२०२० साठी आर्थिक नियोजनाच्या ६ सोप्या स्टेप्स…

नवीन वर्षाच्या स्वागताबरोबर अनेकजण नवीन वर्षाचे वेगवेगळे संकल्पही करतात. काही जणांना वजन कमी करायचं असतं तर काही जणांना वाढवायचं असतं. काही जण सोशल मीडिया ब्रेक घेतात तर काही जण या ब्रेकवरून परततात. पण या साऱ्या बरोबर अजून एक महत्वाची गोष्ट आहे जी बरेच जण विसरतात ती म्हणजे आर्थिक नियोजन!

तसं पाहायला गेलं तर आम्ही दर जानेवारीत करतो आर्थिक नियोजन पण ते फार फार तर फेब्रुवारीपर्यत टिकतं.

आर्थिक नियोजन करण्याची गरजच काय?

आर्थिक नियोजन करणं म्हणजे चणे शेंगदाणे खाण्याइतकं सोपं आहे का?

खरं सांगायचं तर आर्थिक नियोजन अनावश्यक, कठीण, अशक्य अशा कुठल्याही प्रकारात मोडत नाही. ती एक साधी, सरळ सोपी गोष्ट आहे. गरज आहे ती फक्त हे नियोजन मनापासून स्वीकारण्याची आणि ते तितक्याच जिद्दीने यशस्वीपणे पूर्ण करण्याची. सुयोग्य आर्थिक नियोजन हा श्रीमंतीचा एक सोपा मार्ग आहे. आर्थिक नियोजनातून श्रीमंती हा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आर्थिक नियोजन करताना वेगवेगळ्या मुद्द्याचं व्यवस्थित वर्गीकरण करून मुद्देसूद मांडणी केल्यास, नियोजन करणं आणि ते तडीस नेणं निश्चितच कठीण गोष्ट नाही.

१. खर्च कमी करून बचत वाढवा

पगारच पुरत नाही तर बचत कशी करू? या मानसिकतेमधून बाहेर पडा.

साध्य साध्या गोष्टींमध्ये होणारा अनावश्यक खर्च उदा. लग्झरी वस्तू, ब्युटी पार्लर, ब्रँडेड कपडे व शूज, हॉटेलिंग, इत्यादी टाळून जर आपण बचत वाढवली तर आपली गुंतवणूकही वाढेल.

रोजचा जमा खर्च लिहायची शिस्त स्वतःला लावून घेतल्यास होणारा अनावश्यक खर्च लक्षात येईल तसेच नियोजन यशस्वी करण्यासही मदत होईल.

“अंथरुण पाहून पाय पसरावेत”, या म्हणीनुसार वागल्यास अनावश्यक खर्चाला आपोआप आळा बसेल.

दर महिन्याला पगारातील ठराविक रक्कम बँकेत जमा करण्याची सवय स्वतःला लावून घ्यावी. यामुळे वर्षाच्या शेवटी जमा होणारी मोठी रक्कम गुंतवणूक किंवा आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक खर्च, व्हेकेशन ट्रिप, कर्जाचं प्रीपेमेन्ट, इत्यादीसाठी वापरता येईल.

पगार आणि बचत याच्या नियोजनाबद्दलचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

२. विमा

विमा खरेदी म्हणजे गुंतवणुकीबरोबरच आर्थिक संकटाची तरतूद आहे. खरंतर ‘विमा’ या पर्यायाकडे पूर्वी फक्त आर्थिक संकटाची तरतूद म्हणून पहिले जायचे. परंतु आधुनिक काळात विम्याच्या बदललेल्या स्वरूपाने त्याला गुंतवणुकीचा दर्जाही मिळाला आहे.
वेगवेगळ्या प्रकारचे विमा सध्या बँका व विमा कंपन्यांकडून विकले जातात. जीवन विमा, वाहन विमा, अपघात विमा याबरोबरच सगळ्यात महत्वाचा असतो तो ‘आरोग्य विमा’. आरोग्यावर होणाऱ्या खर्चामुळे अनेकदा आपलं आर्थिक नियोजन बिघडत जातं.
सन २०११ मध्ये लॅसेटने त्याच्या लेखात नमूद केले होते की आरोग्य सेवा खर्च (Medical Expenses) वाढल्यामुळे दरवर्षी सुमारे ३९ दशलक्ष भारतीयांची आर्थिक स्थिती खालावत जाते. यावरून आरोग्य विम्याची असणारी गरज आपल्या सहज लक्षात येईल.

General Insurance ची माहिती देणारा लेख

Life Insurance ची माहिती देणारा लेख

३. क्रेडिट कार्ड

क्रेडिट कार्ड नावाचा भुलभुलैय्या अनेकजण वापरतात. क्रेडिट कार्ड जेवढं फायद्याचं आहे तेवढाच त्याचा अति वापर धोकादायक आहे. सोय तितकी गैरसोय निर्माण करणारा घटक म्हणजे क्रेडिट कार्ड.

क्रेडिट कार्डच्या चकचकीत ऑफर्स अनेकदा अनावश्यक खर्चाला आमंत्रण देतात. अनेक गोष्टी केवळ क्रेडिट कार्डवर ऑफर आहे म्हणून गरज नसताना खरेदी केल्या जातात. तर कधी रिवार्ड पॉईंट वाढविण्यासाठी खरेदी केल्या जातात.

यामुळे क्रेडिट कार्डच्या बिलाचा आकडा वाढत जातो. अनेकदा क्रेडिट कार्डचं बिल भरण्यासाठी पर्सनल लोन घ्यायची वेळ येते. कारण वेळेवर बिल भरलं नाही तर सिबिल (CIBIL) रिपोर्टमध्ये क्रेडिट रिपोर्ट खराब होतो.

भरमसाठ व्याज असणारं पर्सनल लोन फेडताना आर्थिक नियोजनाचं गणित चुकत जातं. त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर जपून करावा. शक्यतो टाळावाच.

४. गुंतवणूक

सुयोग्य गुंतवणूक नेहमीच फायद्याची ठरते. तुमची गुंतवणूक ही आर्थिक संकटांच्या वेळी उपयोगी पडणारी जमापुंजी असते. त्यामुळे ती नेहमीच विचारपूर्वक करावी. अगदी आर.डी., एफ.डी पासून स्टॉक, शेअर्स म्युच्युअल फंड, इत्यादी गुंतवणुकीचे अनेक पर्याय आपल्यासमोर उपलब्ध असतात.

आपलं बजेट ठरवून त्यानुसार गुंतवणुकीचा योग्य पर्याय निवडावा. शक्यतो गुंतवणूक चांगला परतावा देणारी व करबचत करणारी असेल यावर भर द्यावा. यामुळे दुहेरी फायदा होतो. आजकाल अनेक चांगल्या वेबसाईटवर गुंतवुकीच्या विविध पर्यायांची माहिती तसेच तुलनात्मक विश्लेषण उपलब्ध असते. तसंच अनेक अभ्यासपूर्ण ब्लॉग्ज वाचूनही आपण आपल्यासाठी गुंतवणुकीचा योग्य पर्याय निवडू शकतो. शेअर्स, स्टॉक, म्युच्युअल फंड्स यामध्ये गुंतवणूक करताना त्याबद्दलची संपूर्ण माहिती घेऊनच गुंतवणूक करावी.

यशस्वी गुंतवणुकीचा कानमंत्र.. लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

५. निवृत्तीचं नियोजन

तुमच्या निवृत्तीचा काळ जवळ आलेला असो किंवा दूर असो निवृत्ती पश्चात आयुष्याचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे.
सन २००४ पूर्वी नोकरीस लागलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळते. परंतु बाकीच्याचे काय? त्यांनी त्यांच्या निवृत्तीपश्चात आयुष्यासाठीचे आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे.
जर निवृत्तीपश्चात आयुष्याचे नियोजन आत्तापर्यंत केलेलं नसेल तर नववर्षाच्या मुहूर्तावर सर्वप्रथम या नियोजनाचा विचार करा.
एनपीएस (NPS), बँक अथवा विमा कंपन्यांच्या विविध रिटायर्डमेंट योजना, पीपीएफ यासारख्या अनेक प्रकारच्या गुंतवणूक तुमच्या निवृत्तीपश्चात आयुष्यासाठी तुम्ही करू शकता.

वरिष्ठ नागरिकांसाठी गुंतवणुकीच्या योजना माहित करण्यासाठी येथे क्लिक करा.

सेवा / स्वेच्छानिवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन कसे असावे? लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

६. शैक्षणिक खर्च

आजकाल मुलांच्या बालवाडी प्रवेशापासूनच पालकांना लाखो, हजारो रुपये मोजावे लागतात. वाढत्या जागतिकीकरणामुळे जग जवळ येतंय तसंच नोकरी व शिक्षणाच्या कक्षाही रुंदावत चालल्या आहेत. परदेशी शिक्षण घेणाऱ्यांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटीनुसार (QS World University) परदेशी शिक्षण घेण्याच्या बाबतीत भारत दुसऱ्या नंबरवर आहे.

भारतातील परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं हे प्रमाण असंच वाढत राहिलं तर चीनला मागे टाकून लवकरच भारत पहिल्या नम्बरवर स्थान मिळवेल. परदेशी शिक्षण हि तुलनेने खर्चिक गोष्ट आहेच. परंतु भारतातही उच्चशिक्षण अगदी परदेशी शिक्षणाएवढे महाग नसले तरी फारसे स्वस्त नाही. परंतु जर आपण मुलांच्या शिक्षणाचं आत्तापासूनच योग्य नियोजन केल्यास पुढे त्यांच्या शिक्षणात आर्थिक अडचण येणार नाही किंवा शैक्षणिक कर्ज घ्यायची वेळ येणार नाही. शक्य असल्यास मुलांसाठी वेगळे बँक खाते उघडा. तुम्हाला मुलगी असल्यास तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेमध्येही गुंतवणूक करू शकता.

जाणून घेऊ शैक्षणिक कर्जाबद्दल (Complete Guide- Education Loan) लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सौजन्य : www.arthasakshar.com


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय