शेअर बाजारात Exponential Moving Average कसे काढतात?

Exponential Moving Average
Exponential Moving Average

यापूर्वी आपण साधी बदलती सरासरी (SMA) याविषयी माहिती घेतली. शेअरबाजारातील ट्रेडर्स अजून एका प्रकारच्या सरासरीवर लक्ष ठेवतात. यास विशेष बदलती सरासरी किंवा Exponential Moving Average (EMA) असे म्हणतात. एखादया शेअर्सच्या बाजारभावाबद्धल अंदाज विविध गोष्टींचा विचार करून बांधत असले तरी त्यांचा मुख्य हेतू हा चालू भावात पडणाऱ्या फरकावर अधिक केंद्रित असतो

अशी सरासरी काढताना अलीकडच्या बाजारभावाचा विचार करून ही किंमत मिळवली जाते.

ही सरासरी विशिष्ट गोष्टींवर, साधारणपणे अलीकडच्या काळातील बाजारभावावर विशेष भर देऊन मिळवीत असल्याने त्यास वेटेज मुव्हिंग एव्हरेज (WMA) असेही म्हणतात. SMA चा विचार करताना याच्याशी संबंधित प्रत्येक घटकास सारखेच महत्व दिलेले असते तर विशेष बदलत्या सरासरीत अलीकडे असलेल्या बाजारभावाचा विचार केला जातो.

याप्रमाणे EMA काढताना खालील पद्धतीने काढतात

  • प्रथम ज्या दिवसांचा Exponential Moving Average काढायचा आहे त्याचा SME काढतात. हा आपणास जेवढया दिवसांचा काढायचा आहे त्याचा बंद भावाची बेरीज करून त्यास संबंधित दिवसांच्या संख्येने भागून मिळवता येईल.
  • ज्या दिवसांचा Exponential Moving Average काढायचा त्यांचा गुणक (multipler) मिळवणे. हा गुणक मिळवण्यासाठी 2 भागीले संबंधित दिवसांची संख्या अधिक 1 असे सूत्र वापरावे लागते.
  • यावरून सद्याचा Exponential Moving Average काढणे

याप्रमाणे खुलता भाव, चालू भाव, दिवसाचा सर्वाधिक भाव, सर्वात कमी भाव, सरासरी भाव यांचा EMA काढता येऊ शकतो.

या पद्धतीचा वापर करून सर्वसाधारणपणे शेअर , इंडेक्स, कमोडिटी किंवा करन्सी याचा भाव वाढेल की कमी होईल हे समजू शकते. जर EMA वाढत असेल तर भाव वाढतील आणि कमी होत असतील तर कमी होतील.

शेअर, इंडेक्स , कमोडिटी यांच्या कोणत्या भावाला अधिक खरेदीदार मिळतील किंवा कोणता भाव आल्यास विक्रीते वाढतील ते समजेल.

ट्रेडर्स त्यांची टार्गेट प्राईज आणि स्टॉप लॉस निश्चित करता येईल.अभ्यासक याचा वेगवेगळ्या दृष्टीने विचार करून SMA आणि EMA याचा वापर आपला अनुभव याचा वापर करून अंदाज बांधतात. याविषयी चांगली माहिती देणारे व्हिडिओ यु ट्यूब वर आहेत तसेच SMA आणि EMA चा वापर करून तयार चार्ट बनवून देणारी मोफत संकेतस्थळे उपलब्ध आहेत.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!