वेदनांचा उत्सव करून मजेत जगणे खरंच शक्य आहे? प्रेरणादायी लेख

मजेत जगणे

काल ऑफीसमध्ये काम करत असताना ‘अर्थ’ नावाचा हिंदी सिनेमा पाहिला.

अर्थ मुव्ही बर्‍याच जणांना माहित असेल.

जगजीतसिंगचे “तुम इतना क्यों मुस्कुरा रहे हो!” आणि “कोई ये कैसे बताये, की वो तन्हा क्यों है?”…..

जगजितचे फॅन असतील त्यांनी हे काळीज चिरत जाणारे जगजितचे आर्त शब्द हजारो वेळा ऐकले असतील!

‘अर्थ’ 1982 मध्ये प्रदर्शित झाला होता, ही गोष्ट आहे पुजा (शबाना आझमी), इंदर (कुलभुषण खरबंदा) आणि कविता संन्याल (स्मिता पाटील) ह्या त्रिकोणाची!

पुजा एक अनाथ मुलगी आहे, तर इंदर एक टॅलेंटेड फिल्म मेकर आहे, इंदर आणि पुजा एकमेकांच्या प्रेमात पडतात, लग्न करतात.

इंदरचा स्वभाव चिडखोर असल्यामुळे त्याचे व्यावसायिक करीअर डळमळते आहे. त्यामुळे दोघांनाही आर्थिक चणचणीचा सामना करावा लागत आहे.

लग्नाला काही वर्ष झाली आहेत, इंदर हेच पुजाचे विश्व आहे. कितीही भांडणे झाली तरी ती भाबडी आपल्या नवर्‍यावर, मनापासुन निःस्सीम प्रेम करतीये!

अशातच राहते घर सोडण्याची वेळ इंदरवर येते, इंदर पुजाच्या रोजच्या कटकटींना कंटाळुन विलक्षण आणि मादक सौंदर्य असलेल्या कविताकडे आकर्षित होतो.

कविता गर्भश्रीमंत आहे, ती इंदरला नवा अलिशान फ्लॅट घेण्यासाठी पैसे देते आणि त्याबदल्यात जणु काही त्याला खरेदीच करते.

काही दिवस इंदरच्या मनात द्वंद्व असतं, मात्र एके दिवशी तो पुजाला सोडुन कायमचा कविताकडे राहण्याचा निर्णय घेतो.

पुजाच्या पायाखालची जमिन हादरते. अनाथ पूजाला हा धक्का सहन होत नाही. ती रडते, भेकते, सुन्न होते, उद्धस्त होते, इंदरच्या आणि कविताच्या पाया पडते, प्रार्थना करते.

बाई ग! माझ्या नवर्‍याचं दान माझ्या पदरात टाक!

“माझं सुख ओरबाडून घेऊ नका, माझा सुखाचा संसार मोडु नका!”

पण तिची अवहेलना करुन इंदर आणि कविता लग्न करायचे ठरवतात, इंदर पुजाला घटस्फोट मागतो.

पुजाच्या आयुष्यात देखणा, राजबिंडा आणि खेळकर स्वभावाचा राज (राजकिरण) येतो, तो तिच्या चेहर्‍यावर हसु फुलवतो. तो खुप मोठा सिंगर होतो, आणि पुजाला मागणी घालतो, पुजा त्याला नम्र नकार देते.

कारण तिच्या आयुष्यात एक पोकळी तयार झाली आहे, कधीही न भरुन येणारी!

पुजा आपल्या भुतकाळाला, आपल्या वैवाहिक अपयशाला कवटाळुन बसलेली असते, कविता –इंदरने दिलेली प्रत्येक मदत नाकारुन तिचा जगण्याचा संघर्ष सुरुच असतो.

तिची एक कामवाली बाई आहे, (रोहीणी हट्टंगडी)! ह्या क्रुर जगात तिच एकमेव तिची जिवलग मैत्रिण आहे, पण तिचा नवरा रोज दारु पिऊन मारहाण करतो.

आपल्या मुलीच्या फिससाठी जमवलेले पैसे चोरले म्हणुन सहन न होवुन ती कामवाली एके दिवशी चक्क आपल्या नवर्‍याचा खुन करते, आता तिला जन्मठेप होणार आहे.

“आता माझ्या मुलीचा सांभाळ कोण करील?” असा आर्त टाहो ती माऊली फोडते आणि अचानक पुजामधलं मातृत्व जागं होतं!

“मी सांभाळीन तुझ्या मुलीला, तु निर्धास्त रहा!” ती निर्धाराने म्हणते!

तिला तिच्या जगण्याचा अर्थ गवसतो.

तिने ज्या क्षणाला एक ध्येय स्वीकारलं, त्या क्षणी तिच्या चेहर्‍यावर आनंद झळकु लागतो,

एका अनाथ मुलीसाठी एक पाऊल टाकलं, त्या क्षणी तिच्या आयुष्याला एक नवा अर्थ प्राप्त होतो, तिची सारी दुःखे छुमंतर होतात.

त्या लहान मुलीच्या येण्याने, जीवघेणी पोकळी नाहीशी होते,

आपली पुजा, पुर्वीसारखी नाचु बागडु लागते.

आता खुष आनंदी होण्यासाठी तिला इतर कोणाचीही गरज नसते.

ती स्वतःवर आणि त्या मुलीवर जीवापाड प्रेम करु लागते, आयुष्यावर प्रेम करु लागते.

अर्थ सिनेमा संपतो.

जाता जाता आपल्या डोळ्यात पाणी, आणि डोळ्यात अनेक प्रश्ने शिल्लक ठेवतो.

आपल्याही आयुष्यात कसल्या ना कसल्या समस्या असतात.

का बरं आपण त्यांना कवटाळुन बसतो?

जाताना ‘अर्थ’ आपल्याला एक धाडसी प्रश्न विचारत संपतो.

तुझ्या मनात ज्या वेदना साठवलेल्या आहेत. त्या वेदनांचाच उत्सव तुला साजरा करता येईल का?…

तर कदाचित तुझ्याही जीवनाला ‘अर्थ’ येईल.

https://www.youtube.com/watch?v=C8eAKT-zQXk&vl=en

काही वर्षांपुर्वी मी आमच्या एका जवळच्या नातेवाईकांच्या हॉस्पीटलमध्ये, प्रत्यक्ष डिलीव्हरीच्या वेळी, काही हवं नको, बघायला थांबलो होतो, तेव्हाची गोष्ट!

डिलीव्हरी क्रिटीकल होती.

समोर लिहलेले होते, लेबर रुम! त्या गर्भवती स्त्रीचा नवरा प्रचंड अस्वस्थ होवुन चकरा मारत होता, आणि त्या ताई जोरजोरात किंचाळत होत्या, प्रचंड ओरडत होत्या.

कित्येक मिनीटे त्या आरोळ्या पुर्ण हॉस्पीटल मध्ये घुमत राहील्या. प्रत्येक किंकाळी आमच्या काळजाचे ठोके चुकवत होती.

आणि कित्येक मिनीटे वेदनादायी गेल्यावर एक शांतता पसरली, एक जन्म झाला!

मला त्याच क्षणी समजले, जिथे प्रचंड वेदना होत असतात, तिथे लवकर नवा जन्म होतो.

आपल्याला छळणार्‍या प्रत्येक गंभीर प्रश्नामध्ये आपलं जीवन बदलावुन टाकणारं एक अनमोल उत्तरही लपलेले असते.

मला आर्थिक प्रश्न आहेत!!

असु दे की! आव्हानंच तर जीवनाला रुचकर बनवतात रे! गरीबीची जितकी धग सोसली आहेस, तिच तुझी सर्वात मोठ्ठी प्रेरणा बनुन तुला दिवसेंदिवस श्रीमंत बनवणार आहे! हा प्रवास, तुझी सक्सेस स्टोरी एके दिवशी तु जगापुढे मांडण्यासाठी तुला ही संधी मिळाली आहे!

डोकं वापर, गरज पडलीच तर कठोर परिश्रम कर, कसा येत नाही पैसा? त्याच्या बापालाही यावं लागेल.

घरातल्या माणसांचं एकमेकांशी जमत नाही!!

अरे! पण त्या विधात्यानेच तुमची गाठ बांधुन इथे पाठवलं आहे, बरं! जी माणसं आहेत, ती बदलली म्हणजे तु आनंदाच्या डोहात डुंबशील असे समजत असशील तर तो गैरसमज आहे. कारण आपण सगळे सेमच असतो. प्रत्येक माणसात कसला ना कसला दोष असेलच!

त्यामुळे परफेक्ट रिलेशन हे एक प्रकारचे मृगजळच आहे!

आपली माणसं आईवडील, भाऊ बहीण, मुलं, नातेवाईक, शेजारी, मित्र जशे आहेत तसे त्यांच्यावर मनापासुन प्रेम करु लाग, म्हणजे प्रेमाची चव तुला इन्स्टंट चाखायला मिळेल, कारण आपण जसे वागतो, तेच आपल्याला परत मिळतं, हाच सृष्टीचा नियम आहे.

माझी प्रिय व्यक्ती जीवनाच्या अर्ध्या रस्त्यात माझी साथ सोडून गेली.

अघटित तर घडलयं खरं,

पण म्हणुन जिवंत प्रेत बनुन केविलवाणं जगु नको ना!

प्रत्येकाचे आईवडील, जोडीदार, मुलं सगळे एकेनाएके दिवशी मरतात, पण आयुष्य चालुच राहतं, जगाचं रहाटगाडगं संपत नाही, तेही चालुच राहतं.

आता तुझ्यासमोर काय काय उरलं आहे, त्याकडे बघ.

जे समोर आहे, त्याचा सांभाळ कर, जे जवळ आहेत, त्यांच्यावर प्रेम कर!

मला किंवा माझ्या जवळच्या व्यक्तींना आरोग्याचे प्रॉब्लेम्स आहेत.

अरे! ही तर खुप छान गोष्ट आहे, आता तुला ह्या मौल्यवान आयुष्याची, स्वतःच्या शरीराची खरी किंमत कळेल.

आता एकही दिवस तु वाया घालवणार नाहीस, एकेक सेकंद स्वतःच्या आणि इतरांच्या आयुष्यात हसु फुलवण्यासाठी वापरशील.

कारण तु काय गमवत आहेस, उद्या तुझ्यापाशी काय नसेल, हे फक्त तुझं तुलाच माहित आहे.

मित्रांनो….

आशा करतो, मला जे म्हणायचं आहे, ते तुम्हाला कळालं आहे!..

जाता जाता शेवटी पोटतिडकीने, मी एकच गोष्ट सांगेन.

“मी तुम्हाला तुमच्या सगळ्या समस्यांमधुन मुक्त करीन, असं माझं म्हणणं कधीच नव्हतं, आताही मुळीच नाही, “

“पण माझा प्रत्येक लेख तुम्हाला संकटांना झगडण्यासाठी, प्रत्येक वेळी, एक नवं बळ नक्कीच देत राहील, हा मात्र माझा दृढ-विश्वास आहे.”

लाईक करा, कमेंट करा, शेअर करा!

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

You may also like...

3 Responses

  1. Rucha says:

    Khup sundar lihila ahe sir .. yachi nakkich madat hoil. Tumcha whatsapp course kadhi suru honar ahe?

  2. Trupti says:

    Soo meaningful and so touch to my heart…. Fantastic!!! Keep it up… Would love to read more…. 😊 👍

  3. Saiprasad Prabhakar Panhalkar says:

    Mast 👍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!