हे पाच सोपे मार्ग वापरले तर निश्चितच कर्जमुक्त होता येईल

कर्जमुक्त

तुम्ही जर मध्यम/उच्च मध्यमवर्गीय असाल आणि नुकतेच उच्चशिक्षण घेतले असेल किंवा घ्यायचा विचार असेल, लहानमोठ्या शहरात एखादे घर असेल, घरासमोर/खाली पार्किंग मध्ये एखादी गाडी असेल, इतकेच कशाला, अगदी एखादा महागडा लॅपटॉप किंवा इतर काही यांत्रिक उपकरण असेल तर या सगळ्या सुबत्तेच्या गुलाबाला कर्जाचे काटे नक्कीच असणार…

प्रत्येक वेळी हातात येणाऱ्या प्रत्येक रुपयात त्या सगळ्या कर्जांची वजाबाकी नक्की होत असणार आणि कधी एकदा या कर्जफेडीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडेन? या विवंचनेतच आलेला प्रत्येक दिवस जात असणार….

तर आज आपण जाणून घेणार आहोत याच तुम्हा आम्हा सर्वांच्या विवंचनेला आटोक्यात आणण्याचे आणि कालांतराने त्यातून लवकरात लवकर बाहेर पडण्याचे काही खात्रीशीर मार्ग :

१. कर्जाचा आराखडा

तुम्ही आजवर घेतलेली कर्जे, त्यांचे व्याज, त्या व्याजाचा दर, शिल्लक कालावधी इ. चा एक सुटसुटीत ताळेबंद आराखडा तयार करा.

व्याजाचा दर आणि शिल्लक कालावधीच्या अनुरुप कोणती कर्जे लवकरात लवकर फेडायची आहेत व कोणती दीर्घ कालावधीची आहेत याची क्रमवार मांडणी करा.

उदा. क्रेडिट कार्डसारखी कर्जे ही अधिकाधिक व्याजदराची असतात व त्याची जास्त वेळ परतफेड न करणे खात्याला मोठ्या प्रमाणात गळती लावू शकते.

याउलट गृहकर्जासारखी कर्जे हि दीर्घ कालावधीची असतात आणि त्याचा कारसवलतीतही फायदा होतो.

२. कर्जाची प्री-पेमेंट्स करणे

कर्जे लवकरात लवकर फेडण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे नेहमीच्या व्याजाच्या हफ्त्या सोबतच मूळ मुद्दलाचाही काही प्रमाणात परतावा करणे.

उदाहरणार्थ समजा तुम्ही ४० लाख रुपये २४० महिन्यांसाठी ९.% दराने घेतले असतील आणि तुमचा व्याजाचा हफ्ता रु. ३४,७१३ आहे. २० वर्षांसाठी तुमच्या कर्जाची एकूण परतफेड रु. ४३,३१,००० ची होते. पण हेच जर तुम्ही तुमच्या १३ व्य हफ्त्यासोबत रु. १ लाखाच्या मुद्दलाची परतफेड केली तर तुमचे एकूण व्याज रु. ३९,५६,००० पर्यंत खाली येते आणि कर्जाचा कालावधी देखील २२७ महिन्यांपर्यंत कमी होऊन जातो.

३. काही काळासाठी क्रेडिट कार्डाचा वापर थांबवा

तुमच्या डोक्यावर जर दिवसेंदिवस वाढत जाणारं क्रेडिट कार्डच्या बिलाचं ओझं असेल, तर पुढचे काही दिवस क्रेडिट कार्डचा वापर थांबवा.

मुळातच कर्जाच्या बोज्याखाली असताना वारेमाप केलेला क्रेडिट कार्डचा वापर तुम्हाला अधिकाधिक कर्जाच्या दलदलीत खेचत नेईल आणि मग काही ठराविक काळाने त्यातून बाहेर पडणे दुरापास्त होऊन बसेल.

त्यामुळे आधीचे क्रेडिट कार्डचे कर्ज चुकवत असताना शक्यतो डेबिट कार्ड किंवा रोख रकमेनेच दैनंदिन व्यवहार करा. एकदा का तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डच्या कर्जातून मुक्त झालात की शक्यतो आजवर होत असलेल्या मासिक खर्चाच्या २०-३०% पर्यंतच खर्च नियंत्रित राहील असे पहा.

४. कमी व्याजदराच्या कर्जाची निवड

तुम्ही तुमच्या कर्जाचा व्याजदर आर्थिक बाजारातल्या इतर कर्जाशी पडताळून पहिला आहे का? उदा. आजही तुम्ही ९-९.५% दराने गृहकर्ज फेडत असाल आणि बाजारात दुसरा कुणीतरी तेच कर्ज ८-८.५% दराने देण्यास तयार असेल तर?

हा ०.५-१% दरातील फरकही लांब पल्ल्याच्या कर्जात तुमच्या लाखो रुपयांची बचत करू शकतो.

तसेच शक्य असल्यास वेगवगेळ्या कर्जाचे एकत्रीकरण करा. उदा. क्रेडिट कार्ड, गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज अशी वेगवेगळी कर्जे फेडण्यापेक्षा त्या सगळ्यांचे एकत्रीकरण करून एकावेळी एकच कर्ज फेडता येणे सहज शक्य आहे.

सौजन्य : www.arthasakshar.com

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

 

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!