक्षा ही खूपच वेगळी असून त्याच्या प्रचंड वेगामुळे सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामध्ये न फसता २६ किमी/ सेकंद ह्या वेगाने तो आपल्या सौरमालेतून निघून जाईल.
ओयुमुआमुआ यायच्या आधी वैज्ञानिकांच असं मत होत की अश्या तऱ्हेचे ऑब्जेक्ट जेव्हा सौरमालेतून जातील तेव्हा धुमकेतू सारखे होतील. बर्फाचे बनलेले असल्याने सुर्याजवळून जाताना बर्फ वितळून मागे त्याचं शेपूट तयार होईल जसं धुमकेतूच होतं. पण ओयुमुआमुआ च्या बाबतीत असं काहीच घडल नाही. सूर्याच्या अतिशय जवळून जाऊन सुद्धा असं शेपूट दिसल नाही. नवीन संशोधनातून असं दिसून आल आहे की त्याचं बर्फाच आवरण हे ऑरगॅनिक शिल्ड ने झाकलेल आहे. त्यामुळे धुमकेतू सारखी शेपूट आपल्याला दिसून आली नाही.
ओयुमुआमुआ चा शोध लागला त्यावेळी त्याचा सूर्याला ओलांडून परतीचा प्रवास सुरु होता. त्यामुळे वैज्ञानिकांना त्याचा अभ्यास करायला खूपच कमी वेळ मिळाला. तरीपण मिळालेल्या कमी वेळात ओयुमुआमुआ ने अभ्यासाची अनेक कवाड उघडली आहेत. एकतर ओयुमुआमुआ च जन्मस्थान त्याच सौरमालेत येण, त्याचा आकार, त्याचा वेग आणि एकंदर त्याचा रस्ता वेगळ असल्यामुळे आधी हे मानवजाती पेक्षा तंत्रज्ञानात श्रेष्ठ असणाऱ्या एलियन लोकांनी पृथ्वी बघण्यासाठी पाठवलेलं एखाद यान असेल असं वैज्ञानिकांना वाटल. पण त्याच्या अभ्यासानंतर अस काही अजून तरी आढळून आलेल नाही.
आपल्या विश्वाचा पसारा इतका मोठा आहे की खूप कमी गोष्टी आपल्याला ज्ञात आहेत. ओयुमुआमुआ सारखे ऑब्जेक्ट कधीतरी एकदाच आपल्याला अभ्यासाची संधी देतात. त्यामुळे अनेक ज्ञात नसणाऱ्या गोष्टी ज्ञात आणि एकूणच विश्वाच्या जडणघडणी बद्दल अधिक माहिती मिळते. माणूस खूप सूक्ष्म प्राणी आहे. पण आपल्यासारखं कोणीतरी अजून आहे का ह्या शोधासाठी आत्ता कुठे तो आपल्या घराच्या आजूबाजूला बघायला लागला आहे. ओयुमुआमुआ सारखे ऑब्जेक्टस हे त्याच शोधाचा एक भाग आहेत.

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा